Breaking News

राजकारण

एमपीएससी सदस्यांची पदे ३१ जुलैपर्यंत भरणार: लोणकर कुटुंबियांना मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

एमपीएससी’चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी करण्यासाठी ‘एमपीएससी’ सदस्यांच्या सर्व जागा ३१ जुलै २०२१ अखेरपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्निलच्या आत्महत्येचे पडसाद आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. …

Read More »

भाजपा आमदारांकडून सभागृहातच धमक्या ! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर आक्षेप

मुंबईः प्रतिनिधी अधिवेशनातील चर्चेदरम्यान भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला. भाजपाचे आमदार काय धमकी देत आहेत का? सभागृहात धमकी दिली जात आहे, काय सुरु आहे, असा संताप सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला. सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना नाना पटोले …

Read More »

तालिका अध्यक्षांना शिवीगाळ-धक्काबुक्की केल्याने भाजपाचे १२ आमदार वर्षासाठी निलंबित घडलेल्या घटनेची भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आपबीती

विरोध असताना ओबीसी ठराव आवाजी मतदानाने मंजूर केल्याचा राग मनात धरून सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना भाजपा सदस्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याची दुर्दैवी घटना घडली. झाल्याप्रकाराने विधानसभेचे कामकाज जवळपास १ तासासाठी तहकूब करावे लागले. अखेर झाल्याप्रकारावर सभागृहातच चर्चा करण्याचे ठरले. त्यानुसार तालिका अध्यक्ष …

Read More »

ओबीसीप्रश्नी भुजबळ-फडणवीस यांच्यात खडाजंगीः गोंधळामुळे कामकाज तहकूब केंद्राने ओबीसींचा इप्मिरियल डेटा द्यावा या मागणीचा ठराव गोंधळातच मंजूर

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ओबीसी समाजाचे संपुष्टात आलेले राजकीय आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सादर करावयाच्या इंम्पिरियल डेटा केंद्र सरकारने द्यावा अशी मागणी करणारा ठराव आज विधानसभेत मंजूर करण्यास भाजपा सदस्यांनी विरोध केला. तरीही तालिका अध्यक्षांनी सदरचा ठराव मंजूर करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपाचे सर्व सदस्य अध्यक्षाच्या आसानाजवळ जावून त्यांचे …

Read More »

फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद का टाळली? अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला पत्रकार परिषदेला दांडी

मुंबई: प्रतिनिधी प्रत्येक अधिवेशाच्या पुर्वसंध्येला अधिवेशन काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सौहार्दाचे वातावरण रहावे यासाठी सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांसाठी चहापानाचा  कार्यक्रम आयोजित केला जातो. तसेच पत्रकार परिषदेनंतर पत्रकार परिषद घेत विरोधकांनी केलेल्या आरोपाला उत्तर देणे ही विधिमंडळ अधिवेशन काळातील परंपरा आहे. मात्र कोरोनाच्या नावाखाली यंदाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चहापानाचा कार्यक्रम यावेळीही …

Read More »

ठाकरे सरकार दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात ही ७ विधेयके मांडणार प्रस्तावित विधेयकांची व अध्यादेशांची यादी

मुंबई: प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या ५ जुलै ते ६ जुलै २०२१ असे दोन दिवस सुरू राहणार असून या दोन दिवसात ५ विधेयके नव्याने या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. तर २ प्रलिंबित विधेयकेही मांडली जाणार आहेत. मांडण्यात येणाऱ्या विधेयकांची यादी (1)     कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडलेल्या …

Read More »

ओबीसींचा डेटा द्यायचा नाही हा तेव्हांच्या सरकारचा निर्णय; चेहरा उघडा पाडणार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

मुंबई : प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न फक्त देशात नाही तर केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादीत असून २०११ मध्ये जेव्हा केंद्र सरकारने सर्वे केला, तेव्हा त्यात ८ कोटी चुका असल्याचे निष्पन्न झाले. एकट्या महाराष्ट्रात ७० लाखावर चुका. त्यामुळे तेव्हाच्याच केंद्र सरकारने ही माहिती देऊ नये, असा निर्णय घेतला होता असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते …

Read More »

अमित शाह यांना पाठविलेल्या पत्रातील या ३० साखर कारखान्यांवर येणार संक्रात? जरंडेश्वरप्रमाणे इतर साखर कारखान्यांच्या विक्री गैरव्यवहाराबाबत कारवाई करण्याची चंद्रकांत पाटील यांची मागणी

पुणे : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोलाने विक्री करून झालेल्या गैरव्यवहारावर कारवाई करण्याची विनंती केली. जरंडेश्वर साखर कारखाना विक्रीबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले व त्याच पद्धतीने कारवाई होण्यासाठी ३० साखर …

Read More »

ते वृत्त दिशाभूल करणारे; तिन्ही कृषी कायदे रद्द झाले पाहिजेत हीच पक्षाची भूमिका राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांचा खुलासा

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायदे पूर्णत: रद्द करण्याऐवजी त्यातील शेतकऱ्यांना अडचणीचे वाटणारे मुद्दे वगळून राज्यात सुधारीत कायदा आणावा असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी डि.वाय.पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या उद्घाटनानंतर दूरचित्रवाणीच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. त्यावर विविध तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांनी यासंदर्भात …

Read More »

राफेलप्रकरणी फ्रांसमध्ये चौकशी होवू शकते तर देशात मोदी सरकार का घाबरते? राफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा !: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी राफेल फायटर जेटच्या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याची बाब उघड करून काँग्रेसने या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. परंतु मोदी सरकारने हे प्रकरण चौकशीविनाच गुंडाळले. हा संपूर्ण व्यवहारच संशयास्पद असल्याने फ्रान्स सरकारने आता या राफेल घोटाळ्याच्या चौकशीला सुरुवात केली आहे. या प्रकरणात करोडो रुपयांचा घोटाळा झाला असून फ्रान्समध्ये …

Read More »