Breaking News

Tag Archives: covid-19 lockdown

काँग्रेसच्या सचिन सावंतांचे भाजप नेत्यांना खुल्या चर्चेसाठी आव्हान मोदीजींच्या जन्माआधीपासूनच रेल्वे सबसिडीमध्ये चालते, कोविडसाठी काय दिले? सवाल

मुंबई: प्रतिनिधी स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे भाड्यातील सवलतीचा भाजपचा दावा खोटा ठरला असतानाही भाजपचे नेते ते मान्य करायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयात सॉलिसीटर जनरल तुषार मेहतांनीच त्यांचा हा खोटारडेपणा उघड करुनही त्यांची वृत्ती ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच दिसते. आपला खोटेपणा उघड पडला की वैयक्तिक पातळीवर घसरण्याची भाजपाची खोड जुनीच …

Read More »

वारी होणार पण, या तीनपैकी एका पर्यायाचा वापर करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरील बैठकीत चर्चा

मुंबई: प्रतिनिधी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे वैभव आणि परंपरा म्हणून गणलेल्या गेलेल्या पंढरीच्या आषाढी वारी पायी करण्यास परवानगी नकारण्यात आलेली असली तरी वारी व्हावी या उद्देशाने वारकरी संप्रदायाच्या प्रमुख ७ पालख्यांसमोर तीन पर्याय ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार संताच्या पादुका निवडक लोकांच्या संगतीत वाहनाद्वारे, विमानाने किंवा हेलिकॉप्टरने पंढरपूरात आणण्याचा पर्याय देण्यात …

Read More »

आशिष शेलार म्हणाले, ‘उपेक्षित’ सचिन सावंत हे तर खोटे बोलण्याची फँक्टरी स्थलांतरित मजुरांसाठीच्या रेल्वेचा ८५ टक्के खर्च हा केंद्राकडूनच भाजपाचा दावा

मुंबई: प्रतिनिधी मजुरांचे ८५ टक्के रेल्वेभाडे केंद्र सरकार भरते, हा भाजपाचा खोटारडेपणा उघडकीस आला, असा दावा करणारे एक प्रसिद्धीपत्रक काँग्रेसचे उपेक्षित प्रवक्ते सचिन सावंत यांनी काढले आहे. कुठल्याही अभ्यासाअभावी केवळ प्रेसनोटच्या भरोशावर जिवंत असलेल्या सचिन सावंत यांचे नाव सर्वाधिक खोटारडी प्रेसनोट काढणार्‍यांच्या यादीत आता अव्वल क्रमांकावर येत आहे. खोटे बोलण्याची …

Read More »

सॉलिसीटर जनरल म्हणाले, मजुरांच्या प्रवासाचा खर्च केंद्राने नव्हे तर राज्यांनी केला केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्यांचा खोटरडेपणा उघडकीस- चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी : काँग्रेसची मागणी

मुंबई: प्रतिनिधी स्थलांतरीत मजुरांना गृहराज्यात पाठवण्यासाठी चालवण्यात येत असलेल्या रेल्वेच्या प्रवाशी भाड्यात ८५ टक्के खर्च केंद्र सरकार करत असल्याच्या भाजपाच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे. या प्रवाशांच्या तिकीटाचा सर्व खर्च हा राज्य सरकारांनीच केल्याचे केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. यातून भाजपाचा खोटारडेपणा उघड …

Read More »

मंत्री राऊत अधिकाऱ्यांना म्हणाले, ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करा ; अन्यथा कारवाई विदर्भ- मराठवाड्याच्या आढावा बैठकीत दिला इशारा

नागपूर : प्रतिनिधी वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा  देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना अत्यंत प्रभावीपणे करा. वीज जाण्याची पूर्वसूचना ग्राहकांना मिळालीच पाहिजे. यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवा. तसेच ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची अकार्यक्षमता दिसून येत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आढावा बैठकीत दिले. …

Read More »

ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी खुषखबर शहरापासून १० किमी अंतरावरील विद्यार्थ्यांनाही मिळणार लाभ: सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही प्रवेश न मिळू शकलेल्या ११ वी व त्यापुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणारी स्वाधार योजना मोठी शहरे, महानगरपालिका, जिल्ह्याचे ठिकाण यापूरती मर्यादित न ठेवता आता तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक …

Read More »

सरकार म्हणते ८ लाख तर रेल्वे म्हणते १५ लाख कामगारांना घरी सोडले स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्याच्या आकडेवारीवरून गोंधळ

मुंबई : प्रतिनिधी राज्यात विशेषत: मुंबई महानगरातील स्थलांतरीत कामगारांना बिहार, उत्तर प्रदेशमधील स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या घरी पोहोचविण्यावरून रेल्वे गाड्या उपलब्ध असणे-नसण्यावरून केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकाबाजूला या कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमापर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वेबरोबरच एसटीने ७ ते ८ लाख जणांना पोहोचविल्याचे राज्य …

Read More »

राज्य सरकार म्हणते, विमानाबरोबर आता दैनदिंन रेल्वे सेवाही सुरु होणार केंद्र सरकार टप्प्याटप्याने रेल्वे सेवा सुरु करणार असल्याचे राज्याची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील अर्थचक्राला गती देण्याच्या उद्देशाने आणि लॉकडाऊनमुळे थांबलेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारने देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर राज्यातंर्गत रेल्वे सेवाही टप्याटप्याने सुरु करण्याचा विचार केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याची माहिती राज्य सरकारने आज जाहीर केल्याने दैनदिन रेल्वेसेवा लवकरच सुरु होणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र याबाबतची …

Read More »

वाईन शॉप्सवाले म्हणतात किमान ३ हजाराचे मद्यप्रेम दाखवा तरच मिळेल प्रेम दाखविण्याच्या पध्दतीमुळे तळीराम संतप्त

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगरपालिकेने मद्यप्रेमींसाठी आणि राज्यातील महसूलातील भर वाढविण्यासाठी सोमवारपासून वाईन्स शॉप्स (मद्यविक्रीची दुकाने) सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र या दुकानदारांनी किमान ३ हजार रूपयांची खरेदी करत असाल तरच तुम्हाला मदीरा घेता येईल अशी अट घातल्याने मद्यप्रेमींना घातल्याने तळीरामांनाकडून प्रचंड संताप व्यक्त होत असून या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी …

Read More »

कर्जमुक्तीचा लाभ नाही मिळाला, खरीप हंगामासाठी कर्ज हवय..मिळणार बँकांना राज्य शासनाच्या सूचना देण्यात आल्याची सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज मिळणार आहे. याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. यासंदर्भात राज्य शासनाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. १ एप्रिल …

Read More »