Breaking News

Tag Archives: india

सचिन सावंत यांचा आरोप, मोदी…. नापास जागतिक भूक निर्देशांकात पाकिस्तानपेक्षाही भारत खालच्या स्तरावर हे मोदींचे मोठे अपयश

जगात भारताचा डंका वाजत असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या तथाकथित विश्वगुरू नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताचा भूक निर्देशांक आणखी ४ स्थानांनी घसरला असून १२५ देशांमध्ये भारत १११ व्या स्थानावर आला आहे. भूक आणि उपासमारीला सामोरे जाणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार भारत आता पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशच्याही खाली घसरला आहे ही बाब आपल्यासाठी भूषणावह नाही. …

Read More »

आयएमएफने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला चीनला दिला दणका

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताला आनंदाची बातमी दिली आहे. आयएमएफने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला आहे. यापूर्वी आयएमएफने भारताचा जीडीपी वाढीचा दर ६.१ टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला होता पण आता तो ६.३ टक्के केला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे म्हणणे आहे की एप्रिल ते जून या तिमाहीत खूप मजबूत खप …

Read More »

भारतावरील आरोपानंतर कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला नाझी समर्थकाचा सन्मान कॅनडात विरोधकांकडून टीकेचा भडिमार

खलिस्थानी समर्थक हरदीपसिंग गुज्जर यांच्या हत्याप्रकरणावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुड्युऊ यांनी या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर सुरु झालेल्या राजकिय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना हिटलरच्या एसएस संघटनेत असलेल्या आणि ज्यु नागरिकांच्या विरोधात उभारण्यात आलेल्या छळ छावणीचा भाग राहिलेल्या यारोस्लॅव हुनका यांचा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलावून सत्कार केल्याप्रकरणी कॅनडाचे …

Read More »

परदेशातील खलिस्तानी समर्थकांना मोठा दणका ओव्हरसीज सिटिझनशीप रद्द करण्याचा भारताचा निर्णय

खलिस्तानी

भारत आणि कॅनडामध्ये सुरु झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारत कठोर पाऊलं उचलत असल्याचं दिसत आहे. परदेशात राहणार्‍या खलिस्तान समर्थकांना धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परदेशात राहणार्‍या खलिस्तानी नेत्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे ओव्हरसीज सिटिझनशीप म्हणजे ओसीआय कार्ड रद्द करण्याच्या सूचना केंद्र सरकारने तपास यंत्रणांना दिल्या आहेत. भारताच्या या निर्णयामुळे …

Read More »

अमेरिकेचा दावाः भारतावर कॅनडाने आरोप करण्यापूर्वी गुप्तहेर संस्थेने माहिती दिली फाईव्ह आईज् पार्टनर्सला गुप्तहेर संघटनेने माहिती दिली

भारताने हरदीपसिंग निज्जर याला ठार मारल्याची माहिती फाईव्ह आईज् पार्टनर्सने दिल्यानंतरच कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेऊ यांनी जाहिररित्या कॅनेडियन नागरिकाची हत्या केल्याचा आरोप भारतावर केल्याचा दावा अमेरिकी राजदूताकडून करण्यात आला. यासंदर्भातील वृत्त भारतातील एका शासकिय वृत्तसंस्थेने दिले. हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याची माहिती फाईव्ह आईज् पार्टनर्स गुप्तहेर संघटनेला …

Read More »

इंडिया बैठक समन्वयासाठी उद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट समन्वयाच्या विषयावर दिडतास बैठक

आगामी लोकसभा निवडणूकीच्या धर्तीवर विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ ची बैठक बुधवारी दिल्लीत पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेऊन तब्बल दीड तास चर्चा केली. या बैठकीदरम्यान संसदेचे ऐन गणेशोत्सवात असलेले अधिवेशन, मराठा आरक्षण आदी …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, ५० टक्के सामाजिक आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज संसदेत महिलांना आरक्षण दिल्यास राष्ट्रवादीचा पाठिंबा

देश पातळीवर सामाजिक आरक्षणाची मर्यादा ५० टक्के होऊन वाढवून ६५ टक्के केल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. परंतु तसे केंद्रातलं भाजपा सरकार करत नाही असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्र सरकारवर केला. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, आरक्षणासाठी शांतीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर लाठी हल्ला …

Read More »

‘इंडिया’ नाव हटवण्याचा अधिकार कुणालाही नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार

जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जसह राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य केले. तर यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधकांच्या इंडिया आघाडीचे नाव बदलले जाणार असल्याची चर्चा आहे. यावर मत …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप. ‘इंडिया आघाडी’ वरुन लक्ष वळवण्यासाठी जालन्यात लाठीचार्ज मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या फडणवीसांच्या आश्वासनाचे काय झाले ?

देशभरातील महत्वाच्या पक्षांचे नेते मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आले असताना या बैठकीचा संदेश देशभर जाऊ नये व इंडिया आघाडीच्या बैठकीपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सत्तेतील भाजपाने जालन्याची घटना घडवून आणली. आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजातील निर्दोष बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आला. हा लाठीचार्ज सरकारच्या आदेशानेच झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …

Read More »

इंडिया बैठकीत निवडणुकीचे बिगुल वाजवत केली समन्वय समितीची स्थापना निवडणुका एकत्र लढण्याचा निर्धार, जागा वाटपाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे

देशभरातील २८ विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत निवडणुकीचा बिगुल वाजवला. केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात लोकसभा आणि शक्य तितक्या विधानसभा निवडणुका एकत्र लढल्या जातील, असा ठराव दोन दिवसीय बैठकीत मंजूर करण्यात आला. निवडणुकीसाठी विविध राज्यांमध्ये जागावाटपाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार असून ती लवकरच पूर्ण केली जाणार …

Read More »