Breaking News

शिंदे गटाचे मंत्री म्हणतात, नवीन वर्षात तुम्हाला नव्या घडामोडी आहेत त्या कळतील ठाकरे गटातील अनेक नगरसेवकांनी केला शिंदे गटात प्रवेश

सध्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या मंत्री आणि आमदारांच्या विरोधात आधीच वातावरण तापलेले आहे. त्यातच भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. या सर्व घटनांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिंदे-फडणवीस सरकार आणि मोदी सरकारच्या विरोधात उद्या मोर्चाचे आयोजनही केले. या सगळ्या राजकिय गदारोळात शिंदे गटाचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आणखी १० ते १२ मंत्री संपर्कात असल्याचे विधान करत दावा केल्याने एकच खळबळ माजविली. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले, १० ते १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत. जरी सरकार पाडण्याच्या किंवा निवडणुका लागण्याच्या गोष्टी काही लोकांनी केल्या असल्या, तरी मी असं सांगितलं होतं की १७० हा आमचा बहुमताचा आकडा आहे. आणखीन १० ते १२ लोक एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा १८० ते १८२ पर्यंत जाऊ शकतो. नवीन वर्षांत तुम्हाला नव्या घडामोडी काय आहेत ते कळेल, असे भाकितही केले.

खरा धमाका पाच महिन्यांपूर्वी झाला. त्याचे पडसाद नवीन वर्षात उमटतील, असा दावा करत ते म्हणाले. लांज्यामधील आख्खी नगरपंचायतच आमच्याकडे येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आज नाशिकमधील ठाकरे गटाच्या ११ माजी नगरसेवकांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटासाठी या घडामोडी चिंता वाढवणाऱ्या ठरू शकतात.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *