Breaking News

राजकारण

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके पडळकरांना म्हणाले, ..तुमचं डिपॉझिट वाचलं का? माझ्या मतदारसंघात येऊन माझ्यावर टीका करता

भाजपाचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने पवार कुटुंबियांवर आरोप करतात. मात्र यावेळी पहिल्यांच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलंश लंके यांच्या मतदार संघात जात पवार कुटुंबियांबरोबरच निलेश लंके यांच्यावर टीकास्त्र सोडले. गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला निलेश लंके यांनीही पडळकर यांना जोरदार प्रत्युत्तर देत आपल्या मर्यादा ओलंडल्या नाही पाहिजे असे सांगत …

Read More »

रामदास कदम म्हणाले, तर ८-१० वर्षात शिवसेनेचं काही शिल्लक राहीलं नसतं अजित पवार यांच्यावर टीका करताना रामदास कदम यांचे वक्तव्य

शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिवसेनेचे माजी नेते आणि शिंदे गटाचे समर्थक रामदास कदम सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आता दसरा मेळाव्यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित …

Read More »

अजित पवार म्हणाले; …एकदम ओक्केच झालं, आता काय बोलायचं श्रीगोंद्यात एकनाथ शिंदेच्या बंडखोरीवरून केले वक्तव्य

राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे त्यांच्या मिश्किल आणि हजरजबाबी वृत्तीमुळे नेहमीच चर्चेत असतात. परिस्थिती कोणतीही असो त्यावर परखडपणे भाष्य करण्यात त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. तसेच परिस्थितीच्या अनुषंगाने वास्तवादी चित्र मांडत हास्यविनोद करण्यातही त्यांचा हातखंडा आहे. अनेकदा भाषणात किंवा माध्यमांसमोर त्यांनी लगावलेले टोले …

Read More »

मोदींचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचा मुंबई दौरा, नेमके कारण काय? राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुरक्षा विषयक सल्लागार अजित डोवल हे आज पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आले. तसेच मुंबईत आल्या आल्या त्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सर्वात आधी भेट घेतली. त्यानंतर वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना टोला, मोदींच्या रेषेपेक्षा मोठी रेष ओढा.. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत निवडक नेत्यांची बैठक

राज्यात भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये तुफान कलगीतुरा रंगत आहे. विधिमंडळ अधिवेशनात देखील याचेच पडसाद पहायला मिळाले. तस काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या टीकेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू …

Read More »

बुलढाण्यात शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्त्ये भिडले: १५ मिनिटे चालला राडा पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली

बंडाचे निशाण फडकाविल्यापासून शिवसेना आणि शिंदे गटाकडून आतापर्यंत एकमेकांवर टीकेपुरतेच राहिले होते. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही पूर्वीप्रमाणे कोणीही काही करू नका त्यांना जे करायचे ते करू द्या सांगत मला रक्तपात नको असे सुरुवातीलाच जाहिर केले होते. त्यामुळे आतापर्यत शिंदे गटाकडून आणि शिवसेनेकडून फक्त एकमेकांवर टीकाच केली जात असे. …

Read More »

रावसाहेब दानवे म्हणाले, ते पूर्वी समिकरण असायचं आता पेटीतून राजा जन्माला येतो उध्दव ठाकरे यांच्यावर केली खोचक टीका

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडाचे निशाण फडकाविले. त्यानंतर राज्यात भाजपाच्या मदतीने सत्ताही स्थापन केली. आता मुळ शिवसेना कोणाची आणि बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार यावरून उध्दव ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून परस्पर विरोधी दावा करण्यात येत आहे. त्यातच शिवसेनेच्या …

Read More »

नौदलाच्या नव्या झेंड्यावर छत्रपतींच्या राजमुद्रेची छटाः मुख्यंमत्री, उपमुख्यमंत्री म्हणाले… शिवाजी महाराजांना अभिवादन असल्याचे व्यक्त केले मत

संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि नौसेनेला नवीन ध्वज प्रदान सोहळ्याचे स्वागत केले आहे. तर हा क्षण शिवभक्तांसाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाचा, गौरवाचा क्षण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. …

Read More »

चव्हाण-फडणवीसांच्या भेटीवरून काँग्रेसच्या नेत्यांकडून डॅमेज कंट्रोल भेटीबाबत आणि चव्हाण भाजपात जाणार असल्याच्या अफवा

गुरूवारी रात्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आशीष कुलकर्णी यांच्या वरळी येथील निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्याचे वृत्त आज बाहेर येताच अशोक चव्हाण हे भाजपामध्ये जाणार या चर्चेला सुरुवात झाली. त्याचबरोबर अशोक चव्हाण हे जर भाजपात गेले तर चव्हाण यांचे समर्थक असलेले एकूण …

Read More »

या अशोक चव्हाण- देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागे दडलंय काय? खुलासा फक्त फडणवीसांचा तर चव्हाणांची चुप्पी

काल गुरूवारी राज्यातील भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाली. या भेटीबाबत देवेंद्र फडणवीस यांनीच होय माझी आणि अशोक चव्हाण यांची उभ्या उभ्या भेट झाल्याचे मान्य करत चर्चा मात्र झाली नसल्याचा खुलासा केला. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस नेते यांनीही भेट झाल्याचे एकप्रकारे मान्य केले. …

Read More »