Breaking News

Tag Archives: pm narendra modi

पॅकेज-५: राज्यांना यापूर्वीच काहीस दिलयं: ओव्हर ड्राफ्ट देण्याची रिझर्व्ह बँकेला विनंती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशावर कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन करावे लागले. त्यामुळे प्रत्येक राज्यातील आर्थिक व्यवहार ठप्प झालेले असल्याने आर्थिक प्रश्नांनी आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केलीय. तत्पूर्वीच राज्यांना जीएसटी वसूली पोटी द्यावयाची रक्कम एप्रिल महिन्यातच दिली आहे. तर आजाराचा सामना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयांकडून ४ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याचे सांगत आलेल्या …

Read More »

पॅकेज सर्वसामान्यांसाठी की धनदांडग्या उद्योगपतींसाठी? मंत्री अशोक चव्हाण यांचा केंद्र सरकारला संतप्त सवाल

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारचे पॅकेज कोरोनामुळे होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्यासाठी आहे की धनदांडग्या उद्योगपतींची घरे भरण्यासाठी आहे, असा सवाल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. कोरोना पॅकेजच्या नावाखाली केंद्र सरकारने नवीन आर्थिक धोरणे जाहीर करण्याचा सपाटा सुरू केला आहे. कोरोनाविरूद्ध आज सुरू असलेल्या लढाईशी …

Read More »

पॅकेज ४- आत्मनिर्भर भारतासाठी संरक्षण, अंतराळ, कोळसा, खाण उद्योगात खाजगी कंपन्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून घोषणा

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी कोरोना संकटाला संधीत रूपांतरीत करण्यासाठी आत्मनिर्भर भारताचा नारा देत लोकल टू ग्लोबल बनण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यातील ४ थ्या टप्प्यात अंतराळ, ऑटोमिक एनर्जी, संरक्षण, इस्त्रो, खाणी, विमानतळ, वीज वितरण, रिमोट सेंन्सिंग आदी क्षेत्रातील सरकारची एकाधिरशाही संपुष्टात आणत खाजगी गुंतवणूकदारांच्या मदतीने …

Read More »

सोने जमा करणे ही जुनीच योजना – भाजपाच्या दोन पंतप्रधानांनी राबविली काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती

कराड : प्रतिनिधी कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने सर्व धार्मिक संस्थांकडून सोने परतीच्या बोलीवर कर्जरूपाने घ्यावे आणि त्या बदल्यात १ ते २% व्याज देखील द्यावे अशी सूचना मी काल केली होती. काही समाज विघातक व्यक्तींनी माझ्या सूचनेचा विपर्यास करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मी केलेली सूचना …

Read More »

कोरोना लढ्यासाठी देवस्थानातील १ ट्रिलियन किंमतीचे सोने ताब्यात घ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेले आहेत. त्याचा फटका अनेकत कष्टकरी, कामगार आणि उद्योजकांना बसत असून सरकारची तिजोरीही रिकामी होत चालली आहे. यापार्श्वभूमीवर निधीची आवश्यकता भासणार असल्याने देशातील सर्व देवस्थानात पडून असलेले १ ट्रिलियन अर्थात ७६ लाख कोटी रूपये किंमतीचे …

Read More »

२० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजसोबत ४ था लॉकडाऊन १८ मेपासून सर्वस्तरातील घटकांचा विचार पॅकेजमध्ये केल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील तीन टप्प्यात लॉकडाऊन होता. मात्र त्या सर्वांपेक्षा वेगळा आणि नवा लॉकडाऊनचा ४ था टप्पा सुरु होणार आहे. देशातील रस्त्यावर विक्री करणारा, फुटपाथवरचा ठेलेवाला यांच्यासह कुटीरोद्योग, लघु उद्योग, गृह उद्योग, छोटे-मोठे उद्योग यासह संपूर्ण उद्योग जगातासाठी २० लाख कोटी रूपयांचे विशेष आर्थिक पॅकेज भविष्यकाळात देशाला आत्मनिर्भर …

Read More »

लॉकडाऊनचा ४ था टप्पा १८ तारखेपासून सर्वांनी आराखडा तयार करून १५ मे पूर्वी पाठविण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता पुढची रणनीती तयार करावी लागणार आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना पूर्व आणि कोरोनानंतरची परिस्थिती असे दोन भाग पाडावे लागणार आहे. त्यामुळे पुढच्या लॉकडाऊनबाबत १५ तारखेपूर्वी आपल्याला आपल्या राज्यात कशा प्रकारे रचना करता येईल याचा आराखडा तयार करून केंद्राकडे द्या. आम्ही त्यावर विचार करून १८ …

Read More »

पंतप्रधान मोदीजी, ” पुढील दोन महिने कोरोनाचा उच्चांक येण्याचे ऐकले, जीएसटीचा परतावा द्या” मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी आपण एप्रिल मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला. मात्र आता असे सांगण्यात येते की मेमध्ये या रोगाचा उच्चांक येईल, तो जून , जुलैमध्येही येऊ शकतो असे बोलल्या जाते. वूहानमध्ये परत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झालाय असे मी वाचल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगत जागतिक आरोग्य संघटनेने …

Read More »

२१ दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये कोरोनावर मात करण्याच्या बाता हवेतच देशाला संकटात ढकलून मोदी सरकारचे हात वर; देश आता रामभरोसे ?: सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने रेल्वे सुरू करण्याचा घेतलेला निर्णय आणि केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांचे कोरोनाबरोबर जगायला शिका असे म्हणणे याचा अर्थ मोदी सरकारने करोनाविरुद्धच्या लढाईत हात वर केले आहेत. संकट मोठे असतानाही देशाला मोदींनी राम भरोसे सोडले आहे का? केंद्र सरकारकडे आता काही उपाय शिल्लक राहिले नाहीत …

Read More »

श्रमिक ट्रेन्सबरोबर आता प्रवासी रेल्वेही सुरु होणार : परंतु निवडक ठिकाणीच रेल्वे मंत्रालयाकडून पत्रक जाहीर

नवी दिल्ली- मुंबई: विशेष प्रतिनिधी विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक नागरिक आपल्या मूळ ठिकाणाहून इतरत्र अडकल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी विशेषत: स्थलांतरीत कामगारांसाठी श्रमिक कामगारांसाठी श्रमिक ट्रेन्स सुरु केल्या. आता त्या पाठोपाठ विशेष प्रवासी वाहतूकीच्या गाड्याही १२ मे पासून सुरु कऱण्याचा …

Read More »