Breaking News

राजकारण

निवडणूकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर या गोष्टी पुरावा म्हणून चालतील महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मुभा उमेदवारांना देण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबर …

Read More »

शेतकऱ्यांसाठी सरकारकडून ६ हजार कोटींची तरतूद : वाचा कसे केले निधीचे वाटप २२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेच्या पटलावर

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील विविध विभागाच्या खर्चासाठी निधी उपलब्ध व्हावा याकरिता विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ५ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. यापैकी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रूपये प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी २ हजार ८५० कोटी रूपयांची तर अतिवृष्टीमुळे आणि पूरबाधितांसाठी नुकसान भरपाई देण्यासाठी २ हजार २११ …

Read More »

लोकशाहीला बेशुध्द करण्याचे काम; राज्यपालांना सांगा की ती यादी मंजूर करायला भाजपाच्या मुनगंटीवारांच्या मागणीवर सांसदीय कार्यमंत्र्यांचे प्रतित्त्युर

मुंबई : विशेष प्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी विधिमंडळाकडून विविध समित्या तयार करण्यात आल्या. मात्र या समित्यांच्या बैठका अद्याप आयोजित केली नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देत सरकार लोकशाहीला बेशुध्द करण्याचे काम करत असल्याचा आरोप भाजपा नेते सुधीर मुंनगंटीवार यांनी केला. त्यावर सांसदिय मंत्री अनिल परब यांनी आम्ही बैठकांचे आयोजन …

Read More »

अधिवेशनाच्या कालावधीवरून विधानसभाध्यक्षांनीच सभागृहातच व्यक्त केली नाराजी सत्ताधारी विरोधकांनी मिळून नियमावली तयार करण्याचे आदेश

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीवरून आधीच विरोधकांकडून टीका करत असताना आज सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अधिवेशनाच्या कालावधीवरून नाराजी व्यक्त करत नियमित अधिवेशन घेण्याच्या अनुषगाने सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून एकत्रित नियमावली तयार करावी असे आदेश दिले. अधिवेशनाच्या कालावधीवरून अध्यक्षांनीच आता स्पष्ट नाराजी व्यक्त …

Read More »

फडणवीसांची पत्रकार परिषद, जोश नसलेली आणि पडलेल्या चेहऱ्याची होती अजित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

मुंबई : प्रतिनिधी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली पत्रकार परिषद पाहिली. मात्र त्यात कोणत्याही प्रकारचा जोश नव्हता. तेथे उपस्थित असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही चेहरा पडलेला आणि डिमोरलाईज झालेले दिसत होता अशी उपरोधिक टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत भाजपा नेते फडणवीसांचे आरोप म्हणजे …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात अघोषित आणि केंद्राची काय घोषित आणीबाणी ? फडणवीसांना खोचक प्रतित्तुर ; मांडण्यात येणारे अध्यादेश आणि विधेयकांची यादी

मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून दिल्लीमध्ये कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र केंद्र सरकार त्यांच्याशी चर्चा करायला जात नाही. उलट या कडाक्याच्या थंडीत त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारत आहेत. तेथील परिस्थिती जावून पाहण्यापेक्षा राज्यात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. मग केंद्राने काय घोषित आणीबाणी सुरु …

Read More »

राज्यातले सरकार हे अंहकारी, तुघलकी निर्णय घेणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यात अघोषित आणीबाणी असून विरोध करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांचा सर्रास वापर करत आहे. आमच्या व्यक्तीने एखादी पोस्ट टाकली तरी त्या व्यक्तीला धमकावलं जातयं, त्याच्यावर पोलिसी कारवाई केली जाते. अर्णव गोस्वामी, कंगणा राणावत प्रकरणी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने आणि दिलेला निकाल हा राज्य सरकारला चपराक लगावणारा आहे. त्यात तोंड …

Read More »

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर १५ जानेवारी रोजी होणार मतदान

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. मदान यांनी सांगितले की, एप्रिल …

Read More »

पवारांच्या वाढदिनामिमित्त राज्यातल्या दिव्यांग आणि स्पर्धा परिक्षार्थींसाठी दोन नवे अॅप नव्या अॅपच्या उद्घाटनप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातल्या प्रत्येक दिव्यांगाना देणगीदारांच्या माध्यमातून आवश्यक असलेली मदत मिळावी यासाठी महाशरद (mahasharad), स्पर्धा परिक्षार्थीं व अनुसूचित जातींसाठीच्या असलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बार्टी (Barti) असे दोन मोबाईल अॅण्ड्राईड अॅप लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. हे दोन्ही अॅप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या …

Read More »

कृषी विधेयक फायद्याचे असते तर शेतकरी रस्त्यावर उतरला नसता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपाला टोला

मुंबई : प्रतिनिधी शेतकर्‍यांच्या पोटाला चिमटा बसल्यावरच तो रागाने रस्त्यावर येतो व आंदोलनात सहभागी होतो. जर कृषी विधेयक शेतकर्‍यांच्या फायद्याचं आहे असं केंद्र सरकार बोलत असेल तर शेतकरी या विधेयकाच्या विरोधात रस्त्यावर उतरला नसता असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना लगावला. जनता दरबारासाठी उपमुख्यमंत्री …

Read More »