Breaking News

चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रत्युत्तर, काही काळ जाऊ द्या वडेट्टीवारच सांगतील वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर बोलताना बावनकुळे यांचे प्रत्युत्तर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाप्रणित शिंदे सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर एकाबाजूला आजारी असल्याचे ट्विट करत कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे ट्विटद्वारे अजित पवार यांनी जाहिर केले. मात्र त्यास ४८ तासांचा अवधी लोटत नाही. तोच अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटी घेऊन दिल्लीला भाजपाचे नेते अमित शाह यांना भेटण्यासाठी गेल्याची माहिती पुढे आली. त्यावरून काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपा रडवून रडवून सोबत घेते आणि नंतर सडविण्याचे काम करते अशी अपरोधिक टीका अजित पवार आणि भाजपावर केली.

विजय वडेट्टीवार यांच्या टीकेचा धागा पकडत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांना आज प्रत्युत्तर दिले. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विजय वडेट्टीवार यांना भाजपा न्याय देईल असे सांगत चांगलेच कोंडीत पकडले.

अजित पवार यांच्या अमित शाह यांच्या भेटीनंतर विजय वडेट्टीवार टीका करताना म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे धाक दाखवून सर्व तिजोरी साफ करत होते. आता पुन्हा राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडेच असून सुध्दा त्यांच्या आमदारांना निधी मिळत नाही म्हणून रडले नाहीत म्हणून सांगू नये. तसेच पुर्वीची धमक अजित पवार यांच्या मध्ये राहिली नाही का असा सवाल रडण्यापेक्षा रडविण्याची धमक दाखवावी असे सांगत अजित पवार आता दिल्लीचे चरणदास झालेत असा आरोपही केला.

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, भाजपात जाणाऱ्यांना रडवून रडवून सोडतात. त्यामुळे अजित पवार यांच्यावर आता रडण्याची आणि सडण्याची वेळ आली असावी अशी टीका केली.

त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काही काळ जाऊ द्या वडेट्टीवार यांना कोणीतरी प्रश्न विचारेल ते पक्षनेते आहेत. पण काही काळात भाजपा विजय वडेट्टीवार यांना न्याय देईल. तेव्हा वडेट्टीवार यांना कळेल की भाजपा किती न्याय देते असा गर्भित इशाराही दिला.

Check Also

संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्त्ये एकमेकांसमोर

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यासाठी १३ मे ला मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघातही मतदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *