Breaking News

भारती विद्यापीठ, डि.वाय.पाटील, सिम्बॉयसिस विद्यापीठांसह अनेकांवर कारवाईचा बडगा स्वायत्त संस्थांना विद्यापीठ नाव वापरल्याबद्दल युजीसीकडून नोटीस

मुंबई: प्रतिनिधी

काही वर्षांपूर्वी राज्यातील शैक्षणिक संस्थांना स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने गर्भश्रीमंत शैक्षणिक संस्थांना स्वायत्त शिक्षण संस्थांचा दर्जा दिला. मात्र या संस्थांकडून स्वायत्ततेचा अर्थ स्वतंत्र विद्यापीठ असल्यासारखा घेतल्याने नावात विद्यापीठ नाव वापरणाऱ्या भारती विद्यापीठ, डी.वाय पाटील, सिम्बॉयसिस विद्यापीठ, गोखले इन्स्टीस्टुशन, डेक्कन कॉलेज, टाटा सोशल सायन्स यासह राज्यातील २१ संस्थांवर युजीसीने कारवाईचा बडगा उगारला आहे.

साधारणत: तीन वर्षापूर्वी शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामागे राज्य सरकारवर येत असलेला शिक्षणाचा भार कमी करण्याचा उद्देश यामागे होता. मात्र स्वायत्ततेचा दर्जा दिल्यानंतर या खाजगी संस्थांनी स्वत:ची नफेखोरी वाढविण्यासाठी कॉलेज, संस्थेच्या नावापुढे विद्यापीठ हे नाव वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळे नागरीकांमध्ये विशेषत: पाल्यांमध्ये याबाबत संभ्रम सुरु झाला. तरीही अशा संस्थांवर कारवाई करण्याचे धाडस राज्य सरकारने दाखविले नाही. त्यामुळे याप्रकाराच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका केली. त्यावर स्वायत्तेचा दर्जा देण्यात आलेल्या संस्थांकडून विद्यापीठ नावाचा वापर करता येत नसल्याचा निर्वाळा देत असे नाव वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश युजीसी अर्थात युनिर्व्हसीटी ग्रँण्ट कमिशनला सर्वोच्च न्यायालयाने दिले.

ज्या संस्थांची स्थापना राज्य अथवा केंद्र सरकारने केली आहे. मात्र त्यांना विद्यापीठाचा दर्जा दिला आहे अशा संस्थांनाच नावात विद्यापीठ हा शब्द वापरण्याची मुभा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

त्यानुसार देशभरातील १२३ संस्थांना युजीसीकडून नोटीसा बजाविण्यात आल्या असून यात महाराष्ट्रातील २१ संस्थांचा समावेश आहे. या संस्थांनी विद्यापीठ हे नाव वापरण्याऐवजी दुसरे कोणतेही नाव स्विकारावे यासाठी नव्याने नावांचा प्रस्ताव स्विकारण्याची तयारी युजीसीने दर्शविली आहे. तसेच ज्या संस्थांनी एका महिन्याच्या आत नावातील विद्यापीठ हा शब्द न काढून टाकल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशाराही युजीसीचे सचिव पी.के.ठाकूर यांनी सर्व स्वायत्त संस्थांना लेखी पत्राद्वारे दिला आहे. विषेश म्हणजे कारवाईचा बडगा उगारण्यात आलेल्या या सर्व संस्था मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि अहमदनगर, सातारा, नागपूर येथील असून कॉग्रेस नेते पतंगराव कदम, राज्यपाल डी.वाय.पाटील, माजी खासदार दत्ता मेघे, विरोधी पक्षनेते राधआकृष्ण विखे-पाटील यांच्यासह शिक्षण सम्राट एस.बी.मुजुमदार यांच्या संस्थाचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील स्वायत्त संस्थांची नावे

भारती विद्यापीठ, सेंट्रल इन्स्टीट्युट ऑफ फिशरीस एज्युकेशन, डॉ.डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटी, दत्ता मेघे इन्स्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्स, डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रँज्युएट अँण्ड रिसर्च इन्स्टीट्युट, डॉ.डि.वाय.पाटील विद्यापीठ, गोखले इन्स्टीट्युट ऑफ पॉलिटीक्स अँण्ड इकॉनॉमिक्स, होमी भाभा नँशनल इस्टीट्युट, इंदिरा गांधी इस्टीट्युट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च, इन्स्टीट्युट ऑफ अर्मामेंट टेक्नोलॉजी, इंटरनँशनल इन्स्टीट्युट फॉर पॉप्युलेशन सायन्स, इन्स्टीट्युट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, कृष्णा इन्स्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस, एमजीएम इन्स्टीट्युट ऑफ हेस्थ सायन्स, नरसी मोंजी इन्स्टीट्युट ऑफ मँनेजमेंट स्टडीज, पद्मश्री डॉ. डी.वाय पाटील विद्यापीठ, प्रवरा इन्स्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस, सिम्बॉयसिस इंटरनँशनल युनिर्व्हसिटी, टाटा इन्स्टीट्युट ऑफ सोशल सायन्सेस, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,  

Check Also

इराणने ताब्यात घेतलेल्या जहाजावरील पहिला भारतीय क्रु मेंबर भारतात परतली

इराणी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी ताब्यात घेतलेल्या पोर्तुगाल ध्वजांकित MSC मेष या जहाजावरील सतरा भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *