Breaking News

…आणि रामदास आठवलेंनी दिलेला शब्द पाळला महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या अध्यक्षपदी राजा सरवदे यांची नियुक्ती

सोलापूर : प्रतिनिधी

मागील एक आठवड्यापूर्वी सोलापूर येथील जाहीर कार्यक्रमात रिपाई (ए) चे पदाधिकारी राजा सरवदे यांना मंत्रीपद दिल्याशिवाय सोलापूरात पाऊल ठेवणार नसल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. त्यास एक महिन्याचाही कालावधी लोटत नाही, तोच सोलापूरकरांना दिलेला शब्द खरा करून दाखविल्याने दलित चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये समाधानाची भावना पसरली आहे.

काही दिवसांपूर्वी सोलापूरातील दलित चळवळीतील जूने कार्यकर्त्ये आणि रिपाई (ए) चे प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे यांच्या ६१ निमित्त जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री आठवले यांनी बोलताना राजा सरवदे यांना मंत्रीपद दिल्याशिवाय सोलापूरात पाऊल ठेवणार नसल्याची घोषणा केली. त्यानुसार सरवदे यांची महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा आठवले यांच्या शिफारसीनुसार राज्य सरकारने केली.

राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या सर्व महामंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असल्याने राज्यमंत्री आठवले यांनी केलेल्या घोषणेनुसार राजा सरवदे यांना राज्यमंत्री पद मिळाल्याची भावना दलित कार्यकर्त्यांमध्ये पसरली आहे.

Check Also

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *