Breaking News

Tag Archives: amol mitkari

अमोल मिटकरी म्हणाले काय तो मंत्री….तर मंत्री तानाजी सावंत यांचे प्रत्युत्तर, आठ दिवस… सध्या वरिष्ठांनी काही बोलू नका म्हणून सांगितलय

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीला असताना शहाजीबापू पाटील यांचा ‘काय डोंगार..काय झाडी.. काय हाटील’ हा संवाद तुफान व्हायरल झाला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी किंवा चिमटे काढण्यासाठी या संवादाचा पुरेपूर वापर करण्यात आला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी हाच संवाद वापरून शिंदे सरकारमधील मंत्री तानाजी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेच्या इशाऱ्यानंतर आज शिंदे गट- मविआ आमदार भिडले एकमेकांशी रोहित पवार आणि सुरक्षा रक्षकांनाही आवरले नाहीत शिंदे गटाचे आमदार

आतापर्यंत महाराष्ट्राच्या सांसदीय राजकारणात सौजन्य आणि मैत्री सौहार्दाचे असलेले चित्र आज पहिल्यांदाच बिघडल्याचे विधान भवनाच्या आवारात राज्याच्या जनतेला पाह्यला मिळाले. काल मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चिठ्या काढण्याचा इशारा देत सहनशीलता संपेल अशी वेळ आणू देऊ नका असे आवाहन विरोधकांना केले. मात्र आज विरोधक महाविकास आघाडीच्या आंदोलनाची जागा सत्ताधारी …

Read More »

खातेवाटपानंतर अमोल मिटकरी म्हणाले, शिंदे गटाच्या तोंडाला पाने पुसली महत्वाची खाती भाजपाकडे

विरोधकांच्या सततच्या टीकेमुळे अखेर शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर चार दिवस संपत आले तरी खातेवाटप करण्यात आले नव्हते. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर खात्यांचे वाटप झाले. या खातेवाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. खाते वाटपानंतर ट्विट करत अमोल मिटकरी म्हणाले, भाजपाने …

Read More »

अमोल मिटकरी यांचा रवि राणा यांना टोला, देवेंद्र चालिसा म्हणा… राज्य मंत्रिमंडळातील सहभागावरून लगावला टोला

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालिसावरून रान पेटविणारे रवि राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांचे भाजपाबरोबरील सख्य काही लपून राहिले नाही. तसेच हनुमान चालिसावरून उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला जेरीस आणणाऱ्या रवि राणा यांचा या नव्या सरकारमध्ये समावेश होईल असे सांगण्यात येत असताना पहिल्या …

Read More »

अमोल मिटकरी यांची टीका, राज्यपाल भाजपाचे एजंट अन् संघाचे… त्यांना त्यांच्या राज्यात लवकरात लवकर पाठवा

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत रहात असतात. नुकतेच त्यांनी मुंबई, ठाणेतून राजस्थानी आणि गुजराती लोक बाजूला काढले तर पैसाच शिल्लक राहणार नाही. तसेच मुंबईला आर्थिक राजधानी म्हणून कोणी म्हणणार नसल्याचे वक्तव्य केले. राज्यपालांच्या या वक्तव्यावरून सर्वच राजकिय पक्षांनी टीकेचे आसूड ओढले. भाजपाने राज्यपाल कोश्यारी …

Read More »

राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे राष्ट्रवादी नव्हे, राष्ट्रद्रोहीच ‘राष्ट्रवादी’च्या तिरंगाविरोधी भूमिकेवर भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशातील जनता उत्सव साजरा करत असताना या उत्साहात मिठाचा खडा टाकणाऱ्यांचा राष्ट्रद्वेषच यानिमित्ताने देशासमोर आला आहे. ‘हर घर तिरंगा’ हा एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून देशातील कोट्यवधी लोकांच्या प्रतिसादामुळे हा राष्ट्रभक्तीचा उत्सव ठरला असताना देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या तिरंग्यास फालतूगिरी म्हणणाऱ्या प्रवृत्तींनी आपली राष्ट्रद्रोही मानसिकता उघड …

Read More »

अस्थिर राजकिय परिस्थितीवर अमोल मिटकरी म्हणाले, अजून बरंच काही… राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबाबत व्यक्त केला संशय

राज्यात शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेवून सांगितले. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. या आदेशाच्या विरोधात राज्य सरकार आणि शिवसेनेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत दाद मागितली. …

Read More »

सदाभाऊ खोतांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून अमोल मिटकरींचा टोला ट्विटवरून लगावला टोला

विधान परिषद निवडणूकीत महाविकास आघाडीशी दोन हात करण्याच्या उद्देशान भाजपाकडून अपक्ष आमदार म्हणून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला. परंतु अखेर क्षणी अर्ज माघार घ्यायला लावला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीकेची झोड उठवित ट्विट करत टोला लगावला. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास …

Read More »

९ जागांसाठी १४ उमेदवारांचे अर्ज दाखल : पण निवडणूक बिनविरोध होणार खबरदारी म्हणून भाजपा, राष्ट्रवादीकडून प्रत्येकी २ जणांचे जास्तीचे अर्ज : १ अपक्ष रिंगणात

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह १० उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. नामनिर्देशन दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण १४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने दिली. या निवडणूकीत जरी १४ उमेदवारांनी आपले अर्ज भरले तरी यापैकी भाजपा आणि …

Read More »