Breaking News

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, दुष्काळाच्या झळांची माहिती सरकारला आहे का? राज्यावर दुष्काळाचं मोठं संकट

राज्यात गेल्या अडीच महिन्यांमध्ये अत्यंत कमी पाऊस पडला आहे. हीच परिस्थिती राहीली तर आगामी काळात दुष्काळाचं मोठं संकट राज्यावर येऊ शकतं ही शक्यता वर्तविण्यात येत आहे.राज्यात यावर्षी ३१ जुलै पर्यंत तब्बल १ हजार ५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं या परिस्थितीवरून राज्यसरकारवार निशाणा साधत दुष्काळाच्या झळा किती तीव्र आहे याची माहिती सरकारला आहे की नाही असा घणाघात सवाल करत फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून मोकळं व्हायचं हाच महायुती सरकारचा पॅटर्न असल्याची खरमरीत टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

महायुती सरकारवर वडेट्टीवार यांनी ट्विट करत हल्लाबोल चढवला आहे. दुष्काळी संकट आणि सरकारचं दुर्लक्ष यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचे अहवाल पुढे आले आहे. यानुसार राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलै पर्यंत तब्बल १ हजार ५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यात अमरावती विभागात सगळ्यात जास्त ६३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे.अमरावती १८३, बुलढाणा १७३, यवतमाळ १४९, अकोला ९४, वाशीम ३८ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. औरंगाबाद विभागात ५८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या यात बीडमध्ये १५५, उस्मानाबाद १०२, नांदेड ९९, औरंगाबाद ८६, परभणी ५१, जालना ३६, लातूर ३५, हिंगोलीत २० शेतकऱ्यांनी आपल जीवन संपवल आहे. तर नागपूर विभागात १४४ शेतकरी आत्महत्या केल्या यात चंद्रपूर ७३, वर्धा ५०, नागपूर १३, भंडारा ५ आणि गोंदिया ३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. नाशिक विभागात १७४ शेतकरी आत्महत्या केल्या यात जळगावमध्ये ९३, अहमदनगरमध्ये ४३, धुळे २८, नाशिक ७, नंदुरबारमध्ये ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पुणे विभागात १६, यातमध्ये सोलापूर १३,सातारा २,सांगलीत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या जून महिन्यात झाल्या आहेत. जानेवारी २२६, फेब्रुवारी १९२, मार्च २२६, एप्रिल २२५, मे २२४, जून २३३, जुलै २२९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आकडेवारीवरून विजय वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त करत ट्रिपल इंजिन सरकारवर निशाणा साधला.

विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात सरासरी ४५ टक्के कमी पाऊस झाला आहे.सांगली सरासरी ४५ टक्के, नांदेडमध्ये १९ टक्के, सोलापुर सरासरी ३५ टक्के, सातारा ४० टक्के, छत्रपती संभाजीनगर सरासरी २७ टक्के, जालना ४३ टक्के, बीडमध्ये ४३ टक्के, धाराशिव ३२ टक्के, परभणी ३१ टक्के, अमरावती ३० टक्के, वाशिम २२ टक्के,अकोला २९ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या जून महिन्यात झाल्या आहेत. जानेवारी २२६,फेब्रुवारी १९२,मार्च २२६,एप्रिल २२५, मे २२४, जून २३३, जुलै २२९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून विजय वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त करत ट्रिपल इंजिन सरकार मात्र आपल्याला काय ? आपल्याला फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून मोकळं व्हायचं आहे, हाच पॅटर्न सरकार चालवताना महायुतीने हाती घेतला असल्याची घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *