Breaking News

राजकारण

अमित शाह यांना पाठविलेल्या पत्रातील या ३० साखर कारखान्यांवर येणार संक्रात? जरंडेश्वरप्रमाणे इतर साखर कारखान्यांच्या विक्री गैरव्यवहाराबाबत कारवाई करण्याची चंद्रकांत पाटील यांची मागणी

पुणे : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोलाने विक्री करून झालेल्या गैरव्यवहारावर कारवाई करण्याची विनंती केली. जरंडेश्वर साखर कारखाना विक्रीबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले व त्याच पद्धतीने कारवाई होण्यासाठी ३० साखर …

Read More »

ते वृत्त दिशाभूल करणारे; तिन्ही कृषी कायदे रद्द झाले पाहिजेत हीच पक्षाची भूमिका राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांचा खुलासा

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायदे पूर्णत: रद्द करण्याऐवजी त्यातील शेतकऱ्यांना अडचणीचे वाटणारे मुद्दे वगळून राज्यात सुधारीत कायदा आणावा असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी डि.वाय.पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या उद्घाटनानंतर दूरचित्रवाणीच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. त्यावर विविध तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांनी यासंदर्भात …

Read More »

राफेलप्रकरणी फ्रांसमध्ये चौकशी होवू शकते तर देशात मोदी सरकार का घाबरते? राफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा !: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी राफेल फायटर जेटच्या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याची बाब उघड करून काँग्रेसने या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. परंतु मोदी सरकारने हे प्रकरण चौकशीविनाच गुंडाळले. हा संपूर्ण व्यवहारच संशयास्पद असल्याने फ्रान्स सरकारने आता या राफेल घोटाळ्याच्या चौकशीला सुरुवात केली आहे. या प्रकरणात करोडो रुपयांचा घोटाळा झाला असून फ्रान्समध्ये …

Read More »

भाजपा म्हणते, मराठा आरक्षण कायद्याची प्रक्रिया राज्यालाच करावी लागणार आमदार अॅड आशिष शेलार यांचे प्रतिपादन

मुंबई: प्रतिनिधी घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीनंतर एखादा समाज मागास वर्ग सूचित टाकण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असला तरी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोग गठीत करुन मराठा समाज मागास असल्याचा अहवाल पाठविल्याशिवाय केंद्र सरकारची प्रक्रिया पुर्ण होऊ शकत नाही. तसेच संबंधित जात मागास ठरल्यानंतर आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारचाच असल्याचे प्रतिपादन …

Read More »

राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपाचे राजकारण आघाडीत मतभेद नाहीत; विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचाच- नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशानात व्हावी ही महाविकास आघाडीचीही इच्छा आहे. परंतु या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष राज्यपालांच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत म्हणाले की, पण त्याला आम्ही भिक घालत नाही. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता आमदारांच्या कोविड चाचण्या झाल्यानंतरच …

Read More »

जरंडेश्वर कारखान्यावरील कारवाई तर सुरुवात: अमित शाहकडे दाद मागणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

पुणे : प्रतिनिधी जरंडेश्वर साखर कारखान्यावरील कारवाई ही तर सुरुवात आहे, राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून कवडीमोल किंमतीला ताब्यात घेतलेल्या सर्व साखर कारखान्यांची आणि सुतगिरण्यांची चौकशी तपास यंत्रणांच्या रडारवर आहे, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिला. राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून वेगवेगळे सहकारी साखर कारखाने तोट्यात दाखवून ते जप्त …

Read More »

नेत्यांना व पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याचे कटकारस्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी आमच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी व पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू असल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व परिवाराच्याबाबतीत ज्या पध्दतीने बातम्या पेरण्यात येत आहेत ते चुकीचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. साखर कारखाना ईडीने सील केला आहे. ज्या काही …

Read More »

सफाई कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता स्वतंत्र कक्ष सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागाने सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. हाताने मैला उचलणा-या मृत सफाई कर्मचा-यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई मिळण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झाली. …

Read More »

राजभवनाच्या अपुऱ्या ज्ञानावर राष्ट्रवादीचा उपरोधिक टोला न्यायालयाच्या निर्णयाची माहिती राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही

मुंबई: प्रतिनिधी ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि निर्णय याबाबत राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांच्या पत्रावर नाराजी व्यक्त करत राजभवनाच्या अपुऱ्या ज्ञानावर उपरोधिक टोलाही लगावला. दरम्यान राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र …

Read More »

नव्या सांस्कृतिक धोरणासाठी तज्ञ समितीची लवकरच स्थापना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २०१० मध्ये राज्याचे सांस्कृतिक धोरण आणण्यात आले होते. आता जवळपास ११ वर्षानंतर सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नवीन धोरण आणण्यात येणार आहे. या नवीन धोरणाचे प्रारुप तयार करण्यासाठी तज्ञ समितीचे प्राधान्याने गठन करण्यात यावे अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले. सांस्कृतिक …

Read More »