Breaking News

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर पटेल यांचा राजीनामा वैयक्तीक कारणामुळे राजीनामा दिल्याची पटेल यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या पतधोरणाबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त टीका करणाऱ्या माजी गर्व्हनर रघुराम राजन यांचा उत्तराधिकारी म्हणून उर्जित पटेल यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. परंतु पटेल यांच्या नियुक्तीच्या कालावधीत केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे त्यांची बँकेचा कारभारावर देशभरातून टीका झाली.

त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर ऊर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत बँकेच्या कारभारावर होणाऱ्या टीकेतून तात्पुरती स्वरूपात सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला.

केंद्र सरकारच्य नोटबंदीच्या निर्णयानंतर माजी गर्व्हनर रघुराम राजन यांनी टीका करत बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर प्रमुख वित्तीय सल्लागार सुब्रमण्यम यांनीही नोटबंदीला ड्राक्युनियन असा शब्द वापरत त्या निर्णयावर कालच जोरदार टीका केली. त्यामुळे उर्जित पटेल यांच्या कारभारावर अनेक प्रश्न निर्माण झाले.

परंतु ऊर्जित पटेल यांच्या राजीनाम्यामुळे मोदी सरकारला मोठा झटका बसला आहे.

Check Also

आयएमईसी कडून भारत- युएई दरम्यान आर्थिक कॉरिडॉरचे काम सुरु आर्थिक कॉरिडॉरसाठी देशाकडून प्रयत्नांची पराकाष्ठा

पश्चिम आशियाच्या संकटामुळे महत्त्वाकांक्षी भारत-मध्य पूर्व EU आर्थिक कॉरिडॉर आयएमईसी (IMEC) प्रकल्पाला अनिश्चिततेने ग्रासले असताना, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *