Breaking News

Tag Archives: ncp

विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबण्याकरीता केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर

भाजपा विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबण्याकरीता केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असून विरोधकांना ठरवून तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केला जात असल्याची शंका देशातील जनतेच्या मनात असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केले. कोर्टाने खासदार संजय राऊत यांचा पत्राचाळीशी काहीही संबंध नाही तरी त्यांना गोवण्यात आले. नेत्यांना ठरवून …

Read More »

अखेर सत्तारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, सगळेच तारतम्य पाळतात असे नाही.. महाराष्ट्रातून प्रतिक्रिया उमटल्याने आता याच्या खोलात जाण्याची गरज नाही

शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांसह राज्यभरातून यासंदर्भात प्रतिक्रिया उमटली. त्याचबरोबर भाजपाने  याप्रश्नी नापसंती दर्शविली. या सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर ट्विटद्वारे भाष्य करत सगळेच तारत्मय पाळतात असे नाही असे सांगत आता …

Read More »

देवेंद्र फडणवीस अखेर म्हणाले, अब्दुल सत्तार बोलले त्याचे समर्थन…

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ऑन कॅमेरा शिवी दिली. त्यानंतरही सत्तार यांनी सुळे यांच्याबाबत बोलताना मर्यादा सोडली. सत्तार यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी …

Read More »

अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी गप्प बसणार नाही राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची घेतली भेट...

जोपर्यंत अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करावे यासाठी आज राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन मागणी केली. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, मंत्री अब्दुल सत्तार …

Read More »

जयंत पाटील यांचा पंतप्रधान मोदींना टोला, नोटबंदीचा दुखवटा अजून सरला नाही

देशात निर्माण होणाऱ्या काळा पैस्याला आळा घालण्यासाठी ११ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत देशात नोटबंदी जाहीर केली. या नोटबंदीमुळे रोजच्या आवश्यक जगण्यासाठीही नागरीकांना पैसे राहिले नाहीत. तसेच स्वत:जवळच्या ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बदलण्यासाठी सर्वसामान्य नागरीकांना हातातील कामे बाजूला ठेवत बँकेच्या रांगेत उभा रहावे लागले. …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सत्तार यांच्या घरावर निदर्शने

औरंगाबाद येथे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अश्लिल शिवी देत आक्षेपार्ह विधान केले. शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबिरात खोक्यावरून सुळे यांनी डिवचल्याबाबत प्रसार माध्यमांनी विचारले असता अब्दुल सत्तार यांनी शिवी देत विधान केले. सत्तार यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या …

Read More »

राष्ट्रवादीचा इशारा, २४ तासाच्या आत सत्तारांची हक्कालपट्टी करा अन्यथा…

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ऑन कॅमेरा शिवी देत अवमान केला. या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची २४ तासाच्या आत हक्कालपट्टी करण्याची आग्रही मागणी केली. विशेष म्हणजे कृषी मंत्री अब्दुल …

Read More »

अजित पवार म्हणाले, निकालामुळे ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाला घटनात्मक चौकट सामाजिक न्यायाच्या चळवळीला आर्थिक निकषाचा आयाम देणारा क्रांतिकारी निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने राज्य घटनेतील १०३ कायद्यात दुरूस्ती करत आर्थिक दुर्बल घटकांना दिलेल्या आरक्षणाचा कायदा वैध ठरविला. तसेच या कायद्यामुळे राज्य घटनेच्या मुळ डाच्याला धक्का पोहोचत नसल्याचे स्पष्ट केले. या निकालावर राज्यातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले, दहा टक्के आरक्षण कायम राहिल्याने समाजातील एका मोठ्या …

Read More »

अब्दुल सत्तार सुप्रिया सुळेंना म्हणाले, भिक्कार## झाली असेल तर…

वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असणारे शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री तथा शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना औरंगाबादेत वृत्तवाहीनीशी बोलताना शिवी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लोकशाही या वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीने सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी अब्दुल सत्तार यांच्याकडे विचारणा केली. त्यावर अब्दुल …

Read More »

एकेरी वाटणारी पण नोटामुळे चुरसीच्या निवडणूकीत ऋतुजा लटके विजयी

अंधेरी पोटनिवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार भाजपाने आपला उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार स्व.रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र मतदानाची टक्केवारी पाहता ही …

Read More »