Breaking News

Tag Archives: covid-19

कोरोना: मुंबईसह मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात बाधितांमध्ये वाढ ६ हजार ९७१ नवे बाधित, २ हजार ४१७ बरे झाले तर ३५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर, वर्धा तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगांव जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये आणि मुंबईत एक हजाराच्या घरात रूग्ण संख्या आज आढळून आल्याने जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर मुंबई उपनगर म्हणून ओळखले जाणारे ठाणे, कल्याण डोंबिवली, …

Read More »

लॉकडाऊन टाळायचा असेल तर मास्क वापरा, अन्यथा १० दिवसात लागू मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा इशारा

मुंबई: विशेष प्रतिनिधी १५ दिवसापूर्वी राज्यात कोरोनाबाधितांची संख्या २ ते ३ हजाराच्या दरम्यान असायची. मात्र आज हि संख्या दुपटीने वाढत आहे. त्यास आपला गाफिलपणा कारणीभूत असून राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करावा असे वाटत नसेल तर मास्क, सॅनिटायझर आणि शाररीक अंतर पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत पुढील ८ ते …

Read More »

कोरोना : निर्बंध जाहिर केलेल्या जिल्ह्यांमध्ये बाधितांच्या संख्येत वाढ ६ हजार ११२ नवे बाधित, २ हजार १५९ बरे झाले तर ४४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने मुंबईसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात टप्प्यानुसार संचार बंदी लागू करत काही प्रमाणात निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. निर्बंध घातलेल्या पहिल्याच दिवशी नाशिक मंडळ, औरंगाबाद, पुणे, नागपूर, लातूर आदी मंडळात कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून …

Read More »

कोरोना: महाराष्ट्रातील या जिल्ह्यात संचारबंदीसह हे निर्बंध जारी राज्य सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांमध्ये यासंदर्भातील निर्बंध आदेश जारी करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दर रविवार संपूर्ण तर रात्रीही संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्ण तपासणीचा वेग वाढविण्याचे निर्देश देण्यात …

Read More »

मुंबईकरांनो सावधान ! कोरोनाचे हे नियम मोडाल तर होणार गुन्हा दाखल महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांचे सक्‍त आदेश

मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांत रुग्‍ण संख्‍या वाढत असल्‍याने संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे. वाढती रुग्‍ण संख्‍या पाहता घरी विलगीकरण राहणाऱ्यांच्‍या हातावर शिक्‍के मारावेत, त्‍यांनी नियम मोडला तर त्‍यांच्‍यावर गुन्‍हे दाखल करावेत. लग्‍न समारंभ आयोजनाचे नियम मोडणाऱया आयोजकांसह व्‍यवस्‍थापनांवरही गुन्‍हे दाखल …

Read More »

कोरोना: मुंबईत दुपटीने तर राज्यात १ हजाराहून अधिकची रूग्णवाढ ४ हजार ७८७ नवे बाधित, ३ हजार ८५३ बरे झाले तर ४० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काल ४३१ बाधित रूग्ण आढळून आल्यानंतर आज त्यात दुपटीने वाढ होत ही संख्या ७२१ इतके बाधित आढळले. तर राज्यात ३ हजार ३६३ इतकी असलेल्या संख्येत आज १ हजाराने वाढ होत ४ हजार ७८७ इतके रूग्ण आढळून आल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३८ हजार ०१३ …

Read More »

कोरोना: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या, वाचा आणि काळजी घ्या ३ हजार ६६३ नवे बाधित, २७०० जण बरे तर ३९ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील २४ तासात २,७०० रुग्ण बरे झाल्याने घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ८१ हजार ४०८ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.६६% एवढे झाले आहे. तर आज राज्यात ३ हजार ६६३  नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३७ हजार …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्री ठाकरे , उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले हे आदेश राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक

मुंबईः प्रतिनिधी लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे. लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे, त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे असे स्पष्ट आदेश …

Read More »

कोरोनाः मुंबई महानगरातील वाढत्या रूग्णांमुळे लोकलबाबत प्रश्नचिन्ह ३ हजार ३६५ नवे बाधित, ३ हजार १०५ बरे झाले तर २३ जणांचा मृत्यू

मुंबईः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल प्रवासाची वेळ सर्वसामान्यांसाठी पूर्वीप्रमाणे अर्थात कार्यालयीन वेळेतही मुभा देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु होत होता. मात्र आता मुंबईसह महानगरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरीकांना कार्यालयीन वेळेत लोकल प्रवास करण्याच्या सवलतीबाबत …

Read More »

कोरोना: अन्य राज्यांच्या तुलनेत रुग्ण संख्या, मृत्यू दर, सक्रीय रुग्ण राज्यात कमी २ हजार ६७३ नवे बाधित, १ हजार ६२२ बरे झाले तर ३० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्राने कोविडचा मुकाबला करण्यासाठी अतिशय गांभीर्याने आणि पारदर्शकपणे पावले उचलली आणि त्यामुळेच दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर कोविडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यू दर महाराष्ट्रात कमी  असल्याचे दिसते, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. २ फेब्रुवारी २०२१ च्या आकडेवारीनुसार दर दश लक्ष …

Read More »