Breaking News

सामाजिक

मातीतील सच्चे कार्यकर्तेच विधान सभेत यावेत स्नेहालय संस्थेचा मधु दंडवते पुरस्कार स्विकारताना आ.कडू यांचे प्रतिपादन

अहमदनगर : प्रतिनिधी मातीतील सच्चे कार्यकर्तेच विधान सभेत यायला हवेत असे प्रतिपादन प्रहर संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी आज स्नेहालय येथे केले. सामाजिक क्षेत्रात निरपेक्षपणे काम करणा-या महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थाना दरवर्षी स्नेहालय संस्थेद्वारे विविध पुरस्करानी गौरवले जाते. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा ,एम.आय.डी.सी., अहमदनगर येथे पार पडला. …

Read More »

आरक्षणातील सर्व समाज एकत्र आले तर सर्वांची दांडी गुल ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आरक्षण घेणारा ५४ टक्के समाज आहे. तर एस.सी. आणि एस.टी. समाजातील २० टक्के असे सर्व समाज जर एकत्र आले तर इतर सर्व समाजाची दांडी गुल गुल होईल असे सुचक वक्तव्य ओबीसी नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले. तसेच आगामी काळात ओबीसी समाजाबरोबरच राज्यातील …

Read More »

मातृत्वाचा संदेश देण्यासाठी चार माता निघाल्या २२ देशांच्या सफरीवर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दाखविला हिरवा झेंडा

नवी दिल्ली : प्रतिनिधी मुलांना घडविण्यात मातेची भूमिका व मातृत्वाचे महत्व असा संदेश जगात देण्यासाठी  चार  मातांनी आरंभिलेल्या ‘मदर्स ऑन व्हिल्स’ या प्रवासाला आज परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी  झेंडा दाखवून सुरुवात केली. येथील जवाहरलाल नेहरू भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात श्रीमती स्वराज यांनी कोल्हापूर येथील ‘फाऊंडेशन फॅार होलिस्टीक डेव्हलपमेंट इन अकादमीक फिल्ड’ या संस्थेच्या ‘मदर्स ऑन व्हिल्स’ उपक्रमात सहभागी …

Read More »

महात्मा फुले महामंडळाचे कर्ज मिळणार सुलभतेने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळांर्गत कर्ज मिळवतांना अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर आणि जामीनदार या दोन अटींमध्ये शिथिलता आणल्यामुळे आता स्वयंरोजगारासठी कर्ज मिळणे सापे झाले आहे, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे सांगितले. यासंबंधी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील महात्मा …

Read More »

आदीवासी विद्यार्थ्यांच्या मोर्चावरील कारवाईचे विधानसभेत पडसाद बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्याचे आश्वासन

नागपूर : प्रतिनिधी आदीवासी मुलांच्या वसतिगृहात चांगल्या दर्जाचे जेवण व नाष्टा मिळत नाही. त्यामुळे जेवण-नाष्टाचे पैसे डीबीटी योजनेच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या मागणीच्या निषेधार्थ पुणे ते नाशिक दरम्यान आदीवासी मुलांनी मोर्चा काढला. हा मोर्चा शांततेत असूनही मुलांच्यांवर पोलिसांनी दबाव आणत कारवाई केल्याच्या मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील, विरोधी …

Read More »

अर्धा टक्काही आरक्षण कमी केले जाणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

नागपूर : प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण शिक्षणामध्ये कोणत्याही समाजाच्या आरक्षणात कपात केलेली नाही. मात्र तसे जर वाटत असले तर ओबीसींचे पूर्ण आरक्षण त्यांच्यासाठी देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. वैद्यकीय प्रवेशासाठी असलेले प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याबाबतचा प्रश्न काँग्रेसचे आमदार डी.पी.सावंत यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यास उत्तर देताना …

Read More »

मुस्लिम ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवणार – मंत्री प्रा. राम शिंदे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्ग.ला आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी मुस्लिम ओबीसी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात लवकरच बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन राजशिष्टाचार व ओबीसी कल्याण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या शिष्टमंडळाने मुस्लिम ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अंसारी यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिल्यानंतर शिंदे यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत …

Read More »

‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’करिता अर्ज करण्याचे आवाहन १० जुलै पर्यंत अर्ज करण्याचे साठे महामंडळाक़डून आवाहन

मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील १२ पोटजातीतील सरासरी ६०% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती’ करिता महामंडळाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्येष्ठता व गुणक्रमांकानुसार यासाठी निवड करण्यात येणार आहे. या पोटजातीमध्ये मांग, मातंग, मिनी मादीग,मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा यांचा समावेश आहे. …

Read More »

एमपीएससी आणि वैद्यकीय प्रवेशात मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय कॉंग्रेस आमदार हरिभाऊ राठोड यांचा सरकावर आरोप

मुंबई : प्रतिनिधी एमपीएससी परिक्षेतील उत्तीर्ण होणाऱ्या मागासवर्गीय परिक्षार्थी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर राज्य सरकारकडून अन्याय करण्यात येत आहे. या दोन्ही ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगले मार्क आणि मार्काच्या आधारे खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळत असला तरी या विद्यार्थ्यांपेक्षा खुल्या प्रवर्गातील कमी मार्क मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना …

Read More »

प्लास्टिकच्या कारखान्यावर धाडी टाकून गुन्हे दाखल करा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी प्लास्टिकची उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांवर तातडीने धाडी टाकून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील विविध शहरातून किती प्लास्टिक जमा होते, त्यावर रिसायकलिंग केले जाते का ?  याचा अहवाल आठ दिवसात द्यावा. पर्यटन स्थळे व तीर्थस्थळे, यात्रा, उत्सवाच्या वेळी भाविकांना, ग्राहकांना दिल्या …

Read More »