Breaking News

राजकारण

ओबीसी आरक्षण : आता तरी नाकर्तेपणा सोडा आणि जागे व्हा ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात- देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून, वारंवार स्मरणपत्रे पाठवून सुद्धा कोणतीही कारवाई राज्य सरकारने केली नाही. आतातरी नाकर्तेपणा सोडून जागे व्हा, असे पत्र विधानसभेतील …

Read More »

काँग्रेस नेते-मंत्री करणार मोदी सरकारच्या काळ्या कारभाराची पोलखोल काँग्रेसची उद्या राज्यभर निदर्शने: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. मागील सात वर्षांत मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास करुन टाकला आहे. काँग्रेसच्या सरकारने ७० वर्षात देशाला समृद्ध, स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठमानेने उभे केले त्याची …

Read More »

सोशल मिडियाला संपवणं आणि लोकांना तुरुंगात टाकणं हाच केंद्राचा खेळ लोकांच्या खाजगी आयुष्यात घुसू पाहणाचा भाजपाचा कुटील डाव- नवाब मलिक

मुंबई्: प्रतिनिधी व्हॉटस्ॲपच्या आधारावर लोकांवर गुन्हे दाखल व्हावेत आणि त्या आधारावर शिक्षा व्हावी. लोकांची खाजगी माहिती गोळा करता यावी. हे सगळं गंभीर व खतरनाक आहे. केंद्र सरकारचा हा सारा खेळ सोशल मीडियाला संपवणं आणि त्याआधारावर लोकांना तुरुंगात टाकणं हा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक …

Read More »

अजित पवार म्हणाले थकित २४ हजार कोटींच्या रकमेसह या सवलती द्या कोरोनावरील प्रतिबंधक लसी, औषधे, वैद्यकीय उपकरणे, सेवांवरील जीएसटी करात राज्यांना सवलत द्या

मुंबई: प्रतिनिधी देशातील सर्व राज्ये कोविडविरुद्ध निकराने लढत आहेत. ही लढाई आर्थिकदृष्ट्या सुसह्य होण्यासाठी कोविडसंदर्भात उपयोगात येणारी औषधे, लस, वैद्यकीय उपकरणे, आरोग्यविषयक सेवा आदींवर आकारल्या जाणाऱ्या जीएसटीवर अधिकाधिक सवलत देण्यात यावी. मेडीकल ग्रेड  ऑक्सीजन, ऑक्सीजन ऑक्सीमीटर, पल्स ऑक्सीमीटर, कोविड टेस्टींग किट्स आदी वस्तूंची ग्राहकांकडून परस्पर खरेदी होते. या वस्तुंनाही जीएसटी …

Read More »

तीन पर्यायांसह ६ जूनचा संभाजी राजेंचा सत्ताधारी-विरोधकांना अल्टीमेटम दिल्लीत मराठा गोलमेज परिषद घेणार असल्याची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण सर्वपक्षिय नेत्यांच्या गाठी-भेटी घेत असून आपण तीन पर्याय सत्ताधारी आणि विरोधकांना देत असून येत्या ६ जूनपर्यंत जर राज्य सरकारने योग्य ती कार्यवाही केली नाही आणि निश्चित असा प्लॅन ऑफ अॅक्शन ठरवला नाही, तर आम्ही कोविड-बिविड काहीही बघणार नाही असा इशारा छत्रपती …

Read More »

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले हे अधिकार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी सद्यस्थितीत कोरोनामुळे राज्यात सर्वत्र जिल्हा परिषदांच्या अंतर्गत खरेदी समिती तथा स्थायी समिती बैठकांवर निर्बंध आहेत. त्यामुळे स्थायी समिती आणि जिल्हा परिषद यांना असलेले खर्चाचे अधिकार केवळ कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीसाठी पुढील आदेश होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास …

Read More »

१० वी उत्तीर्णसाठी असे होणार मुल्यमापन; मात्र सीईटी द्यावी लागणार जूनअखेर लागणार निकाल- शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार आहे. दहावीचा निकाल जून अखेरीस लावण्याचे नियोजन असून अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परिक्षा (CET) घेण्यात येईल, ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जून अखेर लागेल निकाल मंडळामार्फत जून …

Read More »

तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना मिळणार वाढीव दराने आर्थिक मदत राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मदतीचे पॅकेज जाहिर

मुंबई: प्रतिनिधी  राज्यामध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. केंद्रशासनाने विहित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने मदत देण्यात येणार असल्यामुळे वाढीव दरामुळे पडणारा आर्थिक भार राज्य शासनाच्या निधीमधून करण्यास मान्यता देण्यात आली. ही मदत खालील …

Read More »

मराठा आरक्षणविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्यांचे नागपूर कनेक्शन मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला भाजपाची रसद- काँग्रेस प्रवक्ते सावंत यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेचे व त्यांच्या पदाधिका-यांचे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर कनेक्शन उघड झाले असून यात भाजप पदाधिकारीच अग्रेसर असल्याने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत आरक्षण विरोधी लोकं व संस्थांना रसद पुरवून भाजपानेच मराठा समाजाशी दगाबाजी केली आहे का? असा …

Read More »

मराठा समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष करावा आम्ही पाठिंबा देवू आरक्षणाबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

कोल्हापूर: प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी कोल्हापूर येथे दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला भाजपा पाठिंबा देईल या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. माथेरान येथील उपनगराध्यक्ष आकाश कन्हैय्या चौधरी यांच्यासह शिवसेनेच्या …

Read More »