Breaking News

Tag Archives: ncp

जयंत पाटील यांचा टोला, भाजपाने टोळीबरोबर आघाडी केलीय राष्ट्रवादी मंथन... वेध भविष्याचा' या टॅगलाईनखाली राष्ट्रवादीचे शिर्डीत ४ - ५ नोव्हेंबरला शिबीर...

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यांची दिवाळी दुःखात गेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे होते, त्यांना दिलासा द्यायला हवा होता. मात्र तसे होताना दिसले नाही. सरकारमध्ये गतीमानता दिसत नाही हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत …

Read More »

जयंत पाटील यांचा डॉ भागवत कराड यांना टोला, सरकार फक्त पत्रावर चालत नाही

मराठवाड्यातील कोणत्याही प्रकल्पाला मी नकार दिलेला नाही. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी खोटे बोलणे बंद करावे. औरंगाबादकरांना इम्प्रेस करण्यासाठी भागवत कराडांचा उद्योग सुरू असल्याचे जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिले. मराठवाड्यातील प्रकल्प मंजूर करण्यास जयंत पाटील यांनी नकार दिला असे वक्तव्य …

Read More »

शरद पवार रुग्णालयात दाखल

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जाण्यावरून राज्यातील वातावरण तप्त झाले असतानाच महाविकास आघाडीमधील महत्वाचे नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज रुग्णालयात दाखल करण्यात आले. आजपासून तीन दिवस ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल राहणार असले तरी ४ नोव्हेंबर पासून शिर्डीत होत असलेल्या दोन दिवसीय पक्षाच्या शिबिराला मात्र हजेरी लावणार आहेत . महाराष्ट्रातील प्रकल्प …

Read More »

महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गेल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तूतू-मैमै करण्यापेक्षा.. मुख्यमंत्री शिंदेंनी सर्व पक्षिय बैठक बोलवावी

आधीच दोन मोठे प्रकल्प राज्यातून गुजरात गेल्यानंतर आज तिसरा उद्योग अर्थात सॅफ्रनचा प्रकल्पानेही आता महाराष्ट्राऐवजी हैद्राबादला पसंती दिल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली फारच सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, या सगळ्या घटनांवर …

Read More »

त्या दोन मोठ्या प्रकल्पानंतर आता सॅफ्रन पण महाराष्ट्राबाहेर

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधासभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प आणणार असून राज्यात मोठी गुंतवणूक आणणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर काही दिवसांचा अवधी जात नाही. तोच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाने गुजरातचा रस्ता धरला. त्यास काही दिवस जात नाहीत तोच टाटाचा एअर बस प्रकल्पही महाराष्ट्रातून बाहेर पडल्याची माहिती बाहेर आलेली असतानाच विमान …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, दिवस येतात आणि जातात जरा धीर धरा… महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न;मात्र महाराष्ट्र कमकुवत होणार

महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र महाराष्ट्र कमकुवत होणार नाही. दिल्लीला देखील आधार देण्याचं काम महाराष्ट्र करतो हे कुणीही विसरू नये अशी टीका करत महाराष्ट्र कधी झुकला नाही झुकणारही नाही. दिवस येतात आणि दिवस जातात जरा धीर धरा आपले दिवस परत येतील असा सबुरीचा सल्ला राज्याचे माजी मंत्री …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, एअरबस प्रकल्पासाठी रतन टाटांना पत्र लिहिले…

सुमारे २२ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात होणे अपेक्षित असतांना सदरचा प्रकल्प गुजरातला होत आहे. महाराष्ट्रात येणारे अनेक महत्वाचे प्रकल्प हे इतर राज्यात पळविले जात आहे, ही बाब महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय चिंताजनक असून सदरचा प्रकल्प हा नाशिकच्या एचएएल कंपनीत राबविण्यात यावा अशी मागणी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, एकच मंत्री तीन वेळा वेगवेगळी वक्तव्य करतो याचा अर्थ काय?

सरकारमधील एकच मंत्री तीन वेळा प्रकल्पाबाबत वेगवेगळे वक्तव्य करतात याचा अर्थ सरकारमध्ये ताळमेळ नाही किंवा हे मंत्री लोकांची दिशाभूल करत आहेत. मेरीटवर प्रकल्प येत असताना असं काय घडलं की तिन्ही प्रकल्प दुसर्‍या राज्यात जाण्याचं कारण काय हे सत्य नागरीक म्हणून जाणून घेण्याची गरज आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया …

Read More »

एकनाथ खडसे म्हणाले,..तर मी तुमच्या बोकांडी बसेन

भोसरी प्रकरणावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खडसे यांचे विरोधक तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भोसरी प्रकरण उचलून धरलं आहे. भोसरी प्रकरणावरून थेट विधिमंडळात चर्चा करण्याची मागणी महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावरून एकनाथ खडसे यांनी …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल, अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार?

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारला नुकतेच तीन महिने पूर्ण झाले. या तीन महिन्यात पहिल्यांदा वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क आणि आता टाटाचा नागपूर येथील एअर बस प्रकल्प गुजरातला गेला. त्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यासंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारला …

Read More »