Breaking News

राजकारण

हॉटेल, रेस्टाँरंटच्या वेळा वाढणार ? पहिल्या टप्प्यातील निर्बंध शिथिलतेचा आढावा घेणार-मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी राज्यात काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन, हॉटेल आणि रेस्टाँरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. यादरम्यान आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी …

Read More »

एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या ६ हजार उमेदवारांच्या मुलाखती लवकरच तीन रिक्त पदांवरील नियुक्तीची अधिसूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या तीन रिक्त पदांवरील नियुक्तीस राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी मान्यता दिल्यानुसार तीन सदस्यांच्या नेमणुकीच्या अधिसूचना आज जारी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त पदांवरील नियुक्तीला मान्यता देण्याबाबत काल सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. …

Read More »

अशोक चव्हाण यांनी दिले देवेंद्र फडणवीस यांना प्रतिआव्हान ईडब्ल्यूएस'साठी घटनात्मक तरतूद शक्य तर मराठा आरक्षणासाठी का नाही?

मुंबई: प्रतिनिधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी किमान आता तरी मराठा समाजाची दिशाभूल करू नये. भाजपच्या केंद्र सरकारने संसदेत घटनात्मक तरतूद करून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाला ५० टक्क्यांच्या मर्यादेपासून संरक्षण दिले. मराठा आरक्षणासाठी तसेच संरक्षण का शक्य नाही? असा सवाल मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण …

Read More »

सुशांतसिंह प्रकरणाला वर्ष होऊनही सीबीआयचे सोयीस्कर मौन सुशांतसिंह प्रकरणातील चौकशी सद्यस्थिती सीबीआयने तात्काळ स्पष्ट करावी! सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला एक वर्ष पूर्ण झाले असून अद्याप सीबीआय कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहचलेली नाही. एम्स पॅनेलने सुशांतसिंहच्या हत्येला नकार देऊनही ३०० पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. सीबीआय याप्रकरणी अजूनही मुद्दाम मौन बाळगून आहे, त्याच्यामागे कोणाचा दबाव तर नाही ना? अत्यंत प्रतिष्ठेचा मुद्दा केलेल्या सुशांतसिंह …

Read More »

भाजपा आमदाराच्या प्रयत्नातून उभारलेल्या “त्या” इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन तीन महिने वापरातील वास्तुचे उद्घाटन करुन मुख्यमंत्र्यांची फसगत कशाला?- अॅड आशिष शेलार

मुंबई: प्रतिनिधी १ मे म्हणजे महाराष्ट्र दिना पासून गेले तीन महिने जी वास्तु वापरात आहे त्या वास्तुचे उद्घाटन आज करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची फसगत व्हावी आणि कार्यक्रमाचे हसे व्हावे अशा प्रकारे दुर्दैवी वर्तन मुंबई महापालिकेने का करुन दाखवले? असा सवाल भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला आहे. …

Read More »

विद्यार्थ्यांना दिलासाः पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा यंदा नाही उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत यांची घोषणा

पुणे : प्रतिनिधी राज्यातील विविध विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परिक्षा यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार नसल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर १० वी आणि १२ वी च्या परिक्षा घेता आले नाहीत. तसेच या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करून उत्तीर्ण करण्यात आले. …

Read More »

अल्प मदत जाहीर करून राज्य सरकारने केली पूरग्रस्तांची थट्टा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे टीकास्त्र

चंद्रपूरः प्रतिनिधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी आघाडी सरकारने जाहीर केलेले ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक असून राज्य सरकारने या पद्धतीने पूरग्रस्तांची थट्टा करू नये, अशी जळजळीत टीका भाजपा ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील …

Read More »

टीका करण्यापेक्षा पालकमंत्री म्हणून आपली जबाबदारी पार पाडा प्रविण दरेकर यांचा नवाब मलिकांना टोला

मुंबई: प्रतिनिधी मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दौऱ्यावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांवर टीका केली. या टीकेवरून भाजपा नेते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मलिक यांच्यावर पलटवार केला. राज्यपालांनी जिल्ह्यांचे दौरे केले तर यात काय गैर आहे?  त्यांच्या दौऱ्यामुळे इतरांच्या पोटात दुखण्याचे …

Read More »

खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची घणाघाती टिका

नंदुरबार: प्रतिनिधी राज्यातल्या जनहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष करत असलेल्या सरकारच वर्णन ‘खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार’  असंच कराव लागेल अशी अहिराणी भाषेत टीका आज भाजप नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज येथे केली. आमदार अॅड आशिष शेलार आजपासून तीन दिवसाच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून नंदुरबार जिल्हा दौऱ्यात …

Read More »

नाना पटोले यांचे पक्ष कार्यकर्त्यांना आदेश, कामाला लागा माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका महत्वाच्या असून या निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा. बुथ कमिट्यांची बांधणी भक्कम करा आणि या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल यासाठी कामाला लागा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. टिळक भवन येथे जिल्हा अध्यक्ष, आमदार, सर्व सेल व विभाग …

Read More »