Breaking News

Tag Archives: dhananjay munde

नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे अन्यथा आंदोलन भाजपा प्रदेशाध्यक्ष ‌चंद्रकांत पाटील यांचा पुनरुच्चार

मुंबई : प्रतिनिधी बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे खुलासा करताना आरोप करणाऱ्या रेणू शर्माची बहीण करुणा शर्माशी आपले विवाहबाह्य संबंध असून त्यातून दोन मुले जन्माला आल्याची व त्यांना आपण आपले नाव दिल्याची जाहीर कबुली दिली आहे. हे ध्यानात घेता, धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, …

Read More »

पवारांचे संकेत, कायदेशीर कटकटीतूनही मुंडेंना मिळणार दिलासा पवार म्हणाले, मुंडे-शर्मा प्रकरणाची स्वतंत्र चौकशी

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यावर आरोप करणाऱ्या व्यक्तींच्या सदर्भात आणखी तक्रार समोर आल्यानंतर याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशा निष्कर्षावर आम्ही आलो आहोत. पोलीस योग्य काम करतील असा विश्वास आहे. पोलिसांच्या चौकशीत हस्तक्षेप करण्याचं कारण नाही, पण आम्ही तपासात एसीपी दर्जाची माहिला अधिकारी असावी असं सुचवलं आहे. पोलिसांनी सर्वांशी चर्चा …

Read More »

पाच तासाच्या बैठकीनंतर मुंडेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला हा निर्णय तुर्तास मंत्रिपदाचा राजीनामा नाही

मुंबईः विशेष प्रतिनिधी एका महिलेनी केलेल्या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले. त्यामुळे मंत्रिमंडळातून मुंडे यांची गच्छंती अटळ मानली जात असतानाच त्यांना अभयदान मिळाले आहे. मुंडे यांच्यावरील आणि त्यांनी कथित महिलेने केलेल्या आरोपातील अनेक गोष्टींची कबुली दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्य मंत्रिमंडळाच्या प्रतिमेवर …

Read More »

मेहुणीने केला मंत्री मुंडेवर बलात्काराचा आरोप तर मुंडे म्हणाले ब्लँकमेलिंग वाचा मेहुणी रुचा शर्माने केलेली तक्रार आणि मुंडे यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जबरदस्तीने बलात्कार, जबरदस्तीने शाररीक संबध आणि लग्नाचे वचन देवून फसवणूक केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांची मेहुणी रेणू शर्मा यांनी करत मुंडे यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला. दरम्यान मेहुणीने केलेले आरोप हे ब्लँकमेलिंगसाठी असल्याचा प्रत्यारोप धनंजय मुंडे …

Read More »

धक्कादायक: बलात्काराची तक्रार केलेल्या महिलेलाच ग्रामपंचायतीने काढले गावाबाहेर भाजपाच्या चित्रा वाघ यांची कारवाईची मागणी

मुंबई : प्रतिनिधी साधारणत: पाच वर्षापुर्वीच्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडीत महिलेने आरोपींविरोधात निकराचा लढा देतं त्यांना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा केला याचा राग धरून ग्रामपंचायतीने या महिलेलाच गावाबाहेर काढण्याचा ठराव केल्याचा संतापजनक प्रकार बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील पाचेगावात घडल्याची माहिती भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दिली असून सदर ग्रामपंचायती विरोधात कारवाई …

Read More »

ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना दिलासा २९ व ३० डिसेंबर रोजी ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचे धनंजय मुंडे यांचे समित्यांना निर्देश

पुणे: प्रतिनिधी ग्राम पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी केंद्रांवर नागरिकांची झुंबड उडालेली असताना, जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे आज २९ डिसेंबर व उद्या ३० डिसेंबर असे दोनही दिवस राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईन सह ऑफलाईन …

Read More »

पवारांच्या वाढदिनामिमित्त राज्यातल्या दिव्यांग आणि स्पर्धा परिक्षार्थींसाठी दोन नवे अॅप नव्या अॅपच्या उद्घाटनप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातल्या प्रत्येक दिव्यांगाना देणगीदारांच्या माध्यमातून आवश्यक असलेली मदत मिळावी यासाठी महाशरद (mahasharad), स्पर्धा परिक्षार्थीं व अनुसूचित जातींसाठीच्या असलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बार्टी (Barti) असे दोन मोबाईल अॅण्ड्राईड अॅप लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. हे दोन्ही अॅप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या …

Read More »

नावं बदलण्यापरेक्सा, वस्त्या गांवकुसात घ्या की ! पँथर मिलिंद भवार यांची सरकारच्या निर्णयावर वास्तवादी भाष्य

शहर-ग्रामीण भागत असलेल्या जातीवाचक वस्त्यांची नावं बदलून त्या वस्त्यांना महापुरूषांची नावे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्या अनुषंगाने वास्तवादी परिस्थिती आणि त्यावर उपरोधिक पध्दतीने दोन गावकऱ्यांमधला काल्पनिक संवाद… ग्यानबा : म्हादबा…ऐकलंस कारं आपल्या मायबाप सरकारचा क्रांतिकारी फैसला..? म्हादबा : कनचा रं बबा … ग्यानबा : अरं, आतापास्तोवर आपल्या वस्तीला ‘म्हार …

Read More »

राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार सामाजिक न्याय विभागाच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. काही वस्त्यांची नावे महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राम्हणवाडा, माळी गल्ली, अशा स्वरुपाची नावे आहेत. ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भुषणावह नसल्याने सामाजिक सलोखा …

Read More »

युपीएससीसाठी एससीच्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या योजनेतील ‘त्या’ अटी रद्द बार्टी ने घातलेल्या जाचक अटींमुळे विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती नाराजी

मुंबई : प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा (युपीएससी प्रिलीम) उत्तीर्ण झालेल्या मुख्यपरीक्षा २०२० साठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या एक रकमी अर्थसहाय्य योजने साठी बार्टीने घातलेल्या जाचक अटी रद्द करून मागील वर्षीच्या …

Read More »