लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजपा सरकारने बगल देत मतदारांच्या मतदानावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे, हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. आपल्या पूर्वजांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवले व लोकशाही व संविधान दिले त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असून झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला …
Read More »सुप्रिया सुळे यांची भीती, राज्यात प्रचंड अस्वस्थ करणारी परिस्थिती संसदेत मांडणार हा विषय मांडणार
राज्यातील सरकार कबुली देतंय की ४०० कोटी रुपयांचा पीक विम्याचा घोटाळा झाला आहे आणि त्याच सरकारमधील आमदार म्हणतायत की ४०० नव्हे तर ५००० कोटीचा झालाय. हा खूप गंभीर विषय असून तो मी, संसदेत मांडणार आहे. तसेच सरकारने हार्वेस्टरमागे ८ लाख रुपये मागितले हे अतिशय गंभीर आहे स्वतः भ्रष्टाचार होतो हे …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, भाजपाच्या गुंडांचा भ्याड हल्ला, सरकारने हल्लेखोरांना अटक करावी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानावर भाजपाची भूमिका म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’.
भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला, त्यावर माफी मागण्याऐवजी भाजपा गुंडगिरी करत आहे. संसदेत भाजपाच्या खासदारांनी दादागिरी केली, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांना संसदेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपाच्या …
Read More »नवाब मलिक यांचा दावा, अजित पवार यांच्याशिवाय कोणतेही सरकार महाराष्ट्रात बनणार नाही भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची पॉलिटिकल अडजेस्टमेंट ;शिव - शाहू - फुले - आंबेडकर यांच्या विचारधारेवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम...
राजकारणात कुणीही परममित्र किंवा परमशत्रू असत नाही. वेळेनुसार सर्व बदलत असतात. २०१९ मध्ये अशाप्रकारे सरकार बनवले जाईल असे कुणाला वाटले होते का. मात्र वेगळे घडले त्यामुळे २३ नोव्हेंबरला निकाल आला की, अजित पवार यांच्याशिवाय कोणतेही सरकार महाराष्ट्रात बनणार नाही असा स्पष्ट दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब …
Read More »गोल्ड बॉण्डची विक्री सरकारला पडतेय महागात बॉण्डवरील व्याज २.५ टक्के आणि करमुक्त रक्कम गुंतवणूकदारांच्या हातात
सोर्व्हजियन गोल्ड बॉण्ड अर्थात सुवर्ण रोखे (SGB) द्वारे निधी उभारणे सरकारसाठी महागडे ठरले आहे. कारण इश्यू किमतीच्या तुलनेत सोन्याच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. सोन्याच्या किमतीत वाढ होण्याव्यतिरिक्त, सरकारने वार्षिक २.५ टक्के व्याज आणि दीर्घकालीन भांडवली नफा कर देखील भरला आहे कारण ८ वर्षांच्या कार्यकाळानंतरची मुदत पूर्ततेची रक्कम गुंतवणूकदारांच्या हातात करमुक्त …
Read More »नाना पटोले यांचा आरोप,…शेतकऱ्यांच्या नावानेही पैसा खाल्ला न्यायालयाने वेळेत निकाल दिला असता तर राज्य सरकारचा निकाल लागला असता: बाळासाहेब थोरात
राहुल गांधी यांच्या भारत जोडो व भारत जोडो न्याय यात्रेमुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले. पण विधानसभेची लढाई सोपी नाही. केंद्रात व राज्यात विरोधकांची सत्ता आहे. धनशक्ती व सत्तेचा गैरवापर करण्यात महायुती कुप्रसिद्ध आहे. त्यामुळे गाफील राहू नका. महाराष्ट्राची निवडणूक देशासाठी महत्वाची असून, राज्यातील सत्ताबदलाचे हादरे दिल्लीलाही …
Read More »सुप्रिया सुळे यांची टीका, हे सरकार घर फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीत व्यस्त कंपन्या राज्याबाहेर जाणं हे ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश
हिंजवडीमधील ३७ आयटी कंपन्याच्या स्थलांतराला राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे. हे सरकार केवळ घरं फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात व्यस्त आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केला. पुण्यातील सारसबागे समोरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला सुप्रियाताई सुळे यांनी …
Read More »नितीन गडकरी म्हणाले, सरकार-बिरकारवर जास्त विश्वास ठेवू नका… नागपूरात शेतकऱ्यांना दिला सल्ला
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे सर्वपरिचित आहेत. अनेक सभा आणि कार्यक्रमांमधून नितीन गडकरींनी स्टेजवर केलेल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली आहे. अनेकदा तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारचे कान देखील टोचले आहेत. सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना गडकरी मागेपुढे पाहात नाहीत, असा त्यांचा इतिहास आहे. या पार्श्वभूमवीर नितीन …
Read More »त्या सवालावर संभाजी राजेंनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहीत दिले ‘हे’ उत्तर मराठा आरक्षण लढा व त्यासंबंधीत चालू घडामोडींवर छत्रपती संभाजीराजे यांनी पोस्ट मधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत...
मराठा समाजाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात नुकतीच बैठक पार पडली. त्या बैठकीत संभाजी राजे यांनी मराठा आरक्षण समितीच्या संयोजकांना बोलू दिले नसल्याचा आरोप एका संयोजकाने आज करत संभाजी राजे यांना मराठा समाजाचे नेतृत्व कोणी दिले? आम्हाला बोलायला का दिले नाही? असा सवाल …
Read More »शेतमालाला चांगला भाव देण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांशी सामंज्यस करार महिंद्रा, रिलायन्स फ्रेशसह २०० कंपन्याशी करार केल्याची मंत्री देशमुखांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी सहकार आणि पणन विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी आता कॉर्पोरेट क्षेत्रातील पलासा ॲग्रो, फ्युचर ग्रुप, रॉयल ॲग्रो, महिंद्रा, रिलायन्स फाउंडेशन आणि रिलायन्स फ्रेश आदी कार्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घेतला असून अटल महापणन विकास अभियानांतर्गत २०० पेक्षा जास्त कॉर्पोरेट संस्था आणि खरेदी विक्री संघ, वि.का.स. सोसायट्या …
Read More »
Marathi e-Batmya