Breaking News

पहिल्या ट्प्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात ४० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

देशातील लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केली. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूका पार पडणार आहेत. त्यातील पहिला टप्पा १९ एप्रिल २०२४ रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात निवडणूकीची पार पडणार आहे. त्याचबरोबर या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या २७ मार्च २०२४ अखेरची आहे. आज अखेर पर्यंत विदर्भातील पाच जिल्ह्यात ४० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती मुख्याधिकारी निवडणूक आयोग महाराष्ट्र कडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच निवडणूक मतदार संघात निवडणूक पार पडणार. यातील नागपूर लोकसभआ मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोली-चिमूर मतदार संघातून भाजपाचे विद्यमान खासदार अशोक नेते यांनी पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज भरला आहे. तर नागपूरमधून भाजपाचे नितीन गडकरी हे उद्या अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या गांधी चौकातील विजय संकल्प सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खा.रामदास तडस, आ.संदीप धुर्वे, आ.अशोक उईके, आशिष देशमुख तसेच भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. या सभेला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबोधित केले. सभेनंतर गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणुकीने जात मुनगंटीवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

तर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार, विद्यमान खासदार अशोक नेते यांनीही मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या आधी झालेल्या विजय संकल्प सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे नेते, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम, आ. देवराव होळी, आ. बंटी भांगडिया, आ.कृष्णा गजबे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष व महायुतीच्या घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. अर्ज भरण्यापूर्वी खा.नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *