Breaking News

केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांना दिली आचारसंहितेतून सूट?

एखाद्या मतदारसंघातील किंवा राज्यातील विधिमंडळ अथवा संसदेच्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर त्या त्या राज्याच्या किंवा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सरकारी संसाधने संबधित घटनात्मक पदावर असलेल्या मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यासह विविध महामंडळाचे अध्यक्ष यांच्यासाठी वापरण्यात येत असलेली वाहने आणि सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस-निमलष्करी दलासह सरकारी लवाजमा तात्काळ आहे त्या ठिकाणापासून काढून घेण्यात येतो. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सरकारी लवाजमा काढून घेण्याच्या नियमाची तरतूदही आहे. परंतु पंतप्रधान तथा वाराणसी लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या खास मुंबई दौऱ्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सूट दिल्याची माहिती निवडणूक आयोगातील विश्वसनीय सूत्रांनी मराठी ई-बातम्या.कॉमच्या संकेतस्थळास बोलताना दिली.

वास्तविक पाहता संसद असो किंवा विधिमंडळ असो या दोहोंपैकी एकाची मुदत संपत येत आली असेल तर मुदत संपण्याच्या आतमध्ये नवी विधानसभा किंवा संसद अस्तित्वात येणे आवश्यक आहे. तसेच या निवडणूकीत विधानसभेची असेल किंवा लोकसभेची असेल तर विद्यमान सत्ताधारी पक्षाच्या आमदार, मंत्री, खासदार, पंतप्रधान यांना सरकारी निवासस्थान, वाहने आणि, सरकारी नोकरचाकर या सगळे सोडून द्यावे लागते. तसेच आचारसंहितेच्या काळात केंद्रीय निवडणूक आयोगाशिवाय कोणतीही सरकारी यंत्रणेचा वापर करता येत नाही. सदरचा घटनात्मक व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीस या सर्व गोष्टींची कल्पना देऊन सरकारी गोष्टी काढून घेण्यात येतात. या आचारसंहितेच्या कालावाधीत सरकारी मालकीच्या या यंत्रणेचा वापर फक्त आपतकालीन परिस्थितीत किंवा संकटकालीन परिस्थितीतच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परवानगीने वापरण्याची मुभा आहे.

परंतु भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना १ एप्रिल १९३५ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या “प्रॉब्लेम ऑफ दी रूपी” या प्रबंधाच्या संकल्पनेतून स्थापन केली. त्यास येत्या १ एप्रिल २०२४ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेच ९० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ९० दी निमित्त गर्व्हनर शक्तीकांता दास यांनी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नेमता हा कार्यक्रम लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर होत असल्याने हा ९० ही निमित्ताचा कार्यक्रम निवडणूकीनंतर जाहिर किंवा आयोजित करणे आवश्यक होते. परंतु हा कार्यक्रम ऐन निवडणूकीच्या धामधुमितच मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.

तसेच या कार्यक्रमाला वास्तविक पाहता फक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनाच आमंत्रित करणे अपेक्षित होते. परंतु आता या कार्यक्रमाला वाराणसी लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही रिझर्व्ह बँकेने आमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी भाजपाचे उमेदवार असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व सरकारी लवाजमा, वाहने, केंद्रीय वायुदलाची विमाने यासह नोकर चाकर, राज्याचे पोलिस दल, निमलष्करी दलाचे जवान आदी सर्व गोष्टी पंतप्रधान म्हणून असलेल्या सर्व सुविधा पुरविण्याची तयारी करण्यात यावी असे पत्र पाठविले आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगानेही आचारसंहितेतून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि पंतप्रधान यांना विशेष सूट देण्यात आल्याची माहितीही यावेळी निवडणूक आयोगाच्या अन्य एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

Check Also

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *