Breaking News

राजकारण

नव्या सांस्कृतिक धोरणासाठी तज्ञ समितीची लवकरच स्थापना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २०१० मध्ये राज्याचे सांस्कृतिक धोरण आणण्यात आले होते. आता जवळपास ११ वर्षानंतर सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नवीन धोरण आणण्यात येणार आहे. या नवीन धोरणाचे प्रारुप तयार करण्यासाठी तज्ञ समितीचे प्राधान्याने गठन करण्यात यावे अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले. सांस्कृतिक …

Read More »

फि भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचा हक्क डावलणाऱ्या शाळांवर होणार ही कारवाई शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून अनेक शाळांकडून फि भरली नाही म्हणून ऑनलाईन शाळेच्या वर्गाला प्रवेश न देण्याचे धोरण अवलंबलेले आहे. त्याविरोधात पालकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश नाकारणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करत कडक कारवाई करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाला आज दिल्याची …

Read More »

डॉक्टर दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा देत व्यक्त केल्या या भावना डॉक्टर्समुळे कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे झाले शक्य

मुंबई : प्रतिनिधी १ जुलै या राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या आहेत. येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुमचे समर्पण, तुमचे कौशल्य आम्हाला हवे आहे असे सांगून डॉक्टर्समुळेच  कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे शक्य झाले अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यवत केली. सर्व डॉक्टर्सना उद्देशून दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात …

Read More »

अजित पवार, अनिल परब यांची CBI चौकशी करा ! अमित शाहना पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रातून सांगितली स्वत:ची ओळख

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असून या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अवैध पध्दतीने निलंबित सहाय्यक पोलिस इन्सपेक्टर असलेल्या सचिन वाझे याच्याकडून कोट्यावधी रूपये गोळा करण्याचे आदेश दिले. याप्रकरणात अजित पवार आणि अनिल परब यांची नावे वाझे याने घेतलेली असल्याने या …

Read More »

राज्यपालांच्या पत्राला राष्ट्रवादीचे उत्तर …आमदार नियुक्तीचे प्रकरण निकाली काढा विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मताने जिंकू - मलिक

मुंबई: प्रतिनिधी आमदारांचे कोरोना रिपोर्ट आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अंतिम निर्णय होईल. परंतु आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती, त्यापेक्षा जास्त मताने जिंकू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या …

Read More »

कोविडमुळे पालक मयत झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर पर्यंतचे शुल्क माफ विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे इतर शुल्क माफ-मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थी-विद्यार्थीनींचे आई/वडील/पालक मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण पुर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठीय विभागातील सर्व अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना …

Read More »

पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात ! भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात अशी स्थिती राज्यात निर्माण झाल्याची टीका भाजपा नेते विधानसभा मुख्य प्रतोद आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज येथे केली. गणेशोत्सवाबाबत राज्य शासनाने नियमावली जाहीर केली ती जाचक असल्याकडे लक्ष वेधीत आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या नियमावलीचा खरपूस समाचार …

Read More »

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ साजरा करायचाय, तर हे नियम जाणून घ्या गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव(२०२१) साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने गृहविभागाने  मार्गदर्शक सूचना जारी  केल्या आहेत. ‘ब्रेक दि चेन’च्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंधपातळीबाबत (Level of Restrictions for Break the Chain) वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये …

Read More »

अनिल देशमुख यांनी ईडीला लिहीलेल्या पत्रात कोणत्या मागण्या केल्या ७२ वर्षाचे असल्याने अनेक व्याधींनी ग्रस्त

मुंबई: प्रतिनिधी सीबीआयबरोबरच आता ईडीनेही माजी चौकशी सुरु केली असून मंत्री असताना राहीलेले खाजगी सचिव पलांडे आणि शिंदे या दोघांना ईडीने चौकशीनंतर अटक केल्यानंतर चौकशीसाठी ईडीने पुन्हा एकदा देशमुख यांना समन्स पाठविले. मात्र आपले ७२ वय असून प्रत्येकवेळी चौकशीसाठी आपल्या कार्यालयात येता येणार नाही. त्यामुळे आपण माझी ऑडिओ किंवा व्हिडिओ …

Read More »

अखेर राष्ट्रवादीचा परिवार संवाद दौरा रद्द हिंगोली येथे पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली माहिती

हिंगोली: प्रतिनिधी राज्यात शासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमांचा मान राखत राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा थांबवित असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज हिंगोली येथे पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याचा दुसरा टप्पा मराठवाड्यातील तुळजापूर आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन २४ जूनपासून सुरू करण्यात आली. त्यात यवतमाळ …

Read More »