Breaking News

Tag Archives: modi government

अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या सुरुवातीलाच राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या, देश बदलतोय… मोदी सरकारचे तोंड भरून कौतुक

भारताच्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मु यांची निवड झाल्यानंतर आजपासून सुरु होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनानिमित्त राज्यसभा आणि लोकसभा सभागृहाच्या दोन्ही सदस्यांच्या संयुक्त बैठकीत अभिभाषण करताना राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या की, आपला देश बदलत असून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीमुळे आता लोकांचा भारताकडे दृष्टीकोन बदलतोय. आपण ज्याची कामना करत होतो तो आधुनिक भारत …

Read More »

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काश्मीरात स्थगितः काँग्रेसचे मोदींवर टीकास्त्र सुरक्षा यंत्रणेनेतील त्रुटीवरून भारत जोडो थांबली

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या अंतिम टप्प्यात असून येत्या ३० जानेवारी रोजी राहुल गांधी काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणार आहेत. त्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे. मात्र राहुल गांधी यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा त्रुटी असल्याचा आरोप काँग्रेसने केला. विशेष म्हणजे यावेळी सुरक्षेच्या कारणामुळे काँग्रेसने आपली यात्रा सध्या …

Read More »

बीबीसीचा गुजरात दंगलीवरील माहितीपट ट्विटर आणि युट्यूबवर ब्लॉक मोदी सरकारच्या आदेशानुसार समाजमाध्यमांवर ब्लॉक केल्याची माहिती

गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर नरेंद्र मोदी हे असताना गुजरातदंगल झाली. त्या दंगलीत अनेक मुस्लिमांचे शिरकाण करण्यात आले. तसेच ग्रोधा येथे प्रवाशांसह रेल्वे एक्सप्रेस जाळण्यात आली. तसेच याच दंगलीत बिल्कीस बानो या महिलेवर सामूहिक बलात्काराचे दुर्दैवी प्रकरणही घडले. त्यानंतर गुजरातमधील दंगलीवरून अनेक चित्रपट आणि अनेक डॉक्युमेंटरी तयार करण्यात आल्या. त्या सगळ्यांमध्ये त्यावेळच्या …

Read More »

काँग्रेसचा आरोप, मोदी सरकार आर्थिक विषमता रोखण्यात सपशेल फेल देशातील आर्थिक, सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठीच काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार मागील ९ वर्षात सर्वच आघाड्यांवर फेल ठरले आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांची मोठी किंमत देशातील गरिब जनतेला मोजावी लागत असून श्रीमंत अधिक श्रीमंत होत असल्याचे ‘ऑक्सफॅम’ संस्थेच्या अहवालाने स्पष्ट झाले आहे. देशातील ४० टक्के संपत्ती केवळ १ टक्के गर्भश्रीमंतांकडे तर …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, उधार घेतलेल्या तांदळाने विद्यार्थ्यांची भूक भागविण्याचा प्रयत्न मध्यान्ह भोजनाचा तांदूळ पुरविण्यात केंद्र सरकार असमर्थ

यवतमाळ, जळगाव, पुणेसह सांगली जिल्ह्यातही मध्यान्ह भोजनासाठी लागणारा तांदूळ पुरविण्यात केंद्रसरकार असमर्थ ठरत आहे असा आरोप करतानाच शिल्लक तांदूळ अथवा उधार घेतलेल्या तांदळाने विद्यार्थ्यांची भूक भागविण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर शाळा प्रशासन करत आहेत, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत केंद्राचे लक्ष वेधले. जयंत पाटील पुढे आपल्या ट्विटमध्ये …

Read More »

नाना पटोलेंचा आरोप, मोदी सरकारने कामगारांचे अधिकार व हक्क संपुष्टात आणले उद्योगपती मित्रांचे १०.५० लाख कोटींचे कर्जमाफ पण कामगारांकडे मात्र दुर्लक्ष

देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी देशाला प्रगतीच्या वाटेवर नेऊन उभे केले. काँग्रेसने कामगारांच्या मदतीने भारताला एक सक्षम देश म्हणून उभा केले. या कामगारांसाठी काँग्रेस सरकारने अनेक कायदे करुन हक्क व अधिकार दिले पण मोदी सरकारने कामगार चळवळीचे अस्तित्व संपवण्याचे काम केले असून मालकधार्जिणे कायदे आणून कामगार …

Read More »

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल, नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण ? नोटबंदीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आंबेडकरांची प्रतिक्रिया

रिझर्व बँक ऑफ इंडियाने १० मार्च २०१७ रोजी त्यांच्या प्रकाशनामध्ये नोटाबंदीचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर विपरीतपणे झाला आहे असे म्हटले आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयाने २०१६ च्या नोटबंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना अचानकपणे घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. कोणत्याही सिरीजच्या नोटा रद्द करणे किंवा त्या पुन्हा चलनात …

Read More »

राज्यघटनेच्या एक लाख प्रती वाटण्याच्या कार्यक्रमाची राहुल गांधींच्या हस्ते सुरुवात

केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून मागील ८ वर्षात लोकशाही व राज्यघटना धोक्यात आली आहे. लोकशाही व राज्यघटनेचे रक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पुढाकाराने राज्यघटनेच्या एक लाख प्रती वाटण्याचा संकल्प केला असून या अभियानाची सुरूवात काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या हस्ते आज …

Read More »

जयराम रमेश यांचा आरोप, मोदी सरकारने आदिवासींचे जल-जंगल-जमीनीचे अधिकार काढून घेतले

आदिवासींच्या हक्क व अधिकारासाठी आदिवासांचे जननायक बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरोधात मोठा संघर्ष केला. बिरसा मुंडा यांची आज १२२ वी जयंती आहे. पण आदिवासींना त्यांचे हक्क मिळू दिले जात नाहीत. काँग्रेस सरकारने आदिवासींच्या हिताचे निर्णय घेतले होते पण वन अधिकार अधिनियम २००६ व भूमी अधिग्रहण कायदा २०१३ यातून त्यांना हक्क मिळाले …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला ठणकावलं, हे वर्तन स्विकारण्या योग्य नाही

राज्यघटनाकारांनी घटनेची रचना करताना निकोप लोकशाहीसाठी चार स्वतंत्र यंत्रणांचे अस्तित्व मान्य केले. यातील पहिली यंत्रणा म्हणजे, कायदे मंडळ, त्यानंतर न्यायपालिका, प्रशासन आणि प्रसारमाध्यमं. परंतु कायदेमंडळ आणि न्यायपालिकांच्या कार्यकक्षा निश्चित कऱण्यात आलेल्या असल्या तरी अधूनमधून या दोन्ही यंत्रणांमध्ये संघर्ष निर्माण झालेला आपल्याला पाह्यला मिळाले. मात्र केंद्रात मोदी सरकार आल्यापासून पहिल्यांदाच सर्वोच्च …

Read More »