Breaking News

Tag Archives: vidharbha

पुणे, नाशिक, कोकणला पुढील ४८ तासाचा इशारा; वाचा जिल्हानिहाय पाऊस स्थिती भारतीय हवामान खात्याकडून इशारा जारी

सबंध जून महिना नाराज असलेल्या पावसाने जुलै महिना उजाडताच आपली हजेरी लावण्यास सुरुवात केलेली असून त्यात अद्याप खंड पडू दिला नाही. मागील आठवड्यापासून सक्रिय मान्सूनने कोकण, पुणे, मुंबईला पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असतानाच विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रात सातत्याने हजेरी लावत जून महिन्यातील तुटीचा कालावधी …

Read More »

राज्यात पावसामुळे ७६ जणांचा मृत्यू तर ८३८ घरांचे नुकसान तर मागील २४ तासात ८ जणांचा मृत्यू

मुंबईसह कोकणात पावसाला तशी उशीराने सुरुवात झालेली असली तरी १ जूनपासून राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावत कधी संततधार तर कधी अतिवृष्टीमुळे अनेक वेळा स्थानिक पातळीवरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यत राज्यात विविध ठिकाणी १ जून ते आतापर्यत पावसामुळे …

Read More »

गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून अलर्ट जारी

मुंबई : प्रतिनिधी काल गुलाब चक्रीवादळ तयार झाले असून ते पूर्व किनार पट्टीकडे सरकरत आहे. आज मध्यरात्री ते गोपाळपूर आणि कलिंगपट्टणम येथे धडकण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने आज दिला. गुलाब चक्रीवादळामुळे २७ तारखेला मराठवाडा …

Read More »

ऑगस्टच्या या तारखेपासून राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय हवामान खात्याचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेला पाऊस ३० ऑगस्टपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. वास्तविक पाहता रविवारपासूनच पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. तर ३० तारखेला पावसाचा चांगलाच जोर चांगलाच वाढणार असून प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भात सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार …

Read More »

येत्या २४ तासात मुंबईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस हवामान खात्याचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी आगामी २४ तासात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आदी भागात वादळी वाऱ्यासह अति अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नका असा इशारा हवामान खात्याने आज एका ट्विटरच्या माध्यमातून दिला. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय विदर्भातही पुढील ४८ तास …

Read More »

विदर्भ-मराठवाडयातील उद्योगांना २०२४ पर्यंत विद्युत शुल्क माफ उद्योग विकास-रोजगाराला मिळणार चालना

मुंबई: प्रतिनिधी विदर्भ मराठवाड्यातील उद्योजकांना विद्युत शुल्कात माफीची सवलत २०१३ ते २०१९ पर्यंत देण्यात आली होती. ही सवलत पुढील पाच वर्ष म्हणजे २०२४ पर्यंत लागू करण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ऊर्जा विभागाने सादर केलेल्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ मराठवाड्यात …

Read More »

२७, २८ जूनला विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार

मुंबई : प्रतिनिधी मध्य-भारतात या आठवड्यात एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत असल्याने २७ व २८ जूनला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत, तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मध्य-महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर आणि नाशिकसारख्या काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात …

Read More »

हवामान बदलामुळे विदर्भ, मराठवाड्यात गारपीटीची शक्यता पिकांची काळजी घेण्याचे राज्य सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात येत्या १० ते १३ फेब्रुवारी दरम्यान वादळी वाऱ्याच्या गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तयार झालेल्या पिकांची कापणी करुन शेतमालाची योग्यरित्या साठवणूक करावी. तसेच सर्व नागरिकांनी वादळ, विजा आणि गारपीटीपासून संरक्षण होण्‍यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन राज्य सरकारतर्फे एका …

Read More »