Breaking News

Tag Archives: covid-19 lockdown

लॉकडाऊन असतानाही रायगडमध्ये गुतंवणूकीसाठी उद्योजक उत्सुक उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी दिल्ली-मुंबई- इंडस्ट्रिअल कॉरीडॉर प्रकल्पांतर्गत दीघी औद्योगिक क्षेत्रासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या क्षेत्रांपैकी ६ हजार हेक्टर क्षेत्रावर माणगाव एमआयडीसीची स्थापना करण्यास मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिलेली आहे. यामुळे सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून हजारो तरुणांना रोजगार संधी निर्माण होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार …

Read More »

मिशन बिगीन अगेनमध्ये मुंबईसह राज्यात या सवलती नव्याने मिळणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून घोषणा

मुंबई: प्रतिनिधी रूतलेल्या अर्थव्यवस्थेला चालना आणि थांबलेले जनजीवन पुन्हा एकदा सुरुळीत व्हावे या उद्देशाने राज्य सरकारने लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेत काही गोष्टी शिथीलही केल्या. मात्र आता त्यात नव्याने काही सवलती समाविष्ट करण्यात आल्याने मिशन बिगीन अगेन आणखी सुसह्य झाला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या अधिक सवलती खालीलप्रमाणे- पहिल्या टप्यात-बाग-बगीछे, …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी मे पाठोपाठ जून महिन्यातही कर्ज ? आर्थिक जमवाजमव करण्यासाठी वित्त विभागाची दमछाक

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोविड विरोधी लढ्याला आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसा कमी पडू नये यासाठी राज्य सरकारने सर्व योजनांसाठीचा निधी, अर्थसंकल्पीय तरतूदीनुसार राखीव ठेवण्यात आलेला निधी आतापर्यत वापरला. मात्र लॉकडाऊनमुळे राज्याची गंगाजळी आटल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मे महिन्यात कर्ज काढण्यात आले. आता पुन्हा एकदा जून महिन्याच्या पगारीसाठी कर्ज …

Read More »

७३४ रिक्त पदे भरा, अन्यथा प्रशासनाने कामाची अपेक्षा करू नये शिधावाटप कर्मचारी संघटनेचा सरकारला इशारा

मुंबई: प्रतिनिधी सध्या राज्यभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले असून मुंबई/ठाणे विभागात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत अन्न, नागरी पुरवठा विभागाअंतर्गत येणा-या नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांचे आस्थापनेवरील शिधावाटप कर्मचारी/अधिकारी हे बदलापूर, कल्याण, विरार, पनवेल अशा अनेक दूरवरच्या ठिकाणावरून प्रवास करून …

Read More »

५३ हजार आदिवासी विद्यार्थ्यांचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरूच राहणार नामांकित शाळेतील प्रवेशाची योजना बंद नव्हे तर तात्पुरती स्थगिती दिल्याची आदीवासी मंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोवीड 19 च्या साथरोगामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे व आर्थिक काटकसरीच्या धोरणामुळे आदिवासी समाजातील मुलांसाठी नामांकित इंग्रजी शाळेतील प्रवेशास आदिवासी विभागाने तात्पुरती स्थगिती दिली असली तरी या मुलांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आदिवासी विभागाच्या इतर इंग्रजी माध्यमाच्या …

Read More »

विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचाय, १२ तासासाठी टीव्ही तर २ तासासाठी रेडिओ द्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे केंद्राला पत्र

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन शाळा सुरु होण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आग्रही भूमिका घेतलेली आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारच्या मालकीच्या दूरदर्शनच्या दोन चॅनेलवरवरील १२ तास आणि आकाशवाणी रेडियोवरील २ तासाचा वेळ शिक्षण देण्यासाठी द्यावा अशी शालेय …

Read More »

मुंबई, पुण्याची गर्दी कमी करायचीय, तर दुर्लक्षित जिल्ह्यांमध्ये जावे लागेल महानगरांमध्ये ४० लाख कामगारांची संख्या

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि पुणे महानगरात मोठ्या प्रमाणावर उद्योगांची गर्दी झालेली आहे. या दोन्ही महानगरात राज्यातील आणि परराज्यातील स्थलांतरीत कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या दोन शहरांमध्ये जमा होणारी गर्दी कमी करायची असेल तर राज्यातील इतर मागास जिल्ह्यांचा विकास करत रोजगाराच्या संधी निर्माण …

Read More »

प्रत्यक्ष अन्यथा ऑनलाईन शाळा जूनमध्येच सुरु झाल्या पाहिजे मुख्यमंत्र उध्दव ठाकरे यांचे शिक्षण विभागाला आदेश

मुंबई : प्रतिनिधी जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे, तिथे त्या सुरू करणे तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे अशी आग्रही भूमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज झालेल्या …

Read More »

राज्य सरकारकडूनही तीन टप्प्यातील अनलॉक जाहीर : ३ जूनपासून सुरू होणार मुंबई-पुणेतील परिस्थिती लक्षात घेवून केंद्राचे नियम बदलले

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने काल तीन टप्प्यातील अनलॉकची मार्गदर्शक तत्वे जाहीर केल्यानंतर आज राज्य सरकारकडूनही अनलॉकबाबतची नियमावली जाहीर केली. त्यानुसार केंद्राने जाहीर केल्याप्रमाणे रात्रो ९ ते पहाटे ५ पर्यत कर्फ्यु कायम राहणार आहे. मात्र मुंबई, पुणे येथील वाढती चिंताजनक परिस्थिती पाहता केंद्रांच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. केंद्राने जारी …

Read More »

बहुजन आघाडीला झाली अखेर वंचितांची आठवण झोपडपट्यांमध्ये ? अन्नधान्याची मदत

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन महिने राज्यात लॉकडाऊन लागू असताना अनेक गरिब, गरजू, स्थलांतरीत कामगार, राज्यातील परजिल्ह्यातील कामगारांनावर खऱ्या अर्थाने वंचित म्हणून जगण्याची वेळ आली होती. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते कार्यकर्त्ये दिसत नव्हते. अखेर लॉकडाऊनचा ४ था टप्पा संपत आल्यानंतर अन्न धान्याची वाटप करण्याचे काम सुरु केले. धारावी पाठोपाठ …

Read More »