Breaking News

Tag Archives: maratha reservation

मराठा आरक्षणाच्या अहवाल मांडण्यावरून विरोधकांमध्ये फूट विखे म्हणतात अहवाल मांडा तर अजित पवार म्हणतात मांडू नका

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेचे कामकाज सुरु होताच राज्यातील मराठा समाजाला मागास ठरविणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारने सभागृहात आजच मांडावा अशी भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सभागृहात मांडली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी हा अहवाल सभागृहात मांडण्याऐवजी विरोधकांमधील ज्येष्ठ नेते आणि सत्ताधारी यांच्यात चर्चा करून मराठा …

Read More »

मराठा आरक्षण, दुष्काळी मदतीवरून विधानसभेत विरोधकांच्या हातात राजदंड सभागृहात गोंधळ, कामकाज तीनवेळा तहकूब

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा आरक्षण मिळावे आणि राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधानसभेत मांडण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. तर मराठा समाजाला आरक्षण देणारा सशक्त कायदा राज्य सरकारने करावा. त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधानसभेत मांडण्याऐवजी तो थेट पुढे पाठविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी केली. त्यावर …

Read More »

मराठा समाजाला एसईबीसी या स्वतंत्र प्रवर्गाखाली आरक्षण देणार मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारने स्विकारल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला मिळाला आहे. या अहवालातील शिफारसीनुसार मराठा समाजाला एसईबीसी अर्थात सामाजिक-शैक्षणिक मागास वर्ग या स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारच्यावतीने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमानंतर …

Read More »

राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटला कसा ? विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटला कसा? हा अहवाल अद्याप सार्वजनिक झालेला नसताना आणि त्यातील शिफारसींची अधिकृत माहिती नसताना मुख्यमंत्री त्याआधारे घोषणा करतात कसे? आयोगाचे सदस्य प्रसारमाध्यमांपुढे जाऊन भाष्य करतात कसे? असे अनेक सवाल उपस्थित करून यासंदर्भात हक्कभंग आणण्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील …

Read More »

मराठा आरक्षणाचे विधेयक आगामी अधिवेशनात मंजूर होणार ? अहवालाचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची लगबग

मुंबईः प्रतिनिधी अखेर राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाला द्यावयाच्या आरक्षणासंबधीचा अहवाल गुरूवारी राज्य सरकारला सादर करण्यात आला. या अहवालाचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रशासनातील ६ अभ्यासू अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. तसेच या हिवाळी अधिवेशनातच याविषयीचे विधेयक मांडून मंजूर करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. मराठा …

Read More »

मराठा समाजाच्या परिस्थितीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर आयोगाच्या सदस्यांनी मुख्य सचिवांना केला सुपूर्द

मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीबाबतचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांना सुपूर्द करण्यात आला. मुख्य सचिवांच्या समिती कक्षात आयोगाचे सदस्य सचिव डी. डी. देशमुख यांनी मुख्य सचिवांना अहवाल सुपूर्द केला. यावेळी आयोगाचे तज्ज्ञ सदस्य अंबादास मोहिते उपस्थित …

Read More »

मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण देण्याची शिफारस निर्णय मात्र राज्य सरकारच्या हातात

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लावण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक निकषाच्या आधारे मराठा समाज मागस असल्याचे सिध्द होत आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गाखाली किंवा स्वतंत्ररित्या किमान ९ ते १० टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यास राज्य मागासवर्गीय आय़ोगाने सहमती दर्शविल्याची माहिती आयोगाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. आयोगाकडून राज्यातील जवळपास ४५ …

Read More »

मराठा आऱक्षणाचा निर्णय भाजपच्या यशापशावर परिणाम करणार न्या.गायकवाड समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर करणार

मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांसमोर ठेवून राज्यातील सर्वच पक्ष निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच निवडणूकीच्या रणधुमाळीला अजून प्रत्यक्ष सुरुवात झालेली नसली तरी मराठा आरक्षण, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हळूहळू ऐरणीवर येत आहे. त्यातच मराठा समाजाला आरक्षणासंदर्भातील अहवाल १५ नोव्हेंबर २०१८ रोजी राज्य सरकारला सादर करण्यात येणार असून त्या …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा मराठा आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची उध्दव ठाकरेंची मागणी

मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी राज्यभर केलेल्या आंदोलनात शेकडो निरपराध आंदोलनकर्त्यांवर राज्य सरकारने गुन्हे दाखल केले. या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचे जाहीर आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची आठवण शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करून देत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मराठा समन्वयकांनी …

Read More »

मराठा आरक्षणाबाबत १५ दिवसात निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडणार मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला इशारा

मुंबई : प्रतिनिधी येत्या पंधरा दिवसात मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणाच्या मागणीसह अन्य मागण्यांबाबत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी जर केली नाही, तर आतापर्यंत सरकारने  समाजाचे मूक मोर्चे पहिले आहेत. पण  समाजाचा उद्रेक झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील असा इशारा मराठा कृती मोर्चाने  दिला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »