Breaking News

बीबीसीचा गुजरात दंगलीवरील माहितीपट ट्विटर आणि युट्यूबवर ब्लॉक मोदी सरकारच्या आदेशानुसार समाजमाध्यमांवर ब्लॉक केल्याची माहिती

गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर नरेंद्र मोदी हे असताना गुजरातदंगल झाली. त्या दंगलीत अनेक मुस्लिमांचे शिरकाण करण्यात आले. तसेच ग्रोधा येथे प्रवाशांसह रेल्वे एक्सप्रेस जाळण्यात आली. तसेच याच दंगलीत बिल्कीस बानो या महिलेवर सामूहिक बलात्काराचे दुर्दैवी प्रकरणही घडले. त्यानंतर गुजरातमधील दंगलीवरून अनेक चित्रपट आणि अनेक डॉक्युमेंटरी तयार करण्यात आल्या. त्या सगळ्यांमध्ये त्यावेळच्या मोदी सरकारवरच अनेकांनी ठपका ठेवला. मात्र या प्रकरणाला १० वर्षाहून अधिक काळ लोटल्यानंतर बीबीसी या आंतरराष्ट्रीय वाहिनीने इंडिया: द मोदी क्वेशन हा माहिती पट तयार करून प्रसारीत केला. मात्र हा माहितीपट पंतप्रधान मोदींच्या विरोधात असल्याने अखेर मोदी सरकारनेच दिलेल्या आदेशानुसार समाजमाध्यमांवर ब्लॉक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

बीबीसीने ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ नावाच्या माहितीपटातून गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यामध्ये गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर उसळलेल्या दंगली या घटनांशी संबंधित राजकीय नेते, पत्रकार आणि पीडित लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्यामुळेच गुजरात दंगलीमध्ये अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले, अशाप्रकारचं चित्रण या माहितीपटातून करण्यात आले आहे.

‘बीबीसी’ने हा माहितीपट प्रदर्शित करताच याचे भारतात पडसाद उमटले आहेत. केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी यावर आक्षेप घेतला. यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार, बीबीसीचा संबंधित माहितीपट यूट्यूब आणि ट्विटरवर ब्लॉक करण्यात आला आहे. ‘एएनआय’ने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिले.

यूट्यूबवरील व्हिडीओंसह केंद्र सरकारने ट्विटरला संबंधित यूट्यूब व्हिडीओच्या लिंक असलेले ५० हून अधिक ट्वीट ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव यांनी आयटी नियम, २०२१ अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर निर्देश जारी केले. यानंतर यूट्यूब आणि ट्विटरने सरकारच्या आदेशाचे पालन केले.

बीबीसीने २००२ च्या गुजरात दंगली आणि पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात दंगलीच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी दोन भागांमध्ये माहितीपट (डॉक्युमेंट्री) प्रसारित केली. हा माहितीपट प्रदर्शित झाल्यानंतर यावर आक्षेप घेण्यात आला असून हा व्हिडीओ निवडक प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला. हा माहितीपट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील ‘प्रोपगंडा’ असल्याचा आरोप केंद्र सरकारने केला.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *