Breaking News

Tag Archives: unemployment

नाना पटोलेंचे नरेंद्र मोदींना आव्हानः महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यांवर बोला पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून जनतेच्या पैशांची लुट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून सरकारी पैशांतून जाहिरातबाजी केली जात आहे, ही जनतेच्या पैशांची लूट आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊन ६ वर्षे झाली, त्याचे काय झाले? यावर मोदींनी बोलावे तसेच महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या विषयांवरही …

Read More »

काँग्रेसचा आरोप, मोदी सरकार आर्थिक विषमता रोखण्यात सपशेल फेल देशातील आर्थिक, सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठीच काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार मागील ९ वर्षात सर्वच आघाड्यांवर फेल ठरले आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांची मोठी किंमत देशातील गरिब जनतेला मोजावी लागत असून श्रीमंत अधिक श्रीमंत होत असल्याचे ‘ऑक्सफॅम’ संस्थेच्या अहवालाने स्पष्ट झाले आहे. देशातील ४० टक्के संपत्ती केवळ १ टक्के गर्भश्रीमंतांकडे तर …

Read More »

देशात प्रचंड बेरोजगारी असताना केवळ अमित शाह यांच्या मुलालाच नोकरी

विविधतेत एकता ही या देशाची ओळख असताना ही ओळख पुसण्याचे काम मागील काही वर्षांपासून केले जात आहे. द्वेषाचे बिज पेरून समाजा-समाजाला, जाती-धर्माला एकमेकांविरोधात लढवून भाजपा आपली राजकीय पोळी भाजत आहे. देशात महागाई, बेरोजगारीची समस्या मोठी असताना केंद्रातील भाजपा सरकार त्याकडे लक्ष देत नाही. जनतेला त्यांनी वाऱ्यावर सोडून दिले आहे. अशा …

Read More »

अजित पवार म्हणाले, आज महागाई, बेरोजगारीसारख्या गंभीर समस्या पण… स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात साजरा; विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी अजित पवार यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्याचा हा दिवस ज्यांच्यामुळे दिसला, देशासाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले, हौतात्म्य पत्करले त्या सर्वांना अजित पवार यांनी यावेळी अभिवादन केले. आज …

Read More »

मुलभूत प्रश्नांना बगल देण्यासाठीच धार्मिक मुद्द्यांना प्राधान्य देण्याचे षडयंत्र देशातील ज्वलंत प्रश्नांची काँग्रेसला चिंता, जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारला जाब विचारू : नाना पटोले

देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. रुपयाची दररोज घसरण होत आहे, महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न असताना धार्मिक मुद्द्यांना पुढे करून वातावरण बिघडवायचे व मुख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे एक मोठे षडयंत्र भाजपकडून सुरु आहे. परंतु काँग्रेस जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारला जाब विचारत राहिल, …

Read More »

तीन काळे कृषी- कामगार कायदे, महागाई, बेरोजगारी विरोधात विरोधी पक्षांचा एल्गार झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी सोमवारच्या ‘भारत बंद’ला सक्रीय पाठिंबा : नाना पटोले

अकोले: प्रतिनिधी केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कामगारविरोधी सरकार असून महागाई, बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यातही मोदी सरकार सपशेल फेल ठरले आहे. देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे, कामगारविरोधी कायदे, वाढती बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यावर जनतेत तीव्र असंतोष आहे. देशातील जनता समस्यांचा सामना करत असताना झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्रातील …

Read More »

कौशल्य विकास योजनांचा लाभ घ्यायचाय तर सेवायोजन नोंदणी आधार लिंक करा बेरोजगारांना विभागाचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर किंवा कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना नोकरीसाठी सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन पध्दतीने वेबसाइटच्या माध्यमातून देण्यात येतात. आपल्या नाव नोंदणीमध्ये अद्यापपर्यंत आधार नोंदणी क्रमांकाचा समावेश न केलेल्या उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्ड वापरुन आधार कार्ड क्रमांकासह आवश्यक असलेली सर्व माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ३० सप्टेंबर २०२० पर्यंत …

Read More »

अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी आरबीआय कोणतीही पावले उचलेल रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मागील काही महिन्यापूर्वी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्थेचं चक्र थांबल होत. मात्र आता देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून अर्थव्यवस्थेलाही पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, करोना महामारीचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी कोणतीही पावलं उचलण्यास रिझर्व्ह बँक …

Read More »

लॉकडाऊनमुळे राज्यातील २ कोटी २९ लाख कामगारांवर बेकारी? चार कोटी ५० लाख कामगारांपैकी फक्त २० लाख ४० हजारांचे नोकऱ्या शाबूत

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला जवळपास ४५ दिवस पूर्ण होत आहेत. याकाळात दैनंदिन जीवनात काम करणाऱ्या असंघटीत ४ कोटी ५९ लाख ५० हजार कामगार काम करत होते. मात्र यातील जवळपास ५० टक्के कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता …

Read More »

४५ वर्षातील उच्चांकी बेरोजगारी आणि ढासळती अर्थव्यवस्था चिंताजनक! केंद्र सरकारने युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई : प्रतिनिधी देशातील बेरोजगारीचे प्रमाण सध्या मागील ४५ वर्षात सर्वाधिक उच्चांकी ६.१ टक्के असल्याचे केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे मागील ५ वर्षातील सर्वात कमी आर्थिक विकास दर नोंदला गेल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. हे दोन्ही आकडे संपूर्ण देशाला चिंताग्रस्त करणारे असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते …

Read More »