Breaking News

राजकारण

उपमुख्यमंत्री फडणवीसांचा दौरा रद्द झाला तरी मुख्यमंत्री शिंदे जाणार दाव्होसला डाव्होसमधील जागतिक आर्थिक परिषदेतील मुख्यमंत्र्यांचा मिनिट टू मिनिट प्रोग्राम जाहीर

जवळपास दोन महिन्यापूर्वी दाव्होस येथील जागतिक आर्थिक परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणार असल्याचे निश्चित झाले होते. मात्र १९ जानेवारी रोजी मुंबईतील काही मेट्रो प्रकल्पाच्या उद्गाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येत असल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दाव्होसचा आपला दौरा रद्द केला. त्यामुळे आता दाव्होसला मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

भाजपाची टीका, घटनाबाह्य रीतीने पद पटकावणाऱ्या ठाकरेंकडून महाराष्ट्राची फसवणूक शिवसेना पक्षप्रमुख पदावरून भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

शिंदे फडणवीस सरकारच्या नावाने बोटे मोडत सरकारला घटनाबाह्य ठरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपदच घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे बाळासाहेबांवर निष्ठा असलेल्या तमाम शिवसैनिकांची आणि घटनाबाह्य पदाचा फायदा घेत मुख्यमंत्रीपद पटकावून महाराष्ट्राची फसवणूक केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी व पक्षप्रमुख पदावरून पायउतार व्हावे असे आव्हान प्रदेश भाजपाचे …

Read More »

आरएसएसप्रमुख मुस्लिमांना घाबरू नका सांगतात आणि २४ तासात मुस्लिम नेत्यावर ईडीचे छापे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा उपरोधिक टोला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक अर्थात आरएसएसप्रमुख  मोहन भागवत यांनी भारतात मुस्लिमांना घाबरण्याचे कारण नाही या त्यांच्या वक्तव्यानंतर अवघ्या २४ तासातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुणे आणि कोल्हापुरात ईडी छापे टाकते याबाबत महेश तपासे यांनी आश्चर्य व्यक्त केले. भाजपा सातत्याने केंद्र सरकारचा वापर करत आहे. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश, ४० हजार पदांची भरती प्रक्रिया आणि या सेवा सुरु करा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांची परिषद संपन्न

राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद आज …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, या पाच जागा महाविकास आघाडी एकदिलाने लढविणार महाविकास आघाडीची बैठक पार पडली; पाचही जागांवर एकमत...

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूकीची कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणूकीसाठी भाजपा आणि शिंदे गटाकडून कोकण आणि नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारही जाहीर केले. यापार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज दुपारी बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, …

Read More »

हसन मुश्रीफ यांचा आरोप, किरीट सोमय्याकडून विशिष्ट लोकांना लक्ष्य नवाब मलिक, हसन मुश्रीफ आणि अस्लम शेख यांची नावे घेतल्याने केला आरोप

आज ईडीने पहाटेपासून हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांचा मुलगा आणि मुलीच्या घरावर छापे टाकत सर्व कागदपत्रांची तपासणी सुरु केली. त्यातच भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या पाठोपाठ आता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचे नाव घेतले. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करत सोमय्या हे फक्त विशिष्ट …

Read More »

अतुल लोंढेची टीका, सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठीच भाजपाकडून ईडीचे छापे किरिट सोमय्यांनी आधी आरोप केलेल्या प्रकरणांचे काय झाले ?

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यांशी संबंधित ठिकाणांवर ईडीने छापे मारले यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. भारतीय जनता पक्ष हा सीबीआय, आयकर, ईडी सारख्या तपास यंत्रणांचा विरोधी पक्षांना नाहक त्रास देण्यासाठीच गैरवापर करत असल्याचे देशाने पाहिले आहे. ईडीची आजची छापेमारी ही त्याचाच एक भाग असून सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठी भारतीय जनता …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर ईडीचे छापेः कार्यकर्त्ये आक्रमक निवासस्थानाबाहेर पोलिसांकडून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न

साधारणतः चार वर्षापूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना कागलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या. त्यानंतर भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत मनिलॉंन्डरींग केल्याचा गंभीर आरोप केला. त्यावेळी त्यांच्या घरावर छापेमारी झाली. मात्र त्यावेळी आयकर विभागाने त्यांच्या घरासह …

Read More »

नाना पटोले यांची घोषणा, या प्रश्नांसाठी आता काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व वीज बिल माफीसह विविध ठराव एकमताने मंजूर

देशात भाजपा सरकारच्या विरोधात प्रचंड चिड असून शेतकरी, तरुणाई बरबाद करायची व्यवस्था मोदी सरकारची आहे. भाजपा सरकारविरोधात जनतेत संतापाची लाट असून राहुलजी गांधी यांनी मांडलेल्या भूमिकेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रेला देशात प्रतिसाद मिळालाच पण महाराष्ट्रानेही अभूतपूर्व प्रतिसाद देऊन ही पदयात्रा यशस्वी केली आहे. आता हाच संदेश …

Read More »

निवडणूक आयोगासमोर शिंदे-ठाकरे गटाकडून परस्पर विरोधी युक्तीवाद पुढील सुनावणी १७ जानेवारी रोजी

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या विरोधात अपात्रतेच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तर फुटीनंतर शिवसेना आमचीचचा नारा देत एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली. विशेष म्हणजे या दोन्ही वरील सुनावणी आज एकाच दिवशी होती. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या प्रश्नावरील याचिकेवरील सुनावणी …

Read More »