Breaking News

Tag Archives: governor bhagatsingh koshyari

मुख्यमंत्र्यांच्यासमोर राज्यपाल पंतप्रधानांना म्हणाले, वर्षानुवर्षे प्रकल्पांची कामे सुरुच… रखडलेल्या प्रकल्पावरून केली तक्रार

राजभवनावर सापडलेल्या गुप्त बंकरमध्ये देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी स्मारक निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या स्मारकाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत पार पडले. परंतु या कार्यक्रमातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

राज्यपाल भेटले की म्हणतात, अजितजी… क्यूं फिकर करते हो १२ आमदारांच्या प्रश्नावर अजित पवारांनी दिली माहिती

महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावाची यादी राज्यपालांना पाठवून दिलेल्या घटनेस अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला तरी राज्यपालांनी अद्याप मंजूर केली नाही यावरून आघाडीच्या नेत्यांनी टीका केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोनवेळा पत्रही पाठविले. तसेच याप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाकडून टीपण्णीही करण्यात आली. मात्र याप्रश्नावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी …

Read More »

राज्यपालांच्या हस्ते मला पुरस्कार नको त्यापेक्षा…. शरद पवार यांचे पुतणे तथा आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांची घोषणा

शेतकऱ्यांची काळजी करणारा रयतेचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तसेच ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हे पुस्तक लिहिणाऱ्या ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल वादग्रस्त विधानं केल्याने आपल्याला राज्यपालांच्या हातून पुरस्कार घेण्याऐवजी मी कार्यालयात जाऊन तो स्वीकारेल असे शरद पवार यांचे पुतणे तथा आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र …

Read More »

महाराष्ट्र दिनी राज्यपाल म्हणाले, राज्याने प्रगती आणि विकास यात कुठेही खंड पडू दिला नाही ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मांडली राज्याची रूपरेषा

बंधू आणि भगिनींनो, १. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण विश्वातील मराठी जनतेला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. २. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे. कामगारांच्या आणि श्रमिकांच्या घामातून हा महाराष्ट्र घडला आहे, त्यांचे स्मरण ठेवणे हे आपले …

Read More »

सोमय्यांनी गंभीर दुखापतीचा अहवाल राज्यपालांना सादर करावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांची मागणी

सर्वप्रथम सोमय्या यांनी राज्यपालांना आपल्याला झालेल्या गंभीर दुखापतीचा अहवाल सादर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. आज भाजपा नेते किरीट सोमय्या राज्यपाल भेटीसाठी राजभवनात गेले होते त्यावर महेश तपासे यांनी ही मागणी केली. किरीट सोमय्या यांना कोणतीही गंभीर जखम झालेली नाही, असा साधारण अहवाल …

Read More »

या ९७ पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलिस पदक २०२० सालच्या पोलिस पदकं सन्मानपूर्वक प्रदान

पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ९७ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २०२० या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन येथे सोमवारी (दि. २१ मार्च) समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. दहा पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस शौर्य पदके …

Read More »

मराठवाड्यातील या प्रकल्पासाठी इस्त्रायलने केला हात पुढे इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्यपालांना माहिती

मराठवाड्यातील पाण्याच्या  दुर्भिक्षावर मात करण्याच्या दृष्टीने इस्रायल येथील राष्ट्रीय जलव्यवस्थापन कंपनी महत्वाकांक्षी अश्या मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी बृहत आराखडा तयार करीत असल्याची  माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कोविडमुळे लांबणीवर पडलेला हा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी राज्य शासनाने इस्रायलला सहकार्य करावे अशी विनंती इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी यावेळी केली. इस्रायलच्या एशिया व पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक राफाएल …

Read More »

राज्यपालांनी अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव पुन्हा माघारी पाठविला, दिले हे कारण विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक रखडली

मागील अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली असून त्या विषयीचा प्रस्ताव मागील पावसाळी अधिवेशनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यावेळीही राज्यपालांनी निवडणूकीस मंजूरी दिली नव्हती. आता याविषयीचा प्रस्ताव पुन्हा महाविकास आघाडीने पाठविल्यानंतर तब्बल दोन आठवड्यानंतर राज्यपालांनी सदरचा प्रस्ताव आज राज्य सरकारला …

Read More »

भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल नाहीत ‘भाजप’पाल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात व्हावी : नाना पटोले

विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तिन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते ‘भाजप’पाल झाले आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या, असे असा उपरोधिक सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केला. विधिमंडळ आवारात प्रसारमाध्यमांशी …

Read More »

शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना राज्यातील भाजपा नेते गप्प कसे? छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींनी जाहीर माफी मागावी

छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोण विचारले असते? असे वादग्रस्त विधान करुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून जगभरात त्यांचा मोठा नावलौकिक आहे. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या कोश्यारी यांनी छत्रपतींचा …

Read More »