मराठा आरक्षणाच्या आंदोलनात लाठीचार्ज होऊन आज तीन दिवस झाल्यानंतर गाजावाजा करत सरकारने मंत्रीमंडळ उपसमितीची आज बैठक बोलावली. या बैठकीतून काय निष्पन्न झालं तर एक समिती अभ्यास करून एक महिन्यात अहवाल देणार असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करीत केला आहे.
आंदोलनात जखमी झालेल्यांची सरकारने माफी मागून शांततमाय मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश शासनकर्त्यानी दिल्याची अप्रत्यक्ष कबुली महायुती सरकारने दिली.असेही त्यांनी म्हटले आहे.
हे त्रांगड सरकार असल्यामुळे कोणाचा कुणाशी मेळ
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने मे महिन्यात समिती नेमली होती. या चार महिने होऊन एकदा ही त्या समितीची बैठक झाली नाही. असं हे त्रांगड सरकार असल्यामुळे कोणाचा कुणाशी मेळ नाही अशी टिका करीत आज पुन्हा एकदा हीच समिती एक महिन्यात अहवाल देणार असे मुख्यमंत्री म्हणाले, मग चार महिन्यात या समितीने नेमके काय केले की जे आता एक महिन्यात होईल ? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.