Breaking News

राजकारण

मुख्यमंत्री शिंदें यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांचा पलटवार, थर लावले की थरकाप ५० थराची हंडी लावली वक्तव्याचा घेतला समाचार

आज मुंबईसह राज्यात दही हंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. मात्र या दही हंडीतील थर लावण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हीही हंडी फोडलीय. ती हंडी मोठी कठीण होती. पण ५० थर लावून ती हंडी फोडल्याचे वक्तव्य करत आपल्या बंडखोरीचे मोठेपणा सांगितला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा धागा …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपलं सरकार आल्यानंतर कसं वाटतंय मोकळं मोकळं… बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दही हंडी उत्सवात फडणवीसांचे भाषण

मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे दही हंडी साजरा करण्यात आला नव्हता. मात्र यंदा राज्यात सत्तांतर होत मुंबईसह १४ महापालिका निवडणूका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर मुंबईत भाजपा आणि शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांनी दहीहंडीचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले. या प्रत्येक दही हंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दही हंडी …

Read More »

टेंभी नाक्यावरील दही हंडीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हंडी कठीण होती पण आम्ही फोडली… हे थर आणखी वाढणार काळजी करायचे काम नाही

गेल्या दीड ते दोन महिन्यात खूप घडामोडी घडल्या असून त्या दरम्यान आम्ही सर्वात मोठी हंडी फोडली. हंडी कठीण होती. पण, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आम्ही हंडी फोडली, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभीनाक्यावरील दहीहंडी उत्सवात बोलताना केले. या हंडीसाठी ५० थर लावले होते आणि …

Read More »

शेलार यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा टोला, मला त्या बालिशपणात जायचं नाही दही हंडीवरून शेलार यांना आदित्य ठाकरे यांनी लगावला टोला

राज्यात शिवसेनेच्या बंडखोरांना सोबत घेत भाजपाने सत्ता स्थापन केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बसविले. त्यानंतर आता आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिका काढून घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतील जांबोरी मैदानावर यंदा भाजपाकडून दही हंडी …

Read More »

शासन निर्णय जाहीर: जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार नगरविकास, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित

आज राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा काल विधानसभेत केली होती. त्यानुसार नगरविकास, वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचे शासन निर्णय तातडीने जारी केलेले आहेत. …

Read More »

अशोक चव्हाण म्हणाले, झाडी- डोंगार- हाटिल ओक्के असतील, पण… विधानसभेत शिंदे सरकारवर केली टीका

झाडी, डोंगार, हाटिल ओक्के असतील, पण आज राज्यातील शेती अन् शेतकरी ओक्केमध्ये नाहीत, या शब्दांत महाराष्ट्राच्या सत्तांतर नाट्यावर चिमटा घेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अतिवृष्टी व पूरग्रस्तांना सरसकट भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी विधानसभेत केली. नियम २९३ अन्वये विरोधी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावावर ते बोलत होते. यावेळी चव्हाण म्हणाले की, …

Read More »

विधान परिषदेत खडाजंगी: नीलम गोऱ्हे म्हणाल्या, तुम्ही मंत्री तुमच्या घरी हे सभागृह आहे.. उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना झापले !

विधान परिषदेत सभागृहात आज दुसऱ्या दिवशी एका तारांकित प्रश्‍नावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर उत्तर देत असतांना विरोधकांचे समाधान झाले नाही. या प्रश्‍नावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या वेळी पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे खाली बसून बोलू लागले. त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. ‘मंत्री गुलाबराव पाटील हे दादागिरी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; गोविंदासाठी नोकरीत आरक्षण, स्पर्धेतील बक्षिसे सरकार देणार दहीहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत केली घोषणा

दरवर्षी दहीहंडी उत्सव मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र या सणा निमित्त सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकातील अनेक जण जखमी होतात किंवा मृत्युमुखी तरी पडतात. मात्र दहीहंडी हा खेळ साहसी खेळात समाविष्ट करण्यात येणार असून खेळताना गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना १० लाखाची मदत तर हात किंवा पाय मोडल्यास ५ …

Read More »

बोटीत शस्त्रास्त्र साडल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली ‘ही’ माहिती बोट वाऱ्याने हरिहरेश्वरच्या किनारी

आज श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर एक १६ मीटर लांबीची बोट स्थानिकांना आढळून आली. स्थानिक रहिवाशांनी ही माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, बोटीची पाहणी केली असता, या बोटीत ३ एके-४७ रायफल आणि काडतूस तसेच बोटीची कागदपत्रे आढळून आली. त्यानंतर तत्काळ हायअलर्ट जारी करण्यात आला. तसेच याची माहिती भारतीय …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी कटिबद्ध पुणे म्हाडाच्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा शुभारंभ

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधकामाच्या दरात म्हाडा घरे उपलब्ध करुन देत असून म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून पोलीस निवासस्थाने तसेच सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुणे मंडळ म्हाडाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »