Breaking News

राज्यात पावसामुळे ७६ जणांचा मृत्यू तर ८३८ घरांचे नुकसान तर मागील २४ तासात ८ जणांचा मृत्यू

मुंबईसह कोकणात पावसाला तशी उशीराने सुरुवात झालेली असली तरी १ जूनपासून राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावत कधी संततधार तर कधी अतिवृष्टीमुळे अनेक वेळा स्थानिक पातळीवरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यत राज्यात विविध ठिकाणी १ जून ते आतापर्यत पावसामुळे ७६ जणांचा बळी गेला आहे. तर मागील २४ तासाच ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढील पाच दिवसांत काही भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा ८३८ घरांना फटका बसला आहे. तर ४९१६ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

पुरग्रस्तांसाठी राज्यात विविध ठिकाणी ३५ मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. मुंबई कोकण सह मराठावाडा आणि विर्दभालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. मराठवाडा विदर्भातील जवळपास ३० गावांना पुराचा फटका बसला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गडचिरोलीत १२८ गावांचा संपर्क तुटला आहे. आत्तापर्यंत जवळपास २०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. हवामान विभागाने दिललेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवसांसाठी मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा इशारा असल्यास मुंबईतील चौपाटय़ांवर केवळ सकाळी ६ ते १० या वेळेतच फिरण्यास मुभा देण्यात येणार आहे. पावसाळय़ात भरतीच्यावेळी समुद्रात बुडून वाहून जीव गेल्याच्या दुर्घटना घडत असल्यामुळे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी असे आदेश काढले आहेत.

दरम्यान, या पावसाळय़ात आतापर्यंत समुद्रात बुडून सात जणांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे नागरीकांनी पुरेशी खबरदारी घ्यावी असे आवाहन मुंबई महापालिकेसह राज्य सरकारने राज्यातील नागरिकांना केली आहे.

Check Also

अखेर मान्सून राज्यात धडकलाः वातावरणातल्या गारव्याने नागरिकांना दिलासा कोकणात बरसल्या मान्सूनच्या सरी

महाराष्ट्रातील प्रत्येक जण ज्या गोष्टीची गेल्या काही दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत होता. तो दिवस आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *