Breaking News

रावसाहेब दानवे म्हणाले, ते पूर्वी समिकरण असायचं आता पेटीतून राजा जन्माला येतो उध्दव ठाकरे यांच्यावर केली खोचक टीका

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडाचे निशाण फडकाविले. त्यानंतर राज्यात भाजपाच्या मदतीने सत्ताही स्थापन केली. आता मुळ शिवसेना कोणाची आणि बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार यावरून उध्दव ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून परस्पर विरोधी दावा करण्यात येत आहे. त्यातच शिवसेनेच्या परंपरागत दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे गटाकडून उध्दव ठाकरे यांना डिवचले जात आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली.

आज एका टीव्ही वाहिनीशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी टीका केली.

भाजपा नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले, राजाच्या पोटी राजा जन्माला येणं ही पूर्वीचं समीकरण असायची. पण आता पेटीतून राजा जन्माला येतो. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली, त्यामुळे ते आता राजकीय वारस राहिले नाहीत, अशी टीका खोचक टीका केली. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना दानवे म्हणाले, पूर्वीच्या काळी राजा हा पोटातून जन्म घ्यायचा. राजाच्या पोटी जो जन्माला यायचा, तो राजा असायचा. मग तो आंधळा असो… पांगळा असो… बहिरा असो… किंवा मुका असो… तो राजा असायचा. पण आता राजा हा पेटीतून जन्माला येतो. ज्याच्या बाजुने जास्त लोकं असतील, तो राजा. त्यामुळे उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे वारस आहेत, ते बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारस आहेत. बाळासाहेबांच्या विचारांचेही ते वारस होते. पण बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन ते दुसरीकडे गेलेय त्यामुळे ते आता बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारस राहिले नाहीत.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनीच सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मागे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे भक्कम पाठबळ आहे. त्यामुळे शिंदे-ठाकरे यांच्या वादात भाजपाकडून जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांची बाजू घेत उध्दव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. भाजपा नेत्यांकडून होत असलेल्या टीकेला उध्दव ठाकरे यांच्या गटातून फारसे प्रत्युत्तर दिले जात नसल्याचे दिसून येत आहे.

Check Also

अतुल लोंढे यांचा सवाल, संचालकांवरील कारवाईचे स्वागत, पण नितीन गडकरींवर कारवाई कधी?

भारतीय जनता पक्षाचे नागपूर मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याच्या तक्रारीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *