Breaking News

Tag Archives: rti activist anil galgali

मंत्रालय लोकशाही दिनात महसूल आणि नगरविकास तक्रारीत अव्वल माहिती अधिकारात उघडकीस

मुंबईः प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी/ अडचणींना तत्परतेने न्याय मिळण्याची शासकीय यंत्रणा म्हणजे ‘लोकशाही दिन’ होय. हा ‘लोकशाही दिन’ जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आणि मंत्रालय स्तरावर राबविण्यात येत असतो. ११० वा मंत्रालय लोकशाही दिन संपन्न झाला असून १५०५ स्वीकृत अर्जावर सुनावणी घेण्यात आली. सरासरी १३ अर्ज लोकशाही दिनी मुख्यमंत्री यांच्या …

Read More »

माहिती अधिकार कार्यकर्ता आणि वित्त विभागामुळे सरकराच्या तिजोरीत पैसे अखेर रिलायन्सने भरले २६०० कोटी रूपये

मुंबई : प्रतिनिधी मुंबई उपनगरातील वीज ग्राहकांकडून वसूल करण्यात आलेले पैसे राज्य सरकारला भरणे बंधनकारक असतानाही रिलायन्सने २४०० कोटी रूपये भरले नाहीत. त्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रिलायन्सच्या थकबाकीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सरकारला कोटीवधी रूपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली . परंतु माहिती अधिकार कार्यकर्त्ये अनिल गलगली आणि वित्त विभागामुळे बुडीत जाणारी २४०० …

Read More »

अर्धवट मार्गावर धावणाऱ्या मोनो रेल्वेच्या खर्चात २३६ कोटींची वाढ आरटीआयमधून मिळाली माहिती

मुंबई : प्रतिनिधी देशात प्रथमच शुभारंभ करण्यात आलेली मोनो रेल्वेचा टप्पा १ आणि टप्पा २ यासाठी अपेक्षित खर्च रु २ हजार ४६० कोटी असून आता या खर्चात रु.२३६ कोटींची वाढ झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. आधीच विलंबाने मोनोरेल प्रकल्प हा मुंबईकरांच्या दृष्टीने महागडा सिद्ध …

Read More »

पंतप्रधान मोदींकडून ४६ महिन्यात जाहीरातबाजीवर ४ हजार कोटींची उधळपट्टी चोहोबाजूंच्या टिकेनंतर चालू वर्षाच्या खर्चात २५ टक्यांची कपात

मुंबई : प्रतिनिधी देशाच्या सर्वोच्च पदी अर्थात पंतप्रधान पदी विराजमान होण्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारकडून जाहीरातबाजीवर करण्यात येत असलेल्या खर्चावर प्रश्न विचारले जात होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ४६ महिन्याच्या कारकिर्दीत सरकार आणि स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर ४ …

Read More »

मुंबईतील फायर ऑडिट झालेल्या इमारतीची माहिती देण्यास अग्निशमन दलाची टाळाटाळ माहिती अधिकार कायद्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रयत्न

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील इमारतींना आगी लागण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून मुंबई अग्निशमन दलातर्फे फायर ऑडिटकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळेच आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईतील फायर ऑडिट झालेल्या इमारतीची माहिती मागितली असता सरळ आणि स्पष्ट माहिती देण्यास अग्निशमन दलाने टाळाटाळ केली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई अग्निशमन …

Read More »

सरकारने कर्जमाफी तर दिली, पण माहीतीच नाही दप्तरी जिल्हानिहाय माहिती शासनाकडे उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात उघड

मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारच्यावतीने करत १४ हजार ३८८ कोटी रूपयांच्या कर्जमाफीचा लाभ ४६ लाख ५२ हजार देण्यात आला. मात्र या कर्जमाफीचा लाभ मिळविणाऱ्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय माहितीच राज्य सरकारकडे नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. त्यामुळे …

Read More »

सिनेट निवडणुकीत मतदारांना माहिती देण्यात मुंबई विद्यापीठ उदासीन मतदानाची माहितीच मतदारांना कळविली नसल्याचा अनिल गलगलींचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक होती पण पहिल्यांदाच असे घडले की पदवीधर मतदारांना मुंबई विद्यापीठाने साद घातली नाही.मतदान कोठे आहे याची माहितीचे पत्र पाठविले नाही ना मतदार झाले असल्याचे पत्र पाठविले. मुंबई विद्यापीठ याबाबतीत उदासीन असल्याची खंत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी व्यक्त केली आहे. गलगली यांनी घाटकोपर …

Read More »

अंबानीच्या रिलायन्स वीज कंपनीचा कर कोण भरणार? ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारला करापोटी द्यावे लागणाऱ्या १ हजार ४५२ कोटी रूपयांचा भरणा न करताच उद्योगपती अनिल अंबानीने त्याची रिलायन्स वीज कंपनी अदानीला विकली. तरीही राज्य सरकार या कंपनीच्या विक्रीला मान्यता देत असल्याचे दिसून येत असून ही कराची थकीत रक्कम कोण भरणार असा सवाल करत राज्य सरकार अंबानी आणि अदानीवर …

Read More »