Breaking News

Tag Archives: sanjay rathod

आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल हे जगातील पहिले उदाहरण- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला आहे. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे. आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत …

Read More »

मानवी हक्क आयोगाच्या आदेशानंतर कफ परेड झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी समिती वनमंत्री संजय राठोड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील कफ परेड येथील डॉ.आंबेडकर नगरातील अनधिकृत झोपडपट्टी धारक यांच्यासाठी ठोस पुनर्वसन प्रकल्प तयार करण्यासाठी प्रधान सचिव (गृहनिर्माण) यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. डॉ. आंबेडकर नगर  येथील अनधिकृत झोपड्या कांदळवन कक्ष व वन विभागामार्फत निष्कासित करण्यात आल्या होत्या. सदर कारवाई …

Read More »

पर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी नाही पश्चिम घाट जैवविविधता संवर्धनाबाबत बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. तेथील जंगल, वनसंपदा तसेच पर्यावरणाला कुठल्याही वनेतर उपक्रमांमुळे हानी पोहोचू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली. पश्चिम घाट जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत  मुख्यमंत्री यांच्या वर्षा या निवासस्थानी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी …

Read More »

सफेद चिप्पी’ महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष घोषित अकोला- खांडवा पर्यायी ब्रॉडगेज व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून निवडण्याचे राज्य वन्यजीव मंडळाकडून समर्थन

मुंबई : प्रतिनिधी या शासनासाठी विकास म्हणजे केवळ बांधकामे नसून वन, वन्यजीव आणि जंगल संवर्धनासाठी हे शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे राज्य वन्यजीव मंडळाच्या यापुढील बैठकीत सादर होणाऱ्या प्रस्तावासाठी यापुढे ड्रोन सर्व्हे बंधनकारक राहील, ज्या विभागाचा प्रस्ताव असेल त्या विभागाने त्या प्रकल्पाचे छायाचित्र सादर करणे, प्रकल्पाची वस्तुस्थितीजन्य माहिती देणे आणि त्याचा पर्यावरणीय परिणाम विशद …

Read More »

खुषखबर ! पुण्यात होणार पहिल्यांदा ३० माकडांवर कोरोना लसची चाचणी माकड राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे करणार सुपूर्द-वनमंत्री संजय राठोड

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूमुळे (कोव्हीड – 19) होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तत्काळ विकसीत करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला ३० माकडांची आवश्यकता आहे. ही ३० माकडे राज्याच्या हद्दीतील घेण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधात्मक लसचा सर्वप्रथम प्रयोग …

Read More »

राज्यात ६० वाघांची नव्याने भर संख्या ३७२ वर पोहोचणार असल्याची वनमंत्री संजय राठोड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकूण ३१२ वाघ असून त्यापैकी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १६० वाघांचे अस्तित्व आहे. त्यातच येत्या वर्षभरात या परिसरात आणखी ६० नवीन वाघाच्या बछड्यांची भर पडणारआहे. त्यावर उपाय म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील ५० वाघांना राज्यातील इतर जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. यासंदर्भात नुकतीच नागपूर येथे …

Read More »

सनदी अधिकारी राहुल पाटील यांनी होणाऱ्या पत्नीसोबत दिली कोरोना विरोधी लढ्याला मदत लग्न दिवसाची आठवण म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपयांचे सहकार्य

चंद्रपूर: प्रतिनिधी आज २ मे खरं तर सध्या कोरोना नसता तर राहुल दादा आणि तेजस्विनी वहिनी यांचा लग्नं समारंभ झाला असता. राहुल पाटील हे भारतीय वनसेवेत (IFS) चंद्रपूर येथे कार्यरत आहेत. अर्थात लग्न पुढे गेल्यामुळे खुप वाईट नक्कीच वाटतय. पण त्याहीपेक्षा या दोघांचं कौतुक जास्त वाटतय, त्याच कारणही तसंच आहे. …

Read More »

वाघ, बिबटे, हरिण, काळवीटांसह वन्यप्राण्यांची काळजी घ्या वनमंत्री संजय राठोड यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील एका प्राणिसंग्रहालयातील वाघाला कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील प्राणी संग्रहालयामध्ये व वन्य प्राणी बचाव केंद्रामध्ये अधिक दक्षता घेण्यात यावी व केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.  राज्यात विविध जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अखत्यारित येत …

Read More »