बीडात तणावः ईशान्य मुंबईत वायकर आणि किर्तीकर यांच्यात चुरसीची लढत अखेर रविंद्र वायकर १ मतांनी विजयी

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून बीड लोकसभा मतदारसंघात कधी भाजपाच्या पंकजा मुंडे या पुढे तर कधी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे पुढे असे चित्र पाह्यला मिळत होते. तर अशीच काहीशी परिस्थिती ईशान्य मुंबईत शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर आणि शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या बाबतही अशीच घडत होती. त्यामुळे अखेर दोन्ही मतदारसंघात अंत्यत चुरशीची लढत होत असल्याचे पाह्यला मिळाले.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला ६९१ मते शिवसेना उबाठा गटाच्या अमोल किर्तीकर यांना रविंद्र वायकर यांच्यापेक्षा जास्त मिळाल्याने सुरुवातीला अमोल किर्तीकर यांना या मतदारसंघातून विजयी झाले म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. त्यावर रविंद्र वायकर यांनी अमोल किर्तीकर यांच्या मिळालेल्या मतांबाबत आक्षेप घेत पुन्हा एकदा मतमोजणी घेण्याची मागणी केली. त्यावर या मतदरासंघातून मिळालेल्या पोस्ट्ल बॅलेटची पुन्हा मतमोजणी करण्यात आले. त्यात अमोल किर्तीकर यांना मिळालेल्या मतदानातील संख्येत घट होऊन रविंद्र वायकर यांना ४८ मते जास्तीची मिळाल्याची माहिती पुढे आली.

त्यावर पुन्हा अमोल किर्तीकर यांनी रविंद्र वायकर यांना मिळालेल्या मतांवर आक्षेप घेतला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पुन्हा मतमोजणी केली. त्यात रविंद्र वायकर यांना मिळालेल्या ४८ मतांची आघाडी पुन्हा कमी झाली आणि १ मतांची आघाडी रविंद्र वायकर यांना मिळाल्याचे आढळून आले. या एका मतांच्या आघाडीने अखेर शिंदेंच्या रविंद्र वायकर यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अखेर विजयी घोषित केले. त्यामुळे शिवसेना उबाठा गटाच्या संख्येत वाढलेली संख्या पुन्हा एका संख्येने कमी झाली आणि अमोल किर्तीकर यांच्या रूपाने मिळालेली खासदारकी रविंद्र वायकर यांच्या रूपाने शिंदे गटाच्या संख्येत भर घातली.

तर दुसऱ्याबाजूला बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या बजरंग सोनावणे यांच्यात थेट लढत होत होती. या लढतीत कधी पंकजा मुंडे यांची सरशी होत असे तर कधी बजरंग सोनावणे यांची सरशी होत असल्याचे दिसून येत होते. अखेरच्या फेरीत साधारणतः २००० पेक्षा कमी मतांची आघाडी बजरंग सोनावणे यांना मिळाली. या मतांच्या आघाडीमुळे बजरंग सोनावणे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून विजयी घोषित करण्याआधीच पंकजा मुंडे यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला. त्यामुळे येथील वातावरणात आणखी भर पडली. त्यातच दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्त्ये अर्थात भाजपाच्या पंकजा मुंडे आणि शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांचे कार्यकर्त्ये समोरासमोर आले. त्यातच आक्षेप घेण्यात आलेल्या मतांची पुर्नमोजणी होण्यापूर्वीच शिल्लक राहिलेल्या फेऱ्यांची मतमोजणी करण्यात आली. तर त्यात ९ हजारांची आघाडी बजरंग सोनावणे यांना मिळाल्याचे दिसून आले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *