Breaking News

Tag Archives: vijay wadettiwar

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, महायुती सरकारमध्ये नेमकं काय चाललंय?

जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणी वाढता पाठिंबा पाहून पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी अंतरवाली सराटी येथील वयोवृद्ध नागरिक, महिलांसह निर्दोष आंदोलकांवर अमानुष लाठीमार केला. या प्रकरणावरून राजकिय वादंग पेटलेले असताना मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांची बदली करण्यात …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, सरकारचे परीक्षार्थींना सबुरीचे गाजर

राज्यातील विविध विभागासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षांचे निकाल महिन्यांपासून रखडल्यामुळे २५ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत असून इतर आश्वासनाप्रमाणे हे सुद्धा बेरोजगारांना प्रतीक्षेत ठेवून दिवस काढण्यासाठी दिलेले “सबुरी” चे गाजरच असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्य शासनाने १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ७५ हजार …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, दुष्काळ निवारणासाठी.. .सरकारचा अक्षम्य हलगर्जीपणा वाढीव दुष्काळी महसूल मंडळांना सरकारने आर्थिक मदत करावी

दुष्काळ जाहीर करण्याचे निकष आणि वेळ सरकारने पाळली नाही. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक वेळीच घेतली नाही. सरकार सत्ता टिकवण्यात गुंग असल्याने प्रशासनावर वचक नाही. या सरकारच्या गोंधळामुळे आता दुष्काळ निवारणासाठीच्या निधीवर टाच आली आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करताना केलेल्या गलथानपणामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा निर्धार, जीवात जीव असेपर्यंत आरक्षणासाठी लढणार

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवणे सरकार आणि विरोधी पक्ष यांची सामूहिक जबाबदारी आहे. ओबीसींच्या हक्काचे रक्षण करण्याबरोबरच सर्व समाजाला न्याय देण्याचे काम आम्ही मिळून करू, जीवात जीव असेपर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढणार,असा विश्वास देत जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रत्युत्तर, काही काळ जाऊ द्या वडेट्टीवारच सांगतील वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर बोलताना बावनकुळे यांचे प्रत्युत्तर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाप्रणित शिंदे सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर एकाबाजूला आजारी असल्याचे ट्विट करत कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे ट्विटद्वारे अजित पवार यांनी जाहिर केले. मात्र त्यास ४८ तासांचा अवधी लोटत नाही. तोच अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटी घेऊन दिल्लीला भाजपाचे नेते अमित शाह …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा टोला, हिरो झाले अन्… मनोज जरांगे पाटील यांचे प्रत्युत्तर

राज्यातील मराठा समाजाला कुणबी असल्याचे सरसकट जातीचे दाखले द्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवरून आणि ओबीसी आरक्षण प्रश्नी राज्य सरकारच्या संदिग्ध भूमिकेवरून काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, मराठा आंदोलकांवर गोळीबार झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे हिरो झाले. आणि ते आता सरकारलाच मराठा …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, विद्यार्थी उपाशी असताना निर्ढावलेली यंत्रणा मात्र तुपाशी सरकारच्या गलथान कारभारामुळे ५० ओबीसी विद्यार्थी अडचणीत

परदेशी शिष्यवृत्तीचे पैसे न दिल्याने ५० ओबीसी विद्यार्थी संकटात आहेत. सरकारचा हा गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे. सरकारच्या भरोशावर परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांनी जेवण, निवास खर्च भागवायचा कसा, हा प्रश्न आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करतो. पण विद्यार्थ्यांना पैसे देत नाही. यासारखे दुर्दैव नाही. …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, दुष्काळ जाहीर करतानाही सरकारचे राजकारण… ४० पैकी ३५ तालुके सत्ताधारी आमदारांचे

राज्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. परंतु हा दुष्काळ जाहीर करत असताना सरकार राजकारण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यापैकी जवळपास ३३ ते ३५ तालुक्यांचे आमदार हे सत्ताधारी पक्षाचे असून त्यात काही मंत्र्यांचेही तालुके आहेत. विरोधी पक्षातील आमदारांच्या फक्त चार ते पाच तालुक्यांचा दुष्काळी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, शासन आपल्या दारी कार्यक्रम अपयशी ठरल्यानेच मंत्रालयाबाहेर… मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे राज्यात जनतेची कामे होत नसल्याचा पुरावा

सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम अपयशी ठरला आहे. त्यामुळेच जनतेला शासनाच्या दारी जावे लागत आहे. परंतु शासनाने जनतेची तिथेही अडवणूक केली आहे. मंत्रालयात होत असणाऱ्या आंदोलनाचा सरकारने धसका घेतला असून मंत्रालय प्रवेशासाठी जाचक नियम बनवले आहे. सरकारचे हे अपयश असून मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे राज्यात जनतेची कोणतीही कामे होत नसल्याचा …

Read More »

जरांगे पाटील यांच्या तब्येतीवरून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने केली ही मागणी उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र, जरांगे पाटील यांचे प्राण वाचविण्याची भूमिका दिसत नाही

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. विशेष म्हणजे हे आंदोलन सुरु केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पाणी आणि औषधे न घेता आमरण उपोषण सुरु केले असून आज उपोषण आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी …

Read More »