Breaking News

Tag Archives: pm narendra modi

मुख्यमंत्री ठाकरेंनी लिहिले पंतप्रधान मोदींना पत्र, म्हणाले हस्तक्षेप करा मेडिकलच्या परिक्षा डिसेंबरनंतर ठेवा

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया परिक्षा घेण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर करत जुलै महिन्यात परिक्षा घेण्यास सांगितले. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांची परिक्षा आयोजित केली तर प्रत्यक्ष रूग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी डॉक्टरांची कमतरता जाणवेल. त्यामुळे या परिक्षा पुढे ढकल्यासाठी आपण हस्तक्षेप …

Read More »

केंद्रांच्या निर्णयानंतर ठाकरे सरकार चीनी कंपन्यांबाबत निर्णय घेणार, सध्या जैसे थे उद्योचग मंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी लडाख येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या चीन सैनिकांच्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात चीनच्या विरोधात भावना निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुंतवणूकीच्यादृष्टीने चीनी कंपन्यांसोबतच्या सांमज्यस कराराला जैसे थे ठेवण्याचे धोरण स्विकारले असून यासंदर्भात केंद्र अर्थात मोदी सरकारने धोरण स्पष्ट केल्यानंतरच गुंतवणूकीला मान्यता द्यायची कि रद्द करायचे याबाबतचा निर्णय घेण्यात …

Read More »

मोदीजी, महागाईने सामान्य जनतेचे चिपाड झाले, अजून किती पिळणार? पेट्रोल-डिझेलचा समावेश GST अंतर्गत करा; सध्याची दरवाढ त्वरीत मागे घेण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: प्रतिनिधी सहा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वारंवार कमी होत असतानाही त्याचा लाभ मोदी सरकारने सामान्य जनतेला दिलेला नाही. उलट सलग तेरा दिवसापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवल्या जात असून जनतेची लूट थांबवण्याचा मोदी सरकारचा मानस दिसत नाही. आधीच कोरोनाचे संकट व त्यात महागाईने पिचलेल्या पिळून पिळून रस काढलेल्या उसाप्रमाणे …

Read More »

चीनला ‘लाल डोळे’ दाखवा अन्यथा ‘चीनी खुळखुळे’ वाजवत बसा मोदींना राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून 'चिनी खुळखुळे' भेट

मुंबई: प्रतिनिधी चीनने केलेल्या हल्ल्यात आपले जवान शहीद झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चिनी खुळखुळे’ भेट पाठवून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला. चीन सातत्याने भारतावर हल्ले करत आहे. त्यामध्ये आपले …

Read More »

कोरोनावरील महाराष्ट्राच्या उपचार पध्दतीला मान्यता द्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी राज्याकडे पीपीई किट्स, एन ९५ मास्कची उपलब्धता आहे मात्र विशेषत: ग्रामीण भागासाठी व्हेंटीलेटर्सची गरज भासणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत राज्यात कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी विविध औषधांचा समावेश असलेली पध्दत वापरण्यात येत आहे. त्यास रूग्णांकडून प्रतिसादही मिळत असून अनेक रूग्ण बरे होत आहेत. त्यामुळे त्यास मान्यता द्यावी अशी …

Read More »

पहिला रूग्ण सापडण्याआधीच पंतप्रधानांना कोरोना संकट माहित होते केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशात कोरोनाचा पहिला रूग्ण सापडण्याआधी या संसर्गजन्य आजाराची आणि यामुळे निर्माण होत असलेल्या संकटाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मादी यांना होती असा गौप्यस्फोट केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केला. जावडेकर हे ११ जून रोजी सौराष्ट्र आणि मध्य गुजरातमध्ये ऑनलाईन जनसंवाद रॅलीला संबोधित करत होते. तसेच या …

Read More »

चीनने घुसखोरी करुन भारताचा भूभाग बळकावला की नाही याची माहिती द्या चीनला लाल डोळे करुन दाखवण्याची हिच योग्य वेळ : सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी चीनने सीमेवर घुसखोरी करून भारताचा भूभाग बळकावला असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून प्रसारमाध्यमातून येत असून सत्य परिस्थिती काय आहे ? हे मोदी सरकारने जनतेला सांगण्याची आवश्यकता आहे. चीनने खरेच सीमेवर आगळीक केली असेल तर मोदींनी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे चीनला लाल डोळे वटारून दाखवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे प्रदेश काँग्रेस …

Read More »

केंद्रीय मंत्री आठवलेंनी लाईक केले या मोदी विरोधी ट्विटला ऊर्जा मंत्री राऊत यांचे ट्विट

मुंबई: प्रतिनिधी राज्य असो किंवा केंद्र असो बदलत्या राजकारणाचे वारे ओळखणारे राजकारणी जे काही आहेत. त्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे फार वरचे स्थान आहे. या बदलत्या राजकारणाचा अंदाज घेवून राजकिय आघाड्या करण्यातही त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न, कोरोनाची वाढती संख्या आणि आर्थिक …

Read More »

पावसाळी अधिवेशनात केंद्राने नव्याने पुरवणी अर्थसंकल्प मांडावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

कराड: प्रतिनिधी कोरोना महामारीच्या लॉकडाउन मुळे निर्माण झालेल्या गंभीर आर्थिक परिस्थितीत केंद्र शासनाने १ फेब्रुवारी ला सादर केलेले वार्षिक अंदाजपत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ करीता अंदाजित केलेले राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) कर व कराशिवाय महसूल, कर्जाद्वारे उभा करावयाचा निधी तसेच विकास कामांवरील नवीन प्राधान्यक्रम अशा सर्वच आकड्यांचे संदर्भ बदलले …

Read More »

केंद्राच्या प्रस्तावित वीज (सुधारणा) विधेयक २०२० मुळे संघराज्य रचनेला सुरुंग ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने प्रस्तावित वीज (सुधारणा) विधेयक बिल २०२० मुळे घटनेचे स्पष्ट उल्लंघन करून संघराज्य रचनेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण करून वीज क्षेत्रात कार्यक्षमता वाढवणे व  पारदर्शकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी व्यक्त केले. प्रस्तावित वीज (सुधारणा) विधेयक बिल …

Read More »