Breaking News

Tag Archives: mumbai police

मुंबई पोलिसांवर दोषारोप न ठेवता न्यायालयाने तपास सीबीआयला दिला सीबीआयला सहकार्य करणार असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता स्व. सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येच्या तपासावरून सुरु झालेल्या राजकिय आरोप-प्रत्यारोपाचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे अखेर शेवट झाला. न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर कोणताही दोषारोप न ठेवता मुंबई पोलिसांकडे असलेला हा तपास राजपूतच्या कुटुंबिय आणि बिहार सरकारच्या मागणीनुसार सीबीआयकडे वर्ग करण्याचा निर्णय दिला. हा तपास …

Read More »

सुशांतसिंग राजपूतप्रकरण : पार्थची मागणी पवारांचे संकेत आणि तपास सीबीआयकडे शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांच्या भेटीमागचे इंगित

मुंबई: विशेष प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता स्व. सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी केली. ही मागणी जरी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगेच फेटाळून लावली. मात्र त्यानंतर काही दिवसांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी शरद …

Read More »

मुंबई पोलिसांनी जी लपवाछपवी केली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का? भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर या निर्णयाचे स्वागत करीत भाजपा नेते आमदार. अँड. आशिष शेलार यांनी राज्य सरकारने आतापर्यंत या प्रकरणात लपवाछपवी केली होती आता तरी सीबीआयला सहकार्य करा, अन्यथा जनप्रक्षोभाला समोरे जावे लागेल, असा इशारा राज्य सरकारला दिला. भाजप …

Read More »

बिहार समर्थक महाराष्ट्र भाजप नेत्यांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या पदकांमध्ये बिहार पोलिसांना यावर्षी एकही पदक मिळालेली नाही. त्याचवेळी महाराष्ट्र पोलिसांना तब्बल ५८ पदकं मिळाल्याने बिहार पोलिसांचे गुणगान गाणाऱ्या व महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या बिहार समर्थक राज्यातील भाजपा नेत्यांना प्रचंड दुःख झाले असेल. हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही श्रीरामचरणी प्रार्थना, अशी खोचक …

Read More »

मुंबईत आलेल्या बिहारच्या त्या एसपींची महाराष्ट्र पोलिसांनी केली व्यवस्था राज्याच्या पोलिस महासंचालकांनी दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी बॉलीवूड स्टार सुशांतसिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या तपासासाठी आलेल्या बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत आले. मात्र या पथकात असलेले पोलिस अधिक्षक विनय तिवारी यांना होम क्वारंटाईन करण्यास सांगितल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. त्यामुळे अखेर महाराष्ट्र पोलिसांनी सदर पोलिस अधिक्षकांना गोरेगांव येथील एसआरपीएफमधील सदनिका उपलब्ध करून …

Read More »

दोन दिवसातच मुंबई पोलिस उपायुक्तांच्या झालेल्या बदल्या रद्द पुन्हा मुळ जागी हजर राहण्याचे आदेश मुंबई सहपोलिस आयुक्तांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी मुंबई शहरातील उपायुक्तांच्या बदल्यांचे ३ जुलै रोजी जारी करण्यात आले होते. मात्र आज अचानक ३ जुलै रोजी काढण्यात आलेले बदल्यांचे आदेश आज रद्द करण्यात आल्याचे पोलिस विभागाकडून जाहीर करत बदली झालेल्या सर्वांना आपल्या पूर्वीच्या ठिकाणी पुन्हा नियुक्त होण्याचे आदेश बजाविण्यात आले आहे. यासंदर्भात गृहविभागाशी संपर्क जाणून घेण्याशी प्रयत्न …

Read More »

पोलिसांबरोबर काम करू, एकतर गाडीची व्यवस्था करा नाहीतर घराजवळ नियुक्ती द्या संघटनेचे प्रशासनाला पत्र

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्शवभूमीवर मुंबईतून परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मुळ गावी जात आहेत. या कामगारांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी पोलिस दलास मदत करण्यासाठी मंत्रालयातील १४५७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र मंत्रालयातील अनेक कर्मचारी हे उपनगरात रहात असल्याने त्यांच्या येण्यासाठी सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांच्या येण्यासाठी एक तर …

Read More »

पोलिसांच्या दिमतीला १९ अवर सचिवांची नियुक्ती : डिव्हॅल्युएशन झाल्याची भावना ग्रामविकास विभागातील कर्मचारी का कमी ?

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत कामगारांचा प्रश्न जटील बनत चालला आहे. त्यामुळे या कामगारांना योग्यरित्या त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी पोलिसांच्या मदतीला मंत्रालयातील १४०० कर्मचारी-अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र यात क्लार्क, टायपिस्ट, असिस्टंट यांच्याबरोबर अवर सचिवांची नियुक्ती करण्यात आल्याने आमचं डिव्हॅल्युएशन केले की काय असा सवाल या नियुक्त अवर सचिवांकडून उपस्थित …

Read More »

मंत्रालयातील १५०० कर्मचारी-अधिकाऱ्यांना नेमले पोलिसांच्या मदतीला ४० वर्षाच्या आतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगर, पुणे महानगरातून स्थलांतरीत मजूर आपल्या मूळ गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र या मजूरांच्या पाठविणीसाठी पोलिस यंत्रणेकडे आणि राज्य सरकारच्या कंट्रोल रूमकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने या कामगारांना पाठविण्याच्या कामात अडचणी येत होते. त्यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने अखेर मंत्रालयातील ४० वर्षाच्या आतील १४२१ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. …

Read More »

मुंबई- पुणेकरांनो ऐकत नाही ना काढून घेतल्या तुमच्या सवलती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी लॉकडाऊन मध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द केली असून अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. २० एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे …

Read More »