Breaking News

Tag Archives: pm narendra modi

पंतप्रधान मोदी, रिलायन्सच्या अनिल अंबानींची नार्को टेस्ट करा

ठाणे : प्रतिनिधी राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात डसॉल्ट कंपनी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच चर्चा केलेली आहे. या चर्चेमध्ये परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, संरक्षण सचिव, हवाई दलाचे प्रमुख आदी कोणीही सहभागी झालेले नव्हते. या खरेदी व्यवहारात देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा झाला असून हा घोटाळा उघडकीस येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

जवानांच्या नावे राजकारण करणाऱ्या भाजप सरकारला सैनिकांचाच विसर वाटपासाठी महसूल मंत्री पाटील आणि मुख्यमंत्री फडणवीसांना जमिनच मिळेना

मुंबई : गिरिराज सावंत केंद्र आणि राज्यातील सत्ता मिळविण्यासाठी अतिरेक्यांच्या हल्ल्यात लष्करातील हुतात्मा सैनिकांच्या बलिदानाचा वापर भाजपने केला. परंतु सत्तास्थानी विराजमान झाल्यापासून भाजपच्याच महाराष्ट्रातील भाजप सरकारला या लष्करी सैनिकांचाच विसर पडला असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून विविध युध्दात आपल्या कर्तबगारीने देशाच्या विजयात मानाचा तुरा खोवणाऱ्या सैनिकांना उपजिविका आणि निवाऱा …

Read More »

आर. के. लक्ष्मण यांचे काम ‘टाईमलेस’ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 'टाईमलेस लक्ष्मण' पुस्तकाचे प्रकाशनावेळी प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी आर. के. लक्ष्मण यांनी व्यंगचित्राद्वारे केलेले काम ‘टाईमलेस’ राहील, असे गौरवोदगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. व्यंगचित्रकार म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त दिवंगत आर. के. लक्ष्मण अर्थात रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण यांच्या कारकिर्दीवर आधारित ‘टाईमलेस लक्ष्मण’ पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजभवन येथे करण्यात आले आहे. यावेळी राज्यपाल चे. …

Read More »

राफेलच्या निकालाबाबत सरकारने केलेल्या अर्जाबाबत सांगता येणार नाही संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांची सारवासारव

मुंबई: प्रतिनिधी संरक्षणासाठी राफेल विमान खरेदीप्रश्नी न्यायालयाने दिलेल्या निकालात दुरूस्ती करण्यासाठी केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अर्जाबाबत सांगता येणे योग्य होणार नाही. सदरची बाब न्यायालयीन असून न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्राने सर्व कागदपत्रे दाखल करण्यात आली होती. या दस्तऐवज नुसार न्यायालयाचे लेखी आदेश येणे अपेक्षित होते. या आदेशात काही शब्द या कागदपत्राला …

Read More »

राफेलबाबत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि देशाची माफी मागावी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहाराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निकालामुळे सत्याचा विजय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राजकीय फायद्यासाठी खोटे आरोप करून देशाची सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, देशातील जनतेची आणि सैनिकांची माफी मागावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब …

Read More »

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर पटेल यांचा राजीनामा वैयक्तीक कारणामुळे राजीनामा दिल्याची पटेल यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या पतधोरणाबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त टीका करणाऱ्या माजी गर्व्हनर रघुराम राजन यांचा उत्तराधिकारी म्हणून उर्जित पटेल यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. परंतु पटेल यांच्या नियुक्तीच्या कालावधीत केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे त्यांची बँकेचा कारभारावर देशभरातून टीका झाली. त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर …

Read More »

चार वर्षात भाजपच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा कमाविला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचा आरोप

दर्यापूर : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना दुष्काळी उपाययोजना करण्याऐवजी सरकारमधील मंत्री बेताल वक्तव्ये करून जनतेची क्रूर थट्टा करत आहेत. चार वर्ष भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा कमावल्याने भाजपचे मंत्री मस्तवाल झाले आहेत. आगामी निवडणुकीत पराभवाची धूळ चारून जनता भाजपच्या नेत्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

महसूल विभागाच्या गलथान कारभारामुळे सरकारला ५० हजारांचा दंड भारत-पाक युध्दातील जवान असूनही जमिनीच्या प्रतिक्षेत

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात शहीद आणि जवानांच्या नावावरून राजकारण करणाऱ्या राज्यातील भाजप सरकारच्या गलथान कारभाराचा फटका एका भारत-पाक युध्दात मर्दमुकी गाजविणाऱ्या सैनिकाला बसला आहे. तसेच या कारभारामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ५० हजार रूपयांचा दंड ठोठावून तीन महिन्यात या शुरवीर सैनिकाला जमिन देण्याचे आदेश सरकारला देवून ११ महिने …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे ना टेंडर ना वर्क ऑर्डर सरकार दिशाभूल करत असल्याचा प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी २०१५ मध्ये बिहारच्या निवडणूका डोळयासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले होते. तीन वर्षात हालचाल होत नाही…स्मारकाचे डिझाईन फायनल होत नाही…टेंडर काढण्यात येत नाही…वर्क ऑर्डर निघत नाही… ६ डिसेंबर आले म्हणून एखादया अधिकाऱ्याला न्यायचे आणि खोदकाम सुरु करायचं आणि लोकांची दिशाभूल …

Read More »

भाजप नावाच्या कॅन्सरला मुळापासून उघडून टाका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे आवाहन

अमरावती: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष हा देशाला जडलेला कॅन्सर आहे. आगामी निवडणुकांत हा कॅन्सर मुळापासून उखडून टाकला नाही तर देशाचे वाटोळे होईल. या देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी भाजपरूपी कॅन्सरवर शस्त्रक्रिया करू त्याला मुळासकट उखडून टाकले पाहिजे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली. …

Read More »