Breaking News

राजकारण

जुनी पेन्शन योजना लागू करण्यास काँग्रेस कटिबद्ध

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी देशभरातून होत आहे. जनतेच्या मागणीचा सरकारने सहानुभुतीने विचार करुन त्याची अंमलबजावणी करायला हवी. काँग्रेस शासित राज्ये गुजरात व छत्तीसगडमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली असून गुजरात व हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार आले तर तेथेही ही योजना लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. काँग्रेस …

Read More »

राहुल गांधींचा सवाल, मोदीजी, दरवर्षी दोन कोटी नोक-या देण्याचे काय झाले ? महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांच्या प्रश्नावर मोदी सरकार चकार शब्दही काढत नाही

नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी नोक-या देण्याचे आश्वासन देशातील तरुणांनी देऊन त्यिंची फसवणूक केली. मोदी सत्तेत येऊन 8 वर्षे झाली नोक-या तर दिल्या नाहीत उलट चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावून व नोटबंदीने व्यापार उद्योग बंद पाडून करोडो लोकांचे रोजगार घालवले. देशातील तरुणांचे स्वप्न भंग केले, देशातील तरुण मोदींना नोक-या कुठे …

Read More »

सुषमा अंधारेंचा सवाल, तर गुलाबराव पाटील आणि सत्तारांवर कोणते गुन्हे दाखल करायचे?

भाजपाच्या महिला पदाधिकारी रिदा रशीद यांनी बाजूला व्हा असे म्हणून हाताने बाजूला सरकारवल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयाने अटपूर्व जामीनही आज मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी मंजूर केला. यासंपूर्ण प्रकरणावरून उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गट …

Read More »

अजित पवार म्हणाले, या विषयावर मी राज ठाकरेंशी बोलेन

मी ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या काही क्लीप पाहिल्या आहेत. चित्रपट पाहिला नाही. परंतु लहानपणापासून ऐकत आलो… धिप्पाड अफजलखान इतिहासात दाखवला जात होता. वाघनखे वापरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजखानाला मारले त्याचा कोथळा बाहेर काढला. परंतु या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाला उचलून मांडीवर घेऊन (नरसिंहासारखा) कोथळा बाहेर काढताना दाखवले आहे. अरे …

Read More »

अजित पवार अस्वस्थेततून आरोप करत आहेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सत्ता गेल्यामुळे अस्वस्थ आहेत, त्यांच्या पक्षात प्रचंड अस्वस्थता आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेते असल्याचे दाखविण्यासाठी ते काही तरी आरोप करत आहेत, असे सडेतोड प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिले. ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील व भाजयुमो प्रदेशाध्यक्ष …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, आदिवासी हेच मुळनिवासी देशाचे खरे मालक

आदिवासी समाजाच्या न्याय, हक्कासाठी भगवान बिरसा मुंडा ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढले व वयाच्या २४ वर्षी शहिद झाले. ब्रिटिशांच्या बलाढ्य सत्तेसमोर ते झुकले नाहीत. हजारो वर्षापूर्वी देशात जंगल मोठ्या प्रमाणात होते आज ते नष्ट होत आहे पण जंगलाचे रक्षण आदिवासी बांधवांनीच केले. आदिवासी बांधवच या देशाचे मुळ निवासी व मालक आहेत, …

Read More »

अजित पवार म्हणाले, या सरकारच्या काळात पोलिस आणि मंत्रालय प्रशासनावर दबाव

काल ठाण्यात गेलो होतो तिथे अनेक लोकांनी भेटून सांगितले इथे पोलीस ऐकून घेत नाही. पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून फोन येतात आणि तसे पोलीस बोलून दाखवत आहेत आमच्यावर दबाव आहे. हे महाराष्ट्राला भूषणावह अजिबात नाही असे सांगतानाच अशा तणावाखाली पोलीस यंत्रणा काम करत राहिली किंवा मंत्रालयातील सचिव दर्जाचे अधिकारी तणावाखाली काम करतात …

Read More »

भ्रष्टाचारमुक्त गरीब कल्याणाच्या योजना हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य

घर, शौचालय, गॅस, पाणी यासारख्या सुविधा कोणत्याही भ्रष्टाचाराविना गोरगरीबांपर्यंत पोहचविल्या हे मोदी सरकारच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात ‘धन्यवाद मोदीजी’ कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील १० लाख लाभार्थ्यांची आभाराची पत्रे पाठवण्याच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे, सहकारमंत्री …

Read More »

अब्दुल सत्तार ते वाय प्लस सुरक्षेवरून अजित पवार यांनी काढले सत्ताधाऱ्यांचे वाभाडे

यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेली महाराष्ट्राची परंपरा घडी विस्कटवू नका तुमच्यामध्ये वाचाळवीरांचे मोठं प्रस्थ वाढले आहे. काही मंत्री बोलत आहेत त्यातून मंत्रिमंडळाची प्रतिमा खराब होत आहे. लोक ऐकून घेत असतात, पहात असतात, लक्षात ठेवत असतात, काहीजण सहज बोललो म्हणत आहेत. तुम्ही सहज बोलायला नागरीक नाही. तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, मंत्री …

Read More »

अखेर महिला आयोगाने आव्हाडप्रकरणी मागवला अहवाल

भाजपाच्या महिला कार्यकर्त्या रिदा रशीद यांनी आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली. त्यानंतर भाजपा नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली. तसेच तक्रारदार महिला रिदा रशीद यांनी मग आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि खासदार सुप्रिया सुळे …

Read More »