Breaking News

Tag Archives: vijay wadettiwar

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, दुष्काळाच्या झळांची माहिती सरकारला आहे का? राज्यावर दुष्काळाचं मोठं संकट

राज्यात गेल्या अडीच महिन्यांमध्ये अत्यंत कमी पाऊस पडला आहे. हीच परिस्थिती राहीली तर आगामी काळात दुष्काळाचं मोठं संकट राज्यावर येऊ शकतं ही शक्यता वर्तविण्यात येत आहे.राज्यात यावर्षी ३१ जुलै पर्यंत तब्बल १ हजार ५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं या परिस्थितीवरून राज्यसरकारवार निशाणा साधत दुष्काळाच्या झळा किती तीव्र आहे …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, ट्रिपल इंजिन सरकारला दुष्काळ जाहीर करण्याची बुद्धी कधी येणार ? ट्रिपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱयांचा डब्बा जड जातोय

महाराष्ट्र यंदा दुष्काळात होरपळतोय. राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पिके करपली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाणी, चाराटंचाई दिसताच कर्नाटक सरकारनं १९५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. मग केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार …

Read More »

कंत्राटी नोकर भरतीच्या शासन निर्णयाची होळी करा एससी एसटी ओबीसी विद्यार्थ्यांना विजय वडेट्टीवारांचे आवाहन

राज्यातील मनुवादी विचारसरणीच्या सरकारनं विविध विभागात कंत्राटी कर्मचारी भरण्याच्या नावाखाली बेरोजगारांना नोकरीचे गाजर दाखवून कंपन्यांना मलिदा खाऊ घालण्याचं काम केलं असून कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय घेऊन मनुवादी सरकार पाच वर्षात खाजगी कंपनीच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीतून ३० हज़ार कोटींची लूट करणार असल्याचा आरोप करीत एससी एसटी ओबीसी विद्यार्थ्यांनी कंत्राट नोकर भरती …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ आहे का ? शेतकरी आत्महत्येवरून विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर निशाणा

राज्यात जून-जुलै महिन्यांमध्ये समाधानकारक पडलेल्या पावसानं मराठवाड्यात तर तब्बल ४४ दिवस ओढ दिली. परिणामी शेतकऱ्यांची पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहेत. मात्र स्वत:मध्ये मश्गूल असलेल्या सरकारला शेतकरी बांधव त्याच्या जीवनातल्या सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जात आहे, याची साधी जाणीवही नाही. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना टोकाची भूमिका घेण्यास भाग पडल्यास त्याची …

Read More »

नाना पटोले म्हणाले, राहुल गांधींची लढाई देश, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी भारत जोडो यात्रा देशाच्या राजकारणाला व भविष्याला दिशा देणारी – थोरात

भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षातर्फे पत्रकारपरिषदा, भारत जोडो पद यात्रा आणि सभांचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस नेत्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकारिषदा घेऊन महागाई वाढवून सर्वसामान्यांची लूट करणा-या मोदी सरकारची पोलखोल केली व त्यानंतर पदयात्रा काढून सभा घेतल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …

Read More »

चार महिन्यात एकही बैठक झाली नाही आता एक महिन्यात काय होणार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात लाठीचार्ज होऊन आज तीन दिवस झाल्यानंतर गाजावाजा करत सरकारने मंत्रीमंडळ उपसमितीची आज बैठक बोलावली. या बैठकीतून काय निष्पन्न झालं तर एक समिती अभ्यास करून एक महिन्यात अहवाल देणार असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करीत केला आहे. आंदोलनात जखमी झालेल्यांची सरकारने माफी मागून शांततमाय मार्गाने …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप,…. पण, भाजपाची इच्छाशक्तीच नाही! मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य!

सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी काही नवीन नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व मार्ग बंद झालेत काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. आरक्षण देण्याचे सर्वच मार्ग बंद झालेले नाहीत. सत्ताधारी …

Read More »

दलित मुलांना मारहाण प्रकरण, शासन नेमकं कोणाच्या दारी ? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा शिंदे-फडवीस-पवार यांना सवाल

शेळी कबुतरे चोरल्याच्या संशयावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तीन दलित आणि एक मराठा मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेचा तीव्र निषेध विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी करत महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आहे, गृहमंत्री सुद्धा भाजपाचे आहे. ते स्वतः दोषींवर कठोर कारवाई …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, नाफेडमार्फत २ लाख टन कांदा खरेदीचा निर्णय? केवळ धुळफेक मुख्यमंत्री बैठका घातायेत आणि उपमुख्यमंत्री जपानमधून निर्णयाची घोषणा करतात, सरकार नेमके कोण चालवतंय ?

केंद्र सरकारने अचानक कांद्याचे निर्यात शुल्क ४० टक्के केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत बाजार बंद पाडले. शेतकऱ्यांचा संताप पाहून राज्यातील तिघाडी सरकारने धावाधाव करत नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला. राज्यातील बाजारात मागील महिन्यात ११ लाख टन कांदा आला व या महिन्यात आतापर्यंत ६.५ लाख टन कांदा आला आहे …

Read More »

नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, अजित पवार यांनी अचानक भूमिका बदलल्याने उशीर विजय वडेट्टीवार सक्षम विरोधी पक्षनेते, जनतेच्या प्रश्नांना न्याय देतील

राज्यातील शेतकरी, कामगार, तरुणवर्ग, महिला तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम विरोधी पक्ष नेत्याचे आहे. महागाई, बेरोजगारी यासह अनेक ज्वलंत प्रश्न आहेत, या प्रश्नांवर सरकारला जाब विचारून जनतेला न्याय देण्याची गरज आहे. विजय वडेट्टीवार हे सक्षम विरोधी पक्षनेते असून आपली भूमिका समर्थपणे पार पाडतील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …

Read More »