Breaking News

राजकारण

मंत्री खाडे यांची घोषणाः प्रत्येक जिल्ह्यात कामगार रुग्णालय तर विभागात वैद्यकीय महाविद्यालय तक्रार निवारणासाठी कामगार हेल्पलाईन

राज्यातील कामगारांच्या पाल्यांना डॉक्टर होता यावे, यासाठी कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या रुग्णालयामध्ये राज्याच्या प्रादेशिक विभागात प्रत्येकी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याची शिफारस कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी आज केली. तसेच प्रत्येक जिल्ह्यात कामगारांसाठी रूग्णालय उभारण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही मंत्री खाडे यांनी दिली. कर्मचारी राज्य विमा …

Read More »

आदित्य ठाकरेंचा इशारा, स्वतःला विकलं तेवढं पुरे, मुंबईचे एटीएम करू नका खोके सरकार मुंबईला विकायला निघालंय; मुंबईला विकू नका

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात आलेलं खोके सरकार हे फक्त मुंबई विरोधी नाही तर महाराष्ट्र विरोधी आहे. मुंबईचा वापर एटीएम म्हणून करत आहेत म्हणत माझी मुंबई विकू नका, तिचं एटीएम करू नका अशा शब्दात आदित्य ठाकरे …

Read More »

MPSC विद्यार्थ्यांचे परीक्षेतील बदलाच्या विरोधात पुणेसह अनेक शहरात आंदोलन एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

लोकसेवा आयोगाने नुकतीच राजपत्रित अधिकारी वर्ग एक आणि वर्ग दोन साठीच्या मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला. आयोगामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या धर्तीवर वर्णनात्मक अर्थात लेखी परीक्षा करण्याचा असून याची अंमलबजावणी याच वर्षापासून म्हणजे २०२३ ला होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून करण्याचे ठरवले आहे. नवीन पद्धत आत्मसात करण्यास …

Read More »

सत्तेच्या गाजराची पुंगी निकामी झाल्याने महाविकास आघाडीची तिघाडी बिघडली भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

सत्तेची संधी दिसल्यामुळे एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी ही केवळ गाजराची पुंगी होती हे आता स्पष्ट झाले आहे. सत्ता जाताच या आघाडीची बिघाडी झाली असून एकत्र राहिल्यास तीन तिघाडा काम बिघाडा होईल याची त्यांना खात्री असल्यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकीत तिघांची तोंडे तीन दिशांना असल्याचे दिसू लागले …

Read More »

राष्ट्रवादीची खोचक टीका, पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत केली टीका

पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत भाजपावर खोचक टीका केली. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुनिल तांबे यांनी स्वतः उमेदवारी अर्ज न भरता आपला मुलगा सत्यजीत तांबे यास अपक्ष …

Read More »

ऊर्फी जावेदने तक्रार दाखल केल्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, माझा संघर्ष सुरुच राहील कोणीही कितीही माझ्या विरोधात तक्रारी दाखल केल्या तरी संघर्ष सुरुच राहणार

मागील काही दिवसापासून ऊर्फी जावेद आणि भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील वाद आता चांगलाच चिघळला आहे. यापूर्वी चित्रा वाघ यांनी ऊर्फी जावेद हीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आज उर्फी जावेद हीने चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यापार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाल्या, कोणी …

Read More »

महेश तपासेंचा सवाल, एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप पगार नाही ;कुठे आहेत सदावर्ते – पडळकर शिंदे-फडणवीस सरकारकडून ९० हजार एसटी कर्मचारी विनावेतन

जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही आता गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांचा कळवळा आला नाही का? आता कुठे आहेत हे दोघे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. महेश तपासे म्हणाले, राज्यातील ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांचा पगार अद्याप झालेला नाही. …

Read More »

नाना पटोले म्हणाले, ते अपक्ष आहेत त्यांचे त्यांनी ठरवावं मात्र माहिती घेतल्यावरच बोलेन नाशिकमधील डॉ सुधीर तांबे यांच्या उमेदवारी अर्ज न भरण्यामागचं राजकारण

नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला देण्यात आल्यानंतर, काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना या जागेसाठी उमेदवारी घोषित केली होती. कारण, सुधीर तांबे हे काँग्रेसकडून तीनवेळा या मतदारसंघातून निवडून आले होते. काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्याच नावाने एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी सुधीर तांबे यांनी आपली उमेदवारी मागे घेत …

Read More »

सत्यजीत तांबे यांनी सांगितले कारण, का भरला अपक्ष उमेदवारी अर्ज राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण

महाविकास आघाडीकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसला देण्यात आली. यानंतर काँग्रेसने उमेदवार म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. यानंतरही सुधीर तांबेंनी आपला अर्ज दाखल केला नाही. दुसरीकडे सत्यजीत तांबेंनी याच मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. यानंतर पत्रकारांनी ‘काँग्रेसने एवढा विश्वास ठेवला …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन, मानधन वाढीसह २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय घेणार

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक घेण्यात आली. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल यांचेसह महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी …

Read More »