Breaking News

अमेरिकेचा दावाः भारतावर कॅनडाने आरोप करण्यापूर्वी गुप्तहेर संस्थेने माहिती दिली फाईव्ह आईज् पार्टनर्सला गुप्तहेर संघटनेने माहिती दिली

भारताने हरदीपसिंग निज्जर याला ठार मारल्याची माहिती फाईव्ह आईज् पार्टनर्सने दिल्यानंतरच कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेऊ यांनी जाहिररित्या कॅनेडियन नागरिकाची हत्या केल्याचा आरोप भारतावर केल्याचा दावा अमेरिकी राजदूताकडून करण्यात आला. यासंदर्भातील वृत्त भारतातील एका शासकिय वृत्तसंस्थेने दिले.

हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याची माहिती फाईव्ह आईज् पार्टनर्स गुप्तहेर संघटनेला मिळाली. तसेच या हत्येत भारताचा सहभाग असल्याचे काही सूचक लिंकही मिळाले आहेत. त्या आधारे कॅनडाच्या पंतप्रधानांनी आरोप केले आहेत. फाईव्ह आईज पार्टनर्स गुप्तहेर संघटनेकडून बहुतांष वेळा अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड या पाच देशांना माहिती पुरवित असतो. यासंदर्भातील अमेरिकेचे राजदूत कोव्हिड ओव्हेन यांच्या सांगण्यानुसार वृत्तही प्रकाशित केले.

भारत आणि कॅनडामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करताना अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव अॅथोनी लेब्लकन म्हणाले की, सध्या भारत आणि कॅनडाच्या राजदूतांमध्ये जे काही सुरू झाले आहे ते काळजी करण्याचे कारण आहे. तसेच आम्ही कॅनडामधील मित्रांशी संपर्कात असून तेथील सल्लामसलत करत आहोत. आमच्यादृष्टीकोनातून सध्याच्या परिस्थितीत कॅनडाच्या यंत्रणांकडून चौकशी सुरु करणे सध्या योग्य नाही. कॅनडाच्या चौकशीच्या मागणीनुसार भारताने तयारी करावी जेणेकरून या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करता येणे शक्य होईल. तसेच याप्रश्नी भारताच्या थेट संपर्कात असल्याचेही स्पष्ट केले.

कॅनडियन नागरिकांच्या हत्येप्रकरणी कॅनडाचे सुरक्षा सल्लागार जो़डी थॉमस यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची दोन वेळा भेट घेतली होती. तसेच नुकत्याच झालेल्या जी-२० परिषदेच्या वेळीही या अनुषंगाने भेट घेऊन निज्जर यांच्या हत्येप्रकरणी दोन्ही बाजूने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच हत्येप्रकरणाचे जे काही भारतीय सहभागाचे लिंक मिळाले त्याची माहितीही अजित डोवल यांना दिल्याचे सांगत ऑगस्ट महिन्यात यासंदर्भात भेट झाल्याची माहिती पुढे येत आहे.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *