Breaking News

Tag Archives: nawab malik

आशिष शेलार, “चोर के दाढी मे तिनका” मग “दाढीवाला चोर कोण”? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मलिक यांचे आशिष शेलारांना नाव सांगण्याचे आव्हान

मुंबई: प्रतिनिधी शरद पवारांनी काल भाष्य केल्यानंतर ‘चोर के दाढीमे तिनका’ असं वक्तव्य भाजपचे माजी मंत्री आशिष शेलार यांनी केले. मात्र त्यांनी ‘दाढीवाला चोर कोण’ त्याचं नांव काय हे आशिष शेलारांनी सांगितले पाहिजे असा जोरदार उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला. आजपासून दर …

Read More »

मत्स्य व्यवसायात उपाय सुचविणाऱ्यांसाठी ‘महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज’ मंत्री नवाब मलिक, अस्लम शेख यांच्या उपस्थितीत उपक्रमाचा शुभारंभ

मुंबई : प्रतिनिधी कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे औचित्य साधून ‘महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज’ उपक्रमाचा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते आणि मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. मत्स्य व्यवसाय विभागातील समस्या …

Read More »

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत २० हजार जणांना प्रशिक्षण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्व …

Read More »

भाजपाच्या प्रतिविधानसभेवर विधानसभा करणार कारवाई उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची घोषणा

मुंबईः विशेष प्रतिनिधी ओबीसी प्रश्नी गोंधळ झाल्यानंतर विधानसभेच्या कामकाजावर भाजपाने बहिष्कार टाकला. त्यानंतर आज सकाळी भाजपा सदस्यांनी सभागृहाच्या कामकाजात सहभागी न होता विधानभवनाच्या पायऱ्यावर प्रति विधानसभा भरवून कामकाज करण्यास सुरुवात केली. मात्र या कृत्यावर विधानसभेत चर्चा होवून सदरप्रकरणी कारवाई केली जाणार असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जाहीर केले. सकाळी …

Read More »

ते वृत्त दिशाभूल करणारे; तिन्ही कृषी कायदे रद्द झाले पाहिजेत हीच पक्षाची भूमिका राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांचा खुलासा

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायदे पूर्णत: रद्द करण्याऐवजी त्यातील शेतकऱ्यांना अडचणीचे वाटणारे मुद्दे वगळून राज्यात सुधारीत कायदा आणावा असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी डि.वाय.पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या उद्घाटनानंतर दूरचित्रवाणीच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. त्यावर विविध तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांनी यासंदर्भात …

Read More »

मनपाच्या शाळांमध्ये आयबीचा अभ्यासक्रम होणार सुरु पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सीबीएसई आणि आयसीएसई अभ्यासक्रमाचे मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळू लागले आहे. मनपाच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी आता लॉटरी काढावी लागली, यातच या शाळांचे यश असून प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. …

Read More »

नेत्यांना व पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याचे कटकारस्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी आमच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी व पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू असल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व परिवाराच्याबाबतीत ज्या पध्दतीने बातम्या पेरण्यात येत आहेत ते चुकीचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. साखर कारखाना ईडीने सील केला आहे. ज्या काही …

Read More »

राजभवनाच्या अपुऱ्या ज्ञानावर राष्ट्रवादीचा उपरोधिक टोला न्यायालयाच्या निर्णयाची माहिती राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही

मुंबई: प्रतिनिधी ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि निर्णय याबाबत राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांच्या पत्रावर नाराजी व्यक्त करत राजभवनाच्या अपुऱ्या ज्ञानावर उपरोधिक टोलाही लगावला. दरम्यान राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र …

Read More »

राज्यपालांच्या पत्राला राष्ट्रवादीचे उत्तर …आमदार नियुक्तीचे प्रकरण निकाली काढा विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मताने जिंकू - मलिक

मुंबई: प्रतिनिधी आमदारांचे कोरोना रिपोर्ट आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अंतिम निर्णय होईल. परंतु आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती, त्यापेक्षा जास्त मताने जिंकू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या …

Read More »

दररोज १५ लाख लोकांना लस देण्याची तयारी नागरिकांच्या आरोग्याच्या हित जपले जाईल कोणतीही उणीव भासू देणार नाही- मुख्यमंत्री ठाकरे

 मुंबई : प्रतिनिधी तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असताना आपल्याला अधिक सावध राहिले पाहिजे, जगात इतरत्र कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्णसंख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय महत्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाची दररोज १५ लाख लसीकरणाची तयारी असल्याचे स्पष्ट केले. …

Read More »