Breaking News

Tag Archives: industry minister

शिंदे गटाचे मंत्री म्हणतात, नवीन वर्षात तुम्हाला नव्या घडामोडी आहेत त्या कळतील ठाकरे गटातील अनेक नगरसेवकांनी केला शिंदे गटात प्रवेश

सध्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या मंत्री आणि आमदारांच्या विरोधात आधीच वातावरण तापलेले आहे. त्यातच भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. या सर्व घटनांच्या …

Read More »

शिंदे गटाच्या उद्यमशील मंत्र्याचा असाही फंडा, बोलवा बैठक द्या दम, अन् घ्या ‘धनलक्ष्मी’ लॉटरी कंपन्या आणि विभाग प्रशासन वैतागले

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकते शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थानापन्न झाले. त्यानंतर महाराष्ट्रातून चार मोठे उद्योग निघून गेले. त्यावरून राज्यातले राजकिय वातावरणही चांगलेच तापले. मात्र या मागील चार महिन्यात शिंदे गटाच्या एका उद्यमशील उद्योगी मंत्र्याच्या कारभाराने खाजगी उद्योजक आणि त्यांच्या विभागाचे प्रशासन चांगलेच वैतागले असून या मंत्र्यांना कोणी तरी आवरा …

Read More »

उदय सामंत यांची घोषणा, वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी नि. न्यायाधीशामार्फत चौकशी

नुकतीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या काळात एमआयडीसीने अनिल अग्रवाल यांना पत्र पाठविल्याचा पुरावाच जाहिर केला. मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर वेदांताच्या अधिकाऱ्यांशी देवेंद्र फडणवीस यांनी कशासाठी बैठक घेतली आणि का घेतली असा सवाल करत या बैठकीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

विश्वासात घेऊनच बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प होणार

बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. रत्नागिरी येथील बारसू या गावात सुरु होत असलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत बोलत होते. या तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री …

Read More »

विकास योजना आणि प्रकल्पांची माहिती मुख्यमंत्री डॅशबोर्डद्वारे मिळणार

राज्य शासनाच्या महत्वाच्या विकास योजना आणि महत्वाच्या विकास प्रकल्पांची सद्यस्थिती नेमकी काय आहे, त्यात काय अडचणी आहेत याची माहिती मुख्यमंत्री (सीएम) डॅशबोर्डद्वारे तत्काळ मिळणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुख्यमंत्री डॅशबोर्डची रचना वापरकर्त्यांसाठी सुलभ आणि सहज असण्यावर भर देण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. …

Read More »

उदय सामंताच्या पत्रकार परिषदेसाठी एमआयडीसीची अशीही तत्परता? माहितीच्या अर्जावर काही तासात उत्तर

राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात आणि राज्यातील कोणत्याही शासकिय कार्यालयात माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज केला तर किमान १५ ते ३० दिवसात कधी उत्तर मिळाल्याचा अनुभव कदाचीत विरळाच असेल. मात्र राज्याचे उद्योग मंत्री असलेल्या उदय सामंत यांना घ्यावयाच्या पत्रकार परिषदेसाठी तात्काळ माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने एमआयडीसी विभागाने माहिती अधिकारात तात्काळ माहिती …

Read More »

उदय सामंत यांचा पलटवार, एअरबस प्रकल्प बाहेर जाण्यास महाविकास आघाडी जबाबदार

एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या टीकेला राज्याचे शिंदे गटाचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पलटवार करत हा प्रकल्प जाण्यास महाविकास आघाडी सरकारलाच जबाबदार धरले असून महाविकास आघाडी सरकार सत्तेत असतानाच हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नव्हता असा गौप्यस्फोट केला. विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर …

Read More »

आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांना वेदांताबाबत आणि या प्रकल्पाबाबतही माहिती नाही

परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राजकारण चालूच राहील मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानीवर लक्ष देणे गरजेचे आहे. चार प्रकल्प महाराष्ट्रातून निघून गेले. घटनाबाह्य सरकारमधील मंत्र्यांनी वेदांता प्रकल्प परत आणू सांगितले तसेच एअर बस प्रकल्प आणूच. परंतु वेंदांता बद्दल जस माहिती नव्हतं तसचं एअर बस बद्दल त्यांना माहिती नाही …

Read More »

कोकणात होणार ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक पेण येथे होणार ९६० मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प- उद्योगमंत्री उदय सामंत

जेएसडब्ल्यू आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभाग यांच्यामध्ये पेण (रायगड) येथील निओ एनर्जी प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या माध्यमातून कोकणात सुमारे ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक आहे. पेण येथे ९६० मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प उभा राहणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग मंत्री सामंत …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, उद्योगमंत्री कोण? जनता म्हणाली गद्दार मी राजीनामा देतो, ४० गद्दारांनी राजीनामा देऊन निवडणुकीला यावं

शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा शुक्रवारी बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या रत्नागिरी मतदारसंघात होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोरी पासून तरुणांच्या रोजगाराच्या मुद्यावरून खडेबोल सुनावले आहेत. खोके सरकारमुळे महाराष्ट्रातील तरुणांवर बेरोजगारीची वेळ आली आहे, अशी सडकून टीका करत आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री कोण …

Read More »